Posts

Showing posts from January, 2023

chattishgarh

Chatishgarh - state of natural resources Chattisgarh is known for mining, steel, coal, cement, and power. State have anicent life style. Lot of area yet covered by jungle. People living ecofriendly simple, co-operative life style.  After maharashtra I love this state.. since 2011 i am continuously visiting to Raipur, bilaspur, korba, champa, raigarh, jagadalpur, dantewada, bhatapara and much more places. I saw the progress and changes happened here.  In this visit, i tried to cover one village life style. Village name is Tulsi. In this village avialable 2 lakes. This is the resource of water for all activities. Old traditional homes, simple lifestyle. Clean environment lovely people is the attraction of chattisgarh. 

आशा आणि अपेक्षा

अनपेक्षित-  जीवन हे अनपेक्षित आहे. तुम्ही कितीही नियोजन करा, विचार करा, येणारी वेळ तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. अनपेक्षित घटना साठी तयार राहणे हे आपले काम आहे. त्या चांगल्या-वाईट दोन्ही असू शकतात. त्यातून पुढे जाणे ही आशा असते.  मला वाटते आशा आपल्याला जिवंत ठेवते. आशा ही क्षितिजावर दिसणाऱ्या मावळत्या सुर्या सारखी असते. तो उद्या उगवेल ही आशा असते, त्याला जबरदस्ती नाही करू शकत. मग ती अपेक्षा होते. अपेक्षा ही आपल्या मनाला हुरहूर लावणारी असते. आशा हिरारी देते, अपेक्षा हिरमोड करू शकते.  आशा नसेल तर निराशा येते पण ती स्वतापूरती असते. अपेक्षा पूर्ण झाली नाही की अपेक्षाभंग होतो आणि तो क्लेशदायक बनतो.  तुम्ही कोणाकडून आशा ठेवा, अपेक्षा ठेवलीत की जास्त अधिकार गाजवला जातो.  आशा आणि अपेक्षा बहिणी नाही तर सासू-सून अशा आहेत असं मला वाटत.  धन्यवाद

करून दाखवणे गरजेच आहे

 तस आपल्या मराठी लोकांना शिकवण असते की  काम करायचं आणि विसरून जायचं. एका हाताने करून दुसऱ्या हाताला कळू नाही द्यायचं. अगदी आपला इतिहास पण इतका दैदिप्यमान आहे पण कोणी तो लिहून नाही ठेवला म्हणून आज आपल्याला इंग्रजांनी संग्रहित केलेलं कागदपत्रे अभ्यासून आपला इतिहास माहिती करावा लागतो.  असो.. 20व्या शतकात व्हिडिओ आणि फोटो ग्राफी नव्हती त्यामुळे असे अनेक किस्से संग्रहित नव्हते.  आता फेसबुक इन्स्टग्राम, युटूब व्हाट्सअप्प वर अनेक असे विडिओ असतात की त्यात अनेक प्राणी, व्यक्ती जीवावर बेतलेल्या परिस्थितीत असतात आणि त्यातून त्यांना काही सज्जन व्यक्ती माणुसकी दाखवून बाहेर काढतात. असले विडिओ प्रसिद्धीसाठी नसून त्यातून इतरांनी प्रेरणा घेऊन समाजात आपणही काही सत्कार्य करू शकतो ही भावना जागृत करणे ही असते.  आजकाल अनेक जण म्हणत असतात कोण कोणाला मदत करत नाही लोक स्वार्थी झाली आहेत. अशा नकारार्थी मानसिकतेला बदलण्यासाठी असे विडिओ बनवणे गरजेचे आहे.  आणि हो अशी कार्य करताना कधी कधी आपण ही त्यात अडकू शकतो, म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असे विडिओ गरजेचे असतात.  धन्यवाद जयंत जगताप

कर भला तो हो भला भाग - 3

*कर भला तो हो भला भाग - 3* दारू वाईट की चांगली या विषयात जायचं नाही आहे. ते पिणाऱ्या व्यक्ती ला माहीत असते तो का पित आहे. पिऊन डोक्याला झिंग येते हे खरं आहे. माणूस स्वतःवरचा ताबा सोडतो आणि कधी कधी जास्त झाली की रस्त्यावर पडतात. दारू पिला की न पिणारे त्याचा तिरस्कार करतात. पण तो पण माणूस आहे हे विसरून कसे चालेलं. याचच भान ठेवून काल छोटस सत्कार्य केलं.   कोपरखैरणे रेल्वे स्टेशन च्या अंडर ग्राउंड बोगद्यातून गाडी घेऊन येत होतो, बोगद्यात थोडं ट्राफिक जाम झालं होतं. तसा बोगदा फक्त येणाऱ्या जाणाऱ्या 2 गाड्या जातील एवढाच आहे. हळू हळू पुढे आलो तसं दिसलं रस्त्यावर 1 माणूस पडला होता. गाड्या त्याला चूकवुन पुढे जात होत्या आणि त्यामुळे दोन्हीकडे जाम लागले होते. मी जसा जसा त्याला क्रॉस करत होतो माझं मन हेलावत होत. जरी याने दारू पिली असली तरी याला अस सोडणं योग्य नाही. चुकून कोणाचे गाडीचे चाक अंगावरून किंवा डोक्यावरून गेले तर जीवाला मुकेल.  मी बोगद्यातून बाहेर कोपरखैरणे side ला आलो,  गाडी बाजूला पार्क केली आणि निघालो. इतक्यात पार्किंग वाला आला आणि गाडी लावू नको बोलला. मी त्याला इथे ग...