आराध्य 12 जून 2023

आज 12 जून 2023. आज आराध्यची शाळा सुरू होणार होती पण काही कारणाने 2 दिवस पुढे ढकलली गेली. तसेच आज 12 वाजता त्याचे etc मधील थेरेपी सेशन चालू होणार होते. मी माझं ऑफिसच काम आटोपून त्याला घेऊन जाणार होतो. मनीषा आमचे डब्बे तयार करायच्या घाईत होती. जेवण बनवत होती. त्यात ही अगोदर मी त्याला खेळवले होते आणि नंतर मनीषा त्याला खेळवत होती. ते करत करत ती 2 मिनटं किचन मध्ये गेली आणि आराध्य चिडला. त्याला आमचा वेळ हवा होता. 
अगोदर तो मुख्य दरवाजाकडे आला आणि मागच्या बाजूने डोकं आपटलं आणि तसाच पळत जाऊन खिडकी च्या ग्लास वर डोकं आपटलं. तो पळत गेल्यामुळे त्याचा वेग आणि फोर्स ने सरळ काच फुटली खळळ असा आवाज झाला. आराध्य काच फुटून, उलटा गॅलरीत डोक्यावर पडला होता. मी लगेच पळत गेलो. मांडीत एक काच घुसली होती, ती कशी तरी मी ओढून काढली आणि आराध्य ला उचललं. 
काचेवर डोकं आपटलं तिथे लागलं होतं, डाव्या कानाच्या मागे कापलं, डाव्या पाठीवर खोल जखम झाली, मांडीला लागले, आणि सर्वात जास्त उजव्या हाताच्या करंगळी च्या बुंदयात मोठी जखम झाली होती. अंगावर काचेचा चुरा पडला होता. कसा तरी त्याला बाथरूम मध्ये नेला आणि पाण्याने धुऊन काढला. रक्त खूप गेले होते. हळद लावून जखमा मधील रक्त थांबवले. 
मी आणि मनीषा दोघे ही खूप घाबरलो होतो. जीवावर बेतलेला हा प्रसंग होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. 
देवा आम्हाला सशक्त बनव की आम्ही आमच्या मुलाची काळजी घेऊ शकू. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)