सातारची आजी

              सातारची आज्जी 
यावर्षी मुंबईत भयंकर उकाडा होता. मुंबईतील चाकरमनी जसा वेळ मिळेल तस आपल्या गावाकडे जाऊन राहायचा प्रयत्न करत आहेत. मी पण कुटुंबासोबत गावी गेलो. आठवड्याची सुट्टी संपली पण परत निघायला पाय निघत नव्हता. मग गावारूनच साईट वर जायचे ठरवले. प्रवास जास्त होत होता पण गावी राहायचा आनंद मिळत होता. गावावरून मुंबई तिथून जामनगर, परत मुंबई आणि रात्री गावची ट्रॅव्हल पकडून परत गावी अशी पहिली साईट केली. 
4 दिवस राहून परत गावावरून सोलापूरची एक साइट करायचं  ठरवलं. सातारा ते सोलापूर ST ने जायचं ठरवलं. माहिती काढली तर समजलं महाड-महाबळेश्वर-सातारा-सोलापूर- अक्कलकोट अशी एक ST चालते. सकाळी साडेनऊला पांचगणी आणि साडेदहा ला पाचवडला पोहचते. पाचवडला जाऊन ST पकडली. 
गाडी फुल भरली होती सीट भेटेल की नाही ही शंका होती, वाहकाला (कंडक्टर) विचारले, तो म्हणाला "सातारा पर्यंत उभे राहा सातार मध्ये जागा होते." सातारा पर्यंत उभे राहिलो. सातारा मध्ये गाडी खाली झाली. खिडकीच्या बाजूची सीट पकडली. सातारामध्ये परत गाडी फुल्ल झाली. एक वयस्कर आजी, कपाळावर कुंकू आणि त्या खाली अबीर, गळ्यात तुळशी माळ, लाल नववारी साडी, सत्तरी पार केलेली.आणि तिचे 2 नातू  बारा तेरा वर्षांचे, आणि 1 नात दहा वर्षाची असेल. गाडीत चढले आणि जागा शोधत मागे आले. माझ्या पुढची सीट खाली होती तिथे ते तिघे नातवंडं  बसलीत आणि आजी ने मला विचारले "पोरा सीट खाली आहे का?" माझ्या बाजूची सीट खाली होती. मी हो म्हटले आणि आजी माझ्या बाजूला बसली. थोडा वेळ आजी ने सामान ठेवण्यात वेळ घालवला, गुडघेदुखी होत होती म्हणून पायाखाली एक बॅग ठेऊन त्यावर पाय ठेऊन बसली आणि मला विचारलं "कुठला तू?" मी माझी ओळख करून दिली मग आजी सांगू लागली, तीच माहेर सोलापुरात आणि सासर सातारा मध्ये. आता नातवंडांना सुट्टी लागली आहे म्हणून त्यांना माहेरी नेत आहे, मग तिथून पुण्यात बहिणीकडे जाईन. मी वर्षभर अशीच फिरत असते. अशा अनेक गोष्टी आजी ने सांगितल्या. दुपार झाली तेव्हा मला डबा देऊ केला पण मी पण आणला होता मग आम्ही दोघांनी डब्बा संपवला. जेवण झाल्यावर त्यांना डुलकी लागतं होती मग आजीला खिडकीकडे बसवून मी बाहेर बसलो. आजीचा डुलकी लागली, ऊन खाली झाले होते, वाऱ्याची झुळूक येत होती, गाडीच्या खिडक्या खडकड वाजत होत्या, गाडी वळण घेत भरधाव पंढरपूर सोलापूर कडे धावत होती. माझ्या डोक्यात अजीचे विचार चालू होते. सातार ची आजी बिनधास्त सातारा-सोलापूर-पुणे फिरत होती. 
तिच्यावर एक लेख झालाच पाहिजे म्हणून मे महिन्यात २ ओळी लिहून अपूर्ण राहिलेला लेख आज आसाम मध्ये सुतारखंडी ते सीलचर प्रवासात पूर्ण करत आहे. 
आजीचा फोटो नाहिये पण मनात आठवण कायम राहील. 
धन्यवाद
लेखक जयंत जगताप
7738022343

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)