सातारची आजी
सातारची आज्जी यावर्षी मुंबईत भयंकर उकाडा होता. मुंबईतील चाकरमनी जसा वेळ मिळेल तस आपल्या गावाकडे जाऊन राहायचा प्रयत्न करत आहेत. मी पण कुटुंबासोबत गावी गेलो. आठवड्याची सुट्टी संपली पण परत निघायला पाय निघत नव्हता. मग गावारूनच साईट वर जायचे ठरवले. प्रवास जास्त होत होता पण गावी राहायचा आनंद मिळत होता. गावावरून मुंबई तिथून जामनगर, परत मुंबई आणि रात्री गावची ट्रॅव्हल पकडून परत गावी अशी पहिली साईट केली. 4 दिवस राहून परत गावावरून सोलापूरची एक साइट करायचं ठरवलं. सातारा ते सोलापूर ST ने जायचं ठरवलं. माहिती काढली तर समजलं महाड-महाबळेश्वर-सातारा-सोलापूर- अक्कलकोट अशी एक ST चालते. सकाळी साडेनऊला पांचगणी आणि साडेदहा ला पाचवडला पोहचते. पाचवडला जाऊन ST पकडली. गाडी फुल भरली होती सीट भेटेल की नाही ही शंका होती, वाहकाला (कंडक्टर) विचारले, तो म्हणाला "सातारा पर्यंत उभे राहा सातार मध्ये जागा होते." सातारा पर्यंत उभे राहिलो. सातारा मध्ये गाडी खाली झाली. खिडकीच्या बाजूची सीट पकडली. सातारामध्ये परत गाडी फुल्ल झाली. एक वयस्कर आजी, कपाळावर क...