Posts

Showing posts from October, 2025

संग्राम जगताप प्रतिक्रिया

     *संग्रमदादा जगताप प्रतिक्रिया.*  2011-12 ची गोष्ट असेल. कर्नाटकमधून हुबळीवरून एक सिमेंट प्लांट मध्ये सर्विस विजिट करून परत मुंबईला येत होतो. मला सहसा रेल्वेने प्रवास करायला आवडते. तिकीट बुक केले होते पण अजून निश्चित झाले नव्हते. वेटींग वर होते तेव्हा इतके digitalization नव्हते. तरी कन्फर्म होईल या आशेवर मी हुबळी स्टेशन वर पोहचलो. तिथे काही वेळ थांबल्यावर रेल्वेचा मेसेज आला चार्ट रेडी झालं असल्याचा. माझं तिकीट कन्फर्म झाले नव्हते.मुंबईला तर जायचे होते. तिकीट काउंटर la जाऊन एक जनरल तिकीट काढले आणि जी पहिली गाडी येईल त्यात चढून जायचे असे ठरवले. अर्ध्या तासात प्लॅटफॉर्म वर नागरकोईल मुंबई रेल्वे आली त्यात स्लीपर कोच मध्ये चढलो. सहसा ऑफ सीझनला अशा कोच मध्ये एखादी सीट खाली भेटते मग आपण टीसी येईपर्यंत वाट बघायची. टिसी पावती देऊन जे भाडे असेल ते घेऊन सोबत extra 100 रूपये घेऊन तिकीट द्यायचे. टीसी येईपर्यंत त्या स्लीपर कोच मधील साईड lower सीट वर मी बसलो. तिथे एक पंचविशीतला मुलगा बसला होता. त्या कोच मध्ये चढल्या चढल्या मला एक विचित्र वास येत होता. हळूहळू तिथे सेट झालो की सम...

raise your own Bar

             Raise your own Bar आपल काम असत लिहित राहायचं. त्याच्यातून कधी चांगलं निघेल हे वाचक ठरवत असतात. असच कविता. कॉम आयोजित काव्यस्पर्ध्येत एक स्वयंरचित कवितेचा व्हिडिओ पाठवला होता. कविता.कॉम अतिशय नियोजनबध्द असे काम करत असतें 3 वर्षात 78 कार्यक्रम म्हणजे वर्षाला 26 आणि प्रत्येकी महिन्याला 2 असे जबरदस्त वेग ठेऊन कार्य करणारी ही संस्था कमी वेळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. योगायोगाने पहिला प्रयोग आणि परवा 78 प्रयोग असे दोन कार्यक्रम मला हजर राहून बघता आले. 78व्या प्रयोगात आदरणीय लेखक, कवी, समीक्षक, अभ्यासक आणि बरेच काही असे अशोक बागवे साहेब यांनी पसायदान cha अर्थ असा काही समजावला की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले. सोबत निमंत्रित हरिभक्त पारायण महाराजांचे सत्कार व आमच्या सारख्या कवींचे बक्षीस देऊन सन्मान झाला.  ऑफिस काम अर्धे सोडून कार्यक्रमास आलो होतो आणि वेळेअभावी इथूनही अर्ध्यातच जावे लागले.  माझ्या कवितेला उत्तेजनार्थ असे सन्मानपत्र देण्यात आले ते तिथे बागवे सरांकडून घेऊ शकलो नाही. पण कविता.कॉम चे सर्वेसर्वा आदरणीय प्र...

पसायदान निमित्ताने हे विसरू नका

पसायदान ध्न्यानेश्वर माऊली म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा.. संपूर्ण महाभारत सोप्या शब्दात लिहून शेवटी जीवनाचा गाभा, तत्व, जसा अर्क काढतात तसा जीवनाचा अर्क पसायदान मधे सांगितला आहे.  त्यानिमित्ताने मला इथे उपस्थित रहायची संधी भेटली हे माझे भाग्यच..  कविता.कॉम च्याच पहिल्या कार्यक्रमाला मी इथे आलो होतो. त्यानंतर परत उपस्थित राहणं जमले नाही पण दुरून प्रवास बघत होतो.. समृध्दी हायवेवर ज्याप्रकारे गाडी धावत असते त्याप्रकारे कविता. कॉम आणि शिव तुतारीचा प्रवास वेगात सुरू आहे आणि या दोन्ही प्रतिष्ठान चे स्टिअरिंग सुरक्षित हातात आहे त्यामुळे प्रवास असाच सुरू राहणार यात शंका नाही.  अनेक वेळा मला कविता. कॉम मध्ये कविता सादर करण्याचा मोह झाला. पाटील सरांशी बोलून ते करता देखील आले असते पण ओळख लाऊन येणे आणि संधी घेणे मनाला पटले नाही.  मग यावेळी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रीतसर नावे द्यायची होती आणि मग इथे निवड होणार होती. तिथून इथे यायची संधी भेटली त्याचा आनंद वेगळाच. धन्यवाद. माझी कविता सादर करतो.  *हे विसरू नका* लहानपणी घरातून बाहेर निघताना आई नेहमी सांगायची, सोबत घेतलेली...

कोजागिरी पौर्णिमा

              *कोजागिरी पौर्णिमा* दिवाळीची असते पहाट, गुडी पाडव्याच्या सकाळ, दसऱ्याची सायंकाळ आणि कोजागिरीची रात्र.. आहे ना कमाल.. आपले सण किती धमाल..  प्रत्येक वेळेला आहे महत्व... ||2|| कधी सूर्य, कधी चंद्र कधी झाडे फुले पूजून जाणतो आपण निसर्गाचे तत्व.. >> कोजागिरी आहे अशीच खास पौर्णिमेची रात्र ||2|| देवी लक्ष्मी झाली प्रकट, म्हणून होई कौमुदी पौर्णिमा साजरी सर्वत्र.. कोण आहे जागे, कोण आहे जागे... अस विचारात सर्व आनंदात बाहेर फिरती II2II मोकळ्या आकाशी, चंद्राच्या सफेद प्रकाशात सर्वजण अमृतमय दूध पिती.  जो जो जागा त्याच्या घरी लक्ष्मी  करी निवास ||2|| आणि गोपाल कृष्ण गोपीकासंगे आजच्या रात्री खेळतात महारास..  चंद्र येई पृथ्वी भेटी..||2||.  सर्व भक्त अमृतप्रकाशी न्हाऊन निघती.. ||2|| पिके निघायची ही खरी सुरवात..  शेतकरी राजा आनंदून जाई चंद्राच्या प्रकाशात... ||2|| सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा. *कवी जयंत जगताप* मोबाईल नंबर 7738022343 ठिकाण कोपरखैरणे