सार्वजनिक कार्य
*माझा अनुभव सार्वजनिक कामाचा* सार्वजनिक कार्य चालू करताना विरोधक हे असतातच. त्यांना कामाचे स्वरूप सांगून कामाची सुरुवात करणे गरजेचं असते पण अस सांगून ही विरोध राहत असेल तर जास्त चुचकरात बसणे योग्य नसते. सार्वजनिक कार्य हे सार्वजनिक सभा(मिटिंग) घेऊन पुढे नेले जाते, ज्यांना सहभाग घ्यायचा असतो ते अशा मिटिंग ला हजर राहून सहभाग घेतात. एकदा कार्य चालू झाले की वयक्तिक हेवेदावे सोडून हाती घेतलेले कार्य कसे पूर्ण होईल त्यावर लक्ष देणे गरजेचे असते. जुन्या चुका परत परत काढत बसणे म्हणजे चालू कार्याचा वेग मंदावणे असते. त्यामुळे भविष्यात नवीन कार्य हाती घेताना कार्यकर्ते कचवतात. सहसा जे कार्यात शामिल नसतात तेच विरोधात उभे असतात. कार्य होताना सहभाग न घेता, नंतर आपले ज्ञान झाडून चुका काढणारे म्हणजे साप मेल्यावर धोपाटे टाकण्यासातखे असते. सार्वजनिक कार्यात प्रश्न विचारावे पण त्याआधी त्यात सहभाग घ्यावा, करण त्यातच अर्धे प्रश्न सुटून जातात. कार्य पूर्ण होताना शेवटची वीट महत्वाची असते, पण पहिली वीट लावणारा कधीही श्रेष्ठ असतो. कारण सुरवात करणे कधीही धाडसाचे असते. महाभारत मध्ये श्रीक...