आराध्य डायरी
आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. बदल आहे. अजून खूप प्रवास करायचा आहे. शाळा, प्रज्ञाची ओटी थेरेपी. अवलोक ची स्पिच थेरेपी, आणी आता सोनालीची स्पिच थेरेपी अशा चार ट्रिटमेंट चालू आहेत. 2017 मध्ये खुप प्रगती झाली आहे. आम्ही नवीन घर घेतले आहे. आरू हुशार झाला आहे. आता 2018 मध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहेत. दूसर्या बाळाची तयारी करायची आहे. त्याअगोदर मनीषाची तब्येत पूर्ण फिट करायची आहे. आराध्य ला नर्सरीत अॅडमीशन घ्यायचे आहे. मला माझा फिटनेस वाढवायचा आहे. मबीऐ पूर्ण करायचे आहे. नोकरीत नवीन संधी शोधायची आहे. सामाजीक कार्यात मंदिराच्या बाबत काम करायचे आहे. आता विशाखापट्टणम वरून मुंबईत आलोय. 12/8/2018 काल आरूची लिना देशपांडे कडे डेव्हलपमेंट चाचणी झाली. त्याची समज चांगली वाढली आहे. 1 वर्षाने प्रगती झाली आहे. 6/9/2018 गुरूवार दिव्यम सेंटर मध्ये आता स्नेहल मॅडम थेरेपी घेत आहेत. 1 महीना पूर्ण झाला आहे. सेंटर प्रशस्त आहे. सर्व सुविधा युक्त बनवले आहे. पहीला व दूसर्या माळ्यावर थेरेपीसाठी विवीध रूम्स् तयार केलेले आहेत. सर्व स्टाफ खुप सहकार्य करतो व मैत्रीपूर्ण वातावर...