Posts

Showing posts from June, 2025

बापू

उन्हाळ्यात गावी गेलो होतो. आई वडील अगोदरच गावी जाऊन घराची साफसफाई करून ठेवली होती. आम्ही दुपारी 3 वाजता पोहचलो.  गाडी घरापासून थोडी मागे मस्करच्या दारात लावावी लागते. पण आमच्या घरातून गाडी आलेली स्पष्ट दिसते. मी गाडीरस्त्याच्या बाजूला लावतच असतो इतक्यात बापू (वडील) येतात आणि मला येऊदे येऊदे सांगत गाडी पार्क करायला मदत करतात. खरतर मला तिथला पार्किंग जागेचा पूर्ण अंदाज आहे आणि  मागेपुढे भरपूर मोकळी जागा असते, तरीही आपले काळजी म्हणून बापू सांगत असतात आणि मी ही त्यांचं ऐकत ते म्हणतील तितकीच मागे पुढे घेतो आणि पार्क करतो.  मग गाडीवरील बॅग्स, आणलेले काही सामान सर्व काही बापू घरात पोचवतात.  आई तर लाड करतेच पण बापू एक विशेष प्रकारे प्रेम.दाखवतात. काळजी घेतात.  सकाळी अगोदर उठून चूल पेटवून पाणी गरम करायला ठेवतात.  मी उठून आंघोळीची तयारी करत असतो. तोपर्यंत बापू अगोदरच 2 गरम बादल्या पाणी बाथरूम मधे आणून ठेवतात. आपण म्हटले मला एक बास आहे, तर त्यांचं उत्तर असत, घे भरपूर पाणी, अंग मोकळं कर.  दुकानातून काही आणायचे असेल आणि आई ने मला सांगितला

चीनचे हुकमी एक्के

चीनचे हुकमी एक्के : कोळसा, दुर्मिळ खनिजे(रेअर अर्थ इलेमेंट) सोन आणि इलेक्ट्रॉनिक्स.  मागील आठवड्यात असाच पेपर वाचताना एक लेख वाचला ज्यात चीन व अमेरिका संबंधावर प्रकाश टाकला होता. अमेरिकेनं 145% terrif लावले होते, ज्याला चीनने पण जशास तसे उत्तर दिले, कोणच मागे हटत नव्हते मग शेवटी अमेरिकेने 2 पावले मागे घेतली आणि टेरीफ शिथिल करून पुन्हा एकदा दोन्ही देशांचा व्यापार सुरू झाला.  यात सर्वात मोठा रोल प्ले केला तो REE (rare earth element) म्हणजेच दुर्मिळ खनिजे. ही दुर्मिळ खनिजे सर्वात जास्त म्हणजे 440M टन चीन कडे आहेत, त्याखालोखाल व्हियेतनामकडे चीनच्या अर्धे म्हणजे 220M टन आहेत, मग ऑस्ट्रेलिया, आणि इतर देश येतात. भारताकडे 69M टन आहेत.  तुम्ही म्हणाल त्याने काय होतंय. तर ही खनिजे सर्व इलेक्ट्रॉनिक्स PCB, mobile PCB, लढाऊ विमाने, पाणबुड्या, संरक्षक हत्यारे यासाठी खूप आवश्यक असतात.  आणि त्याहून मोठा हुकूमचा एक्का म्हणजे ही खनिजे पृथ्वीच्या गर्भाच्या सर्वात वरच्या थरात आढळतात. तिथे खूप रेडिएशन असते, ती काढणे खूप कठीण आणि ती शुद्ध रूपात मिळवणे महाकठीण काम. आणि हे कठीण काम 90% फक्...

माझं काम आणि माझे छंद

        माझं काम आणि माझे छंद  गेल्या 18 वर्षात मी पूर्ण देश भ्रमण कधी कधी परदेश दौरे करत पॉवर प्लांट, सिमेंट प्लांट, स्टील प्लांट, sea पोर्ट,  कधी कधी सिगारेट बनवणाऱ्या कंपन्या, ऑइल रिफायनरी हे प्लांट खूप बघितले आणि इथे काम केले. हे आमची कर्मभूमी. कोळसा, सिमेंट, iron ore, (क्लिंकर, slag, ash, lime stone) सिमेंटचे रॉ मटेरियल) मोजणाऱ्या मशिन्स जशा की weighing scales, metal detector, कोल फिडर, बंकर लेवलवर खूप काम केलं.   खाणीतून काढला जाणारा, परदेशातून जहाजातून येणारा, रेल्वेने प्लांट मध्ये येणारा कोळसा, यार्ड मधे साठवलेला कोळसा बॉयलर मध्ये पाठवताना, आणि तो जळाल्यावर निघणारी त्याची राख(फ्लाय एश) अशा सर्व स्तरावर ते मोजण्याचे काम, योग्य रित्या बॉयलर मध्ये पाठवण्यासाठी लागणारे मशिन्स इंस्टॉल करणे, ते मेन्टेन करणे हे आमचे काम. त्यामुळे सतत कोळसा खाणी, पॉवर आणि स्टील प्लांट मधील chp (coal handling plant) stacking एरिया, सीमेंट प्लांट मधील raw material ते  सीमेंट पॅक करे पर्यंत सगळीकडे आमचे मशिन्स, स्टील मध्ये iron ore मोजने, समुद्री पोर्ट वर येणारे...

दोघेही श्रेष्ठच

दोघेही श्रेष्ठच सर्वप्रथम हॉटेल भागश्री च्या मालकांचे खूप खूप अभिनंदन. आपल्या मेहनतीने आणि अनोख्या मार्केटिंग पद्धतीने आपण मोठा पल्ला गाठलात.  आपल शिक्षण कमी किंवा नाहीच हे माहीत पडले की अनेकांनी भुवया उंचावल्या. आपला interview बघितला आपण एकदम साधे आणि नम्र व्यक्ती आहात. आपण भले आणि आपलं काम भले..  आपल्या या यशाचा उपयोग काही  न शिकलेले असा करून घेत आहेत की जणू काही शिकलेले डिग्री घेतलेले सर्व मूर्खच. अनवधानाने ते तुम्हाला शिकलेल्या लोकांच्या नजरेत विलन करत आहेत.  खरतर पैसे कमवायला शिक्षण लागत नाही. तो तुम्ही कसाही कमवू शकता..  शिक्षण लागते ते नवीन शोध लावायला, नवीन प्रगती करायला..  एक उदाहरण देतो.. शेती हजारो वर्षापासून सुरू आहे, पण त्यात नवीन शोध लागले ते शिक्षणामुळे.. शिक्षण म्हणजे फक्त बेरीज वजाबाकी नसते किंवा विविध भाषा शिकणे नसते.  "एक होता कार्व्हर" अमेरिकेचा शेती शास्त्रज्ञ. त्याने खूप बिकट परिस्थिती मध्ये अभ्यास केला,   शेतीवर संशोधन केले तेव्हा कुठे शेतीउत्पादन वाढले.   असेच सर्व क्षेत्रात असतें  सिमेंट असो की गाड्या अ...

पुरुष

एखाद्या पुरुषावर प्रेम करणं म्हणजे फक्त त्याच्या ताकदीवर प्रेम करणं नाही, तर त्याच्या कमकुवत गोष्टींनाही स्वीकारणं. त्याला मोकळेपणा आणि आपुलकी देणं, कारण या जगात पुरुषांकडून खूप अपेक्षा असतात, पण त्यांना स्वतःला व्यक्त करू द्यायचं फारसं शिकवलं जात नाही. तो नेहमी एकसारखं वागणार नाही. कधी तो शांत असेल, पण ते तुमच्यापासून लांब राहण्यासाठी नसेल, तो फक्त थकलेला असेल. त्याला भावना व्यक्त करणं जमत नाही, कारण त्याला लहानपणापासून ते लपवायला शिकवलं गेलं आहे. तो परिपूर्ण नाही, पण तो प्रयत्न करत असतो. तोही कधी घाबरतो, गोंधळतो. त्याच्यासोबत चाला, ना पुढे, ना मागे, पण त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून. त्याला स्वतःचा वेळ आणि मोकळीक द्या. त्याला त्याचं आवडतं काम करू द्या, त्याचे मित्र आणि छंद असू द्या. जो पुरुष विश्वासात असतो, तो खरं प्रेम करत राहतो. त्याच्या पंखांना आकाश द्या—प्रेम म्हणजे अडवणं नाही, रोज परत निवडणं असतं. लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्य नाही, पण सगळ्यात सुंदर भाग आहात. फक्त त्याच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा ठेवू नका, तुम्हीही प्रेम दाखवा. त्याचा दिवस कसा गेला हे विचारा. तो शांत...

TPL walk walk walk

I think This TPL is not limited to this quarter but it's path for us to play in each quarter to achieve great results. It's our job to walk on this path. Here I have written one poem dedicating to this TPL.  Poem name :  Walk walk walk  Walk like a Tiger, Walk like a soldier Walk towards Horizon. Walk like a Hero Walk like a deer Walk with out fear Walk like legend towards goal,  Walk walk walk If u fail.. don't worry, pull your socks Restart the clocks...  And again start walk walk walk.  Once target is lock, no one can block..  Becouse all knows, we are not just talk, we believe on walk...  TPL is our starting jerk.. definitely we all are going to win our perk..  So keep walk walk walk...  Thank you Jayant jagtap. 

alpha

                        अल्फा सध्या इंस्टाग्राम वर किंग चार्ल्स या कुत्र्याचे व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहेत. दक्षिण चीन मधील एका शेल्टर मध्ये अनेक कुत्रे पाळले आहेत त्यातील हा चार्ल्स. अंगकाठी मध्यम, सफेद रंग, केसाळ शरीर, अगदी तोंडावरही केस असलेला कुत्रा अल्फा dog म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यापेक्षा.ताकदवर, मोठे, वयस्कर कुत्रे तिथे आहेत पण याच्या साहसी, समजूतदार, इतरांची भांडणे सोडवण्याची वृत्ती, कोणी मोठा कुत्रा कमजोरवर दमदाटी.करत असेल तर हा मधे पडतो आणि कमजोरला सोडवतो. याला जो चॅलेंज करतो त्याला तो भिडतो. सहसा जास्त भुंकत नाही पण पाय रोवून उभा राहतो आणि बाजी जिंकतो. असा हा अल्फा डॉग चे व्हिडिओ पाहून मला आमच्या मावशीची म्हैस सोनी ची आठवण झाली. 1993 ते 2004 पर्यंत ती म्हैस मावशीकडे होती. घरातील गौरीचीच ती लेक. ती पण अल्फा म्हैस होती. नेहमी तिचा कळप ती लीड करायची. त्याकाळात कधी कधी म्हशी चुकायच्या किंवा हरवायच्या. एकदा डोंगरात खूप वर गेलेल्या म्हशी लवकर खाली आल्याच नाहीत. अंधार पडला माणसांनी शोधने थांबवले आणि घरी आले. आणि ...