1 जुलै 2019 व्यस्त आणि challanging दिवस
1 जुलै 2019 व्यस्त आणि challanging दिवस पाऊस थांबत नव्हता आणि पाऊस थांबवा म्हणून आम्हीही थांबत नव्हतो. पावसाळा सुरू झाला होता आणि जुलै चा मुसळधार पाऊस मुंबईत पडत होता. नेहमी प्रमाणे आराध्य काल रात्री उशिरा म्हणजे पहाटेच म्हणू शकतो 2 वाजता झोपला. 1 जुलै ला संध्याकाळी 5 वाजता मला साईट वर जायचे होते. आम्ही सकाळी 9 ला उठलो अंघोळ आणि नास्ता केला. आरुला नास्ता करायला आणि औषधे द्याला 1ते 1:30 तास जातो, 12 वाजता मधवप्रिया मध्ये माझी आणि मानीषाची अपॉइंटमेंट होती तिथे कमीत कमी 1 तास लागतो मग नंतर 3:30 ला ब्राह्मण समाज मध्ये अरुची स्पीच ची अपॉइंटमेंट तिथे 1:30 तास जातो मग 5:30 ला अरुची ओकपेशनल थेरेपी होती तिथे 1:30 जातो. हे सर्व व्यस्त कार्यक्रम आणि त्यात मुसलधार पाऊस चालू होता. मनीषाने सकाळीच नास्ता बरोबर दुपारचे जेवणाचे भाजी आणि भात तयार करून ठेवला, तिने नास्ता केला व मी तिला मधवप्रिया मध्ये पुढे जायला सांगितले नंतर मी जाईन व ती घरी येईल असे ठरवले होते. मी आरुला अंघोळ घातली व नास्ता भरवून औषधें देऊन मम्मी कडे ठेवला व मधवप्रियत गेलो. तिथे गर्दी नव्हती पण एक नवी...