Posts

Showing posts from May, 2022

जगतापांची विहीर आणि मळा

           जगतापांची विहीर आणि मळा जावळी तालुक्यातील महू गावात फक्त 5 घरे असणारे जगताप हे गोळे आडनाव नंतर दुसरे जास्त संख्या असलेलं नाव आहे. गावात पाहुणे म्हणून ओळखले जाणारे जगताप घराचे  वंशज साधारण 200 वर्षपूर्वी या गावात वतनावर इथे आले असावेत असे म्हटले जाते. 12 ते 14 पिढ्या इथे राहत असलेलं जगतापांचे जमीन ही वाहागाव, महू आणि पिंपळी शिवारात आहे.  1987 साली जगतापनी शेती साठी गावातील मोठी विहीर खोदली आणि बागायत चालू केली. त्यामुळे त्यांची शेती मळा म्हणून ओळखली जाऊ लागली. शेतात मळा या शब्दाला एक वेगळंच वलय आणि मान असतो तसा ह्या जमिनीला प्राप्त झाला आहे.  पूर्वजांनी कसून आणि सर्व जमीन ओढून पाण्याच्या प्रवाहाला योग्य अशी करून कसदार अशी जमीन तयार केली आहे.  सण 2000 ला विहिरीचे बांधकाम सिमेंट आणि दगडी घेऱ्यात करून घेतले आणि 30 फूट पेक्षा मोठा घेरा असलेली विहीर गावातील सर्वाना पोहण्यासाठी आणि पोहणे शिकण्यासाठी सुरक्षित आणि आवडती झाली.  2000 साली बांधकाम करताना मी स्वतः 10 वि ची परीक्षा देऊन उन्हळ्यात या कामावर होतो मी आणि मोठा चुलत भाऊ निल...

गोपालकृष्ण मंदिर कोची

मागील आठवड्यात बीबीसी मराठीवर एक व्हिडिओ बघितला आणि समजले की कोची मध्ये एक पुरातन मंदिर आहे. अशी तर अनेक मंदिरे आहेत पण या मंदिराची देखभाल बघणारे आणि हे मंदिर स्थापन केले ते सर्व मराठी कुटुंब आहेत.  30 एप्रिल ला मला कामानिमित्त कोची ला जायचे होते, तेव्हा या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायाचे आणि या मराठी बांधवाना नक्की भेटायचे हे ठरवले. आज मंगळवारी 30 एप्रिल ला मंदिरात पोहचलो,  आज कामानिमित्त कोची मध्ये आलो. जसे काम संपले, लॅपटॉप ची बॅग हॉटेल वर टाकून, टॅक्सी केली आणि सरळ गोपालकृष्ण मंदिर, पंडियन रोड वर गेलो.  प्रवेशद्वारातून आत जाताच छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असा फलक दिसला आणि पुढची सर्व पावले अभिमानात कशी पडली ते समजलेच नाही. मंदिरात पुजारी दिसले, त्यांच्याशी सरळ मराठीत बोललो आणि समोरून मराठीत प्रतिसाद आला. ते आहेत सप्रे गुरुजी. मंदिर चा इतिहास त्यांनी सांगितला. 1809 साली जीर्णोद्धार झाला,म्हणजे मंदिर जुने आहे अगदी पुरातन ढाचा आहे, कौलारू छत, चारीबाजुनी भिंती आणि मध्ये मोकळी जागा आहे. 1809 पासून मराठी, गुजराती समाज या मंदिराचे संरक्षण आणि देखभाल करत असतो.  सप्रे, गोखले...

बायको

---------------------------*बायको*--------------------- बायको म्हणजे नवऱ्यावर हक्क गाजवणारी. नवऱ्याचा बैल करणारी. घरातील काम करून घेणारी, ती बोलेल ते ऐकाचेच. तिचा शब्द शेवटचा. अस social मीडिया वर फिरणारे मेसेज बघुन वाटते. 😊 पण खऱ्या आयुष्यात बायको, पत्नी, अर्धांगिनी असते ती पुरुषाची खरी साथीदार,  आधार, सपोर्ट सिस्टिम. बायको असते जी आई नंतर चविष्ट जेवण बनुवन देत असते. जस गाडीत ब्रेक, विमानातील पॅराशूट, जहाजातील life जॅकेट, तस  संसारात बायको असते. जस ब्रेक शिवाय गाडी पळवू शकत नाही, life जॅकेट शिवाय जहाजात बसू शकत नाही, परशूट शिवाय विमान उडवणे म्हणजे धोका असतो, तसं बायको शिवाय संसार होऊ शकत नाही.   नवऱ्याचं मन मोकळं करण्याची जागा, कधी ओरडायची हक्काची व्यक्ती. बाहेर मित्रांनी उगाच हट्ट केला की बायको ओरडेल हा बहाणा तर जगात सगळीकडे चालतो.  कधी पुरुषाला इतर गाड्यांचा ब्रेक दाबायाची इच्छा झाली की हा ब्रेक fail होण्याची रिस्क असते मग पुरुष गॅप गुमान आपला ब्रेक सांभाळतो 😀😀.  तर अशी ही बायको असते, तिला सांभाळून जगणे म्हणजे खर जीवनात परमार्थ असतो.  जयंत जगताप.

शॉर्टकट

    शॉर्टकट चे मोठे अर्थ काही दिवसांपूर्वी ऑफिस काम करत असताना, एक सहकार्याचा फोन आला. कामाचे बोलणे झाले आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु  झाल्या. एक सिनियर सहकारी खूप घाबरून काम करतो, ना स्वतःची बाजू मांडतो ना आमची बाजू मांडतो. त्यावर सहकारी म्हटला त्याच्याकडे G मध्ये D नाहीये. हे शॉर्टकट मला कळत नाहीत लवकर.   मी छोटा g काढला त्याला उलटा केला 6 झाला, पण छोटा d आणि मोठा  D काही त्यात बसला नाही.  सुरवातीला जेव्हा मोबाइल आला तेव्हा, SDGN असे मेसेज यायचे, मला वाटायचं हे चुकून आलं असणार, सहा महिने मी त्याकडे लक्ष दिले नाही, मग अजून एकाच्या मोबाइल मध्ये तेच SDGN दिसले आणि त्याला अर्थ विचारला तेव्हा समजले.  असेच H R U , w r u, C T H, I F, TC असे अनेक शॉर्टकट काळलायल वेळ लागला.  चला मग तुमच्याकडे कोणते कोणते शॉर्टकट आहेत ते सांगा बरं

फोऊजीच लग्न

                         *फोऊजीच लग्न*   खरतर आम्ही नशीबवान आहे की आम्हाला 3 मावश्या लाभल्या. तसं अनेकांना अनेक मावश्या असतात पण सर्वामध्ये घट्ट बॉंडिंग नसत जस यांच्या मध्ये आहे.  आई वडील लवकर देवाघरी गेल्यामुळे या चौघी एकमेकींच्या आधार बनल्या. तसा मोठा भाऊ आहे. तो त्याच्या संसारात रमला आणि या चौघीनी एकमेकींना इतकं जवळ आणलं की जस ही चार घर नसून एकच घर वाटू लागलं. त्यात दोघी-दोघी एका गावात आणि घरही जवळच. पहिली आणि तिसरी महू मध्ये तर दुसरी आणि चौथी पानस मध्ये. त्यात पहिली आणि चौथी शेतीत आणि दुसरी आणि तिसरी मुंबई -गाव करत असे. त्यामुळे कुठेही असल्या तरी एकमेकींना सोबत असत. लहानपणी उन्हाळ्यात आमचं वास्तव्य इंदू मावशी कडे असायचं. माझा चेहरा सुमा मावशी सारखा दिसतो आणि वंदा मावशी माझी लाड करणारी मावशी. असच सर्व मुलांचं सर्व मावश्या बरोबर वेगवेगळ नात आहे. कधी कधी आई पेक्षा या मावश्या जवळच्या वाटतात.  चौघींचे मूल मुलीही त्यांची वडील नाती सांभाळून इकडे रमललेली. आम्ही ही सक्के भाऊ बहीण सारखे एकमेकांना सांभाळून राह...

कर भला तो हो भला

               *कर भला तो हो भला -1 कधी कधी कळत नकळत आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याची परतफेड कधी ना कधी होत असते. किंवा अस म्हणा कधी कधी आपल्याला माणुसकी दाखवणारे असे लोक भेटतात की आपण ही कोणाला ना कोणाला मदत करायला प्रेरित होतो.  माझ्या बाबतीत गेल्या 1 महिन्यात 2 वेळा असे प्रसंग घडले.  पहिला प्रसंग नवीनच घेतलेली 2nd hand चारचाकी गाडी घेऊन ऐरोली कडून कोपरखैरणे कडे येत होतो. सोबत बायको आणि मुलगा होतेच.  कोपरखैरणे रेल्वे undergornd ब्रिज मध्ये ट्रॅफिक लागले होते. हळू हळू पुढे सरकत असताना नेमकं right कॉर्नर घेताना गाडी बंद पडली.4-5 वेळा फुल्ल स्टार्ट देऊन पण गाडी चालू झाली नाही, उताराचा फायदा घेऊन गाडी थोडीशी एका बाजूला लावली आणि खाली उतरणार इतक्यात गाडी समोर 1 enfiled bike उभी राहिली आणि 1 रुबाबदार व्यक्ती उतरून आमच्याकडे येऊ लागला. मनात वाटलं हा पोलीस आहे आणि आता fine लावणार. इतक्यात तो जवळ पोहचला नी अदबीने विचारले गाडी बंद पडली काय? मी चाचपडत हो म्हटलं. त्याने अजून 1 2 प्रश्न विचारले आणि विचारले मी धक्का मारला तर ...