Posts

Showing posts from July, 2023

भूमिका

भूमिका जीवनात भूमिका खूप महत्वाच्या असतात. वेळ आणि काळानुसार त्या बदलत जातात. कधी स्वतःहून घेतो, कधी दिलेल्या स्वीकारतो, कधी लादल्या जातात तर कधी नकळत त्यात आपण घुसतो. भूमिका आपण निभावत असलेली कामगिरी, मला वाटत भूमिका 2 प्रकारच्या असतात. जी आपण स्वतः ठरवून भूमिका वठवतो त्याला म्हणतात स्टँड. कधी कधी लोक विचारतात या प्रसंगात तुझा स्टँड काय?  आणि जे दुसरा व्यक्ती, जसे आपला कार्याचा प्रमुख, किंवा नेता, लीडर आपल्याला एक भूमिका पार पाडायला देतात  त्याला रोल म्हणतात.  म्हणजे एखाद्या सामूहिक मोहिमेत, युद्धात, मोठया प्रकल्पात प्रत्येकाला एक जबाबदारी असते, त्यांनी ती निभावताना एक भूमिका पार पाडायची असते.  जस की आताच चन्द्रयान-3 मोहीम पार पडळीं त्यात प्रत्येक शास्त्रज्ञांनी एक भूमिका पार पाडली. तो त्यांचा रोल होता. मोहिमेचे यश या प्रत्येकाच्या रोल वर अवलंबून होत.   वयक्तिक स्टँड म्हणाल तर गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांनी घेतलेली भूमिका. ती स्वतः घेतली जाते मग त्यात सहकारी जुडले जातात.   अजून एक उदाहरण म्हणजे अफजल खान वध.  भेटायला गडाखाली ...

1 जून सबका जन्मदिन

   *जीसका दिन पता नही उसका 1जून होता है*  हिंदीत एक म्हण आहे, "जीसका कोई नही होता उसका भगवान होता है" असच आजच्या दिवसाच महत्व आहे. जीसका कब जन्म दिन है पता नहीं होता उसका 1जून होता है.  वाढदिवस साजरे करणे, मग सगळ्यांच्या तारखा लक्षात ठेवणे, रात्री 12 ला जागून शुभेच्छा देणे नाहीतर दोस्ती तुटली, स्टेटस नाही ठेवले तर दुश्मनी झाली म्हणून समजा. केक घेऊन गेले म्हणजे त्याच्या संकटात धावून गेलो असा अविर्भाव असतो मित्रांचा. लाखो दिल की धडकन, युवा नेते ही विशेषणे लावली नाहीत तर जन्मदिन सुका होता.  हे आजकाल चे नवीन फॅड आहे.   मोबाईल युगापुर्वी असले काही उद्योग नव्हते. आम्ही शाळेत असताना काही high फंडू मुलं-मुली चॉकलेट आणून वर्गात वाटत असत, नवीन कपडे घालून येत असत. आम्ही गपगुमान चॉकलेट खाऊन बसायचो. आपला वाढदिवस आला की सुट्टी मारायची आणि घरी मज्जा करायची नाहीतर शाळेत गेलं तरी कोणाला माहीत नसायचं वाढदिवस आहे ते.  असो आमच्या आधीच्या पिढया तर जेव्हा शाळेत दाखल होत असत तेव्हा गुरुजी विचारत जन्म दिनांक सांगा, आई-वडिलांना काही माहीत नसायचं.  काही काही जणांच्या ...

रवी रांजणे

    💐💐💐💐💐*कर्मवादी*💐💐💐💐💐 कर्मवादी जे असतात त्यांनी आपले कर्म करत राहायचे असते.  सत्कर्म हे जमिनीत पेरलेल्या बीजसारखे असते, त्याला योग्य ओलावा भेटला की ते उमलून वर येतेच.  असेच सत्कर्म करत आपले कर्म करणारे *इंजिनीयर श्री. रवी रांजणे साहेब* आज समाजकार्यात चमकत आहेत. बी. जी. शिर्के या मोट्या बांधकाम व्यवसाय कंपनीत स्वतःच्या हिमतीवर  मोठ्या पदावर मजल तर मारलीच सोबत कंपनी चा व्यवसाय वाढवण्यात सहकार्य करत आहेत.  यासोबत सामाजिक जाणिव ठेवुन भागातील अनेक होतकरू तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहेत.  *सुजित गोळे, नितीन रांजणे* यासारखे युवा उद्योजकांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक तरुणांना क्लब, बी जी शिर्के कंपनी मध्ये त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.  अशा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जनमानसात वावरणाऱ्या, मितभाषी असणारे,  सुसंस्कृत असे राहणीमान असणाऱ्या रवी रांजणे साहेबांचे करावे तेवढे कौतुक कमीच.  अशीच आपली प्रगती होत राहो आणि आपल्या हातून सामाजिक कार्य घडत राहो या शुभेच्छा....

स्पिरिट

                            स्पिरिट माझं कोणी आहे की नाही, यापेक्षा मी कोणाचा तरी आहे हे महत्वाचं, चालताना वाटेत काटे पेरले तरी काढणारा कोणीतरी पुढे उभा आहे हे महत्वाच पायात काटा घुसेल की नाही माहीत नाही पण जो आतुरतेने वाट पाहतोय,  त्यासाठी मी काट्यात घुसून जाईन हे महत्वाच. भले अवघड चढण एकटा चढशील पण उतरताना आधार असेल हे महत्वाच.  आयुष्य प्रत्येकाचं एकदाच असत, पण ज्याला जगण्याचं स्पिरीट मिळालं तो अनेकदा जगत असतो हे महत्वाच.. जयंत जगताप 7738022343  

चिलबल - आनंद पवार

                चिलबल -अभिप्राय  ज्याला जो छंद त्याला तशी माणसं भेटत जातात. सोशल मीडिया वर विशेषताह फेसबुक वर अनेक विषयांवर अवांतर वाचन करायला मिळते. असेच गेल्यावर्षी फेसबुक सातारा समूहावर आनंद पवार यांच्या चिलबल या  पुस्तकाविषयी वाचायला भेटले. तसा मी हाडाचा वाचक, जे भेटेल ते वाचायचा प्रयत्न करत असतो. अनेक कादंबऱ्या, इतिहास वाचन, सावरकर, ज्योतिबा फुले यांचं लेखन वाचून झाले. मग अण्णाभाऊ साठे यांची "कृष्णाकाठच्या कथा" ही त्यांची अनुभवाची शिदोरी वाचली आणि मी ही लिहायला लागलो. हळू हळू रवी गावडे हे आमच्या भागातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व ओळखीचे झाले. त्यांचे फेसबुक वॉल वरील लेखन वाचून प्रगल्भ होत होतो, त्यांचे नकळत मार्गदर्शन भेटले आणि नवीन लेखक मित्र भेटत गेले. आनंद पवार ही त्यातील एक. अगोदर चिलबल नाव वाचून मला याचा अर्थ कळला नाही. मला वाटले ते चिलबिल असेल. पण त्यातील एक प्रकरण खळ वाचलं आणि जाणवलं हे वेगळंच काहीतरी आहे. लगेच त्यांना फोन केला आणि पुस्तक कसे भेटेल याची चौकशी केली. पहिल्या कॉल वरच आमच्यात अशी चर्चा झाली कि जणू काही आम्ही जुने मित...