Posts

Showing posts from August, 2023

अंदमानातील सातारकर

           *अंदमानातील सातारकर* अंदमान म्हटले की आपल्याला आठवतात ते वीर विनायक दामोदर सावरकर. त्यांची जन्मठेप, त्यांनी चालवलेला कोलू. 8 बाय 5 फूट ची अरुंद कोंदड बराक, त्यातच करावे लागणारे सर्व प्रातः विधी. आणि होणारे अनन्वित अत्याचार. हे सर्व सावरकरांना लागू होते कारण ते राजकीय कैदी म्हणून तिकडे नेले होते. असच इतर दरोडे खून करणारे कैदी ही तिकडे नेले जायचे, त्यांना पण अशीच कठोर शिक्षा असायची का? तर काही अंशी नाही. सावरकर आपल्या बौद्धिक क्षमतेने तिथेही उठाव करतील अशी भीती होती म्हणून त्यांना इतर कैद्यांपासून अनेक वर्ष अलिप्त ठवले होते, इतके की त्यांचे मोठे बंधू तिथे होते हे ही त्यांना खूप उशीरा समजले.  पण इतर कैद्यांना काही काळानंतर तिथे इतर कामे दिली जात. जसे की, शेती, रस्ते, घरकाम, सुतार, गवंडी अशी अनके प्रकारची मेहनती ची कामे करून घेतली जात.  असच 1930 च्या काळात आपल्या जिल्ह्यतील जावळी तालुक्यातील कुडाळ जवळील डुईकर वाडीतील एक डुईकर नावाचा व्यक्ती मुंबईला चुकून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सापडतो. त्याची रवानगी होते अंदमानात. खुनाची शिक्षा असल्यामु...

दारुड्यांचे कोर्ट

                    *दारुड्यांचे कोर्ट* दारू पिणारे किती महत्वाचे असतात हे आपल्याला कोरोना काळात समजलं आहे. फक्त दारू पिऊन अर्थव्यवस्था नाही तर यांनी यामुळे कमी टेन्शन घेतलं आणि कोरोना काळात अनेक जण या उपायांमुळे वाचलेही. ते म्हणतात ना दारू कमी आणि कधीतरी घेतली तर औषध असते तसच ती कुठे घायची हे ही महत्वाचे आहे. आपल्या देशात तर कायदा आहे तुम्ही रस्त्यावर, गाडीत, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ शकत नाही. अशीच एक खरी घटना जी माझ्या वयस्कर मित्रांसोबत घडली त्याची ही गोष्ट. आता त्यांचे वय 50 च्या वर आहे.    2010-11 ची गोष्ट आहे. संध्याकाळी ऑफिस काम करून दोघे दिल्लीतील एका दारू दुकानात जाऊन दारू घेतात आणि लगेच संपवून घरी जायचे अस ठरवून गाडीत बसून पेग बनवतात. एखादा पेग झाला असेल इतक्यात समोर हवालदार येतो आणि यांचे ग्लास बघून दोघांचे चलांन बनवतो. तेव्हा ते जास्त गांभीर्याने घेत नाहीत पण दुसऱ्यादिवशी जेव्हा मेंदू पूर्ण ताजातवाना होतो तेव्हा ते हडबडतात. कारण लवकरच परदेशात जायचे असते आणि त्यासाठी तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन घ्यायचं असते. तो चलान च...