माझा पहिला प्रवास
*माझा पहिला लांबचा प्रवास आणि दुंदिबाबा* गोष्ट 1991 ची आहे तेव्हा मी ६ वर्षाचा होतो. लहानपणी मी खूप मस्ती करायचो. तुम्ही म्हणाल मस्ती तर सर्वच करतात लहानपणी. त्यात काय नवीन? माझी मस्तीची एक वेगळी उंची होती. आम्ही मुंबईला राहायला गेल्यावर 10 वर्षांनी सुद्धा गावात मस्ती करणाऱ्या जी मुलांची तुलना माझ्याशी होत असे. वयस्कर माणसं म्हणायची जयासारखी (माझं गावच नाव जया) करतोय मस्ती पण त्याच्या इतकी नाही. जे मला विनाकारण चिडवत असत अशा अनेकांची दगड मारून डोकी फोडली आहेत. त्यामुळे माझं नाव दगडीच्या अस पडलं होत. उगाच मला भांडणात ओढत त्यांना मी सोडत नसे. घरात आईचा मला रोज मार बसायचा. असच एकदा वटपौर्णिमा होती, आई मला सोबत घेऊन बनातील मंदिरात गेली होती. तिथं मोठ वडाचं झाड होत आता त्यातील अर्धच राहिले आहे, तर त्या वडाच्या पारंब्या खूप लांब होत्या. उंचावरून खाली आल्या होत्या. बायका वाद पुजत होत्या तेव्हा मी त्या पारंब्या ना लोंबकळत होतो. कोणालाच माहित नव्हत वर आगीमहू आहे. ते कसं उठल माहीत नाही. माश्या बायकांवर घोंगावू लागल्या, एकच गोंधळ उडाला. सर्व जणी घराकडे पळू लागल्या आणि सोबत अफवा उडाली जय ने व...