येवा कोकण आपलाच आसा
"येवा कोकण आपलाच आसा* असाच अनुभव मागच्या आठवड्यात कोकणातील एका छोट्या टप्प्यात आला. मुंबई - माणगाव - श्रीवर्धन - हरिहेश्वर- दिव्यागार- दिघी - आगरदांडा - रोहा - मुंबई असा प्रवास आणि पर्यटन केले. कोकण एवढे मोठे आहे की एका वेळी एक टप्पा अस करत 5 -6 वेळा फिरू तेव्हा कुठे 60% पूर्ण होईल. तर या प्रवासात कोकणी जेवण, निसर्ग, समुद्र किनारे, शुद्ध हवा, छोटे छोटे घाट पुरातन मंदिरे आणि कोकणी घरी सोबत मस्त रस्ते.. असा मस्त अनुभव आला.. नारळाचे शहाळे, कोकम सरबत, सोलकढी, मासे, खेकडे असे जेवण आणि त्यात ही कोकणी वेळेनुसार दिवेआगर मध्ये राणे बंधू चे खानावळीत. दुपारी 12 म्हणजे 12 आणि रात्री 8 म्हणजे 8 लाच चालू होणार. ज्याला जेवायचे आहे त्यांनी मुकाट्याने रांगेत उभे राहून टेबल खाली होण्याची वाट बघायची. दिवसा समुद्रकिनारी पाण्यात पडून राहायचे. या प्रवसाचा मुख्य भाग होता आराध्य पाण्यात कसा राहतो हे तपासणे आणि त्याने ही उत्तम प्रतिसाद दिला. परतीचा प्रवास लक्षात राहण्यासारखा झाला. दिघी वरून अगर्दांडाला जेट्टी ने आलो. मग जो घाट आणि जंगल रस्ता लागला आणि सोबत दिसणारा समुद्र किनारा आणि...