Posts

Showing posts from January, 2026

अफवांमधून तयार झालेले वलय

      अफवांमधून तयार झालेले वलय अजून पर्यंत अजित दादा अनेकांना वैयक्तिक आवडले नव्हते  त्याचं नाव आलं की समोर 70 हजार करोड आणि धरणात मूतन एवढच समोर येत होत.. पण ते असे अचानक गेले हे ऐकल्यावर मनात एक चर्र होऊन जात तस वाटलं दादा गेल्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी ओक्साबोक्सी होऊन फोडलेला हंबरडा पाहून मन व्याकुळ झाल.. वाटलं लाखाचा माणूस गेला हे सर्व आता realize होतंय माणूस किती कामाचा होता यातून मनात विचार आला.. अजित दादा खरे होते काय आणि त्यांना न ओळखणाऱ्या फक्त एखाद्या भेटीतून किंवा ऐकीव माहितीवरून लोकांनी त्यांची एक निगेटिव्ह इमेज तयार केली होती.  दादा तोंडावर जे काय असेल ते बोलायचे. काम होत असेल तर हो नाहीतर नाही. यातून काहीजण दुखवत असणार आणि अशी माणसं मग स्वतःच्या मनाने अजित दादा लय उद्धट, लोकांची त्यांना कदर नाही, समाजात, राजकारणात  कसे वागावे हे त्यांना कळत नाही अशा अफवा उठवत बसणार.  समाजात सुद्धा काही स्वार्थी, समाजकंटक, दुसऱ्याला नावे ठेवली की आपण श्रेष्ठ होतो असा गैरसमजात रहाणारी वृत्तीची माणसे असतात. ज्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत क...

योग्य लोकांना जपा

  *लोकांना जपा त्यांचे कार्याचे आजच कौतुक करा.*  परवा अचानक अजित दादांची जीवनयात्रा संपली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर प्रेम करणारे त्यांचे चाहते हळहळले. कामाचा माणूस, सतत जनतेसाठी धडपडणारा, 17-18 तास काम करणारा. सामान्य लोकांना मोठा करणारा, दिलेला शब्द पाळणारा, तोंडावर खर बोलणारा, अशी अनेक स्तुती सुमन त्यांच्यावर उधळली जात आहेत. पण खंत ही आहे की त्यांच्या या कर्तृत्वाची पोचपावती ऐकायला, बघायला ते स्वतः हयात नाहीयेत. दादा हयात असताना अनेकदा त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांकडे खंत व्यक्त केली होती की मी एवढा कामाचा माणूस मग माझ्यावरच एवढी टीका का केली जात आहे? का इतका रोष माझ्यावर. एका भाषणात तर ते उद्वेगामधे म्हणतात आता या सर्वाचा कंटाळा आला आहे. इतक करूनही लोकांना त्याची कदर नाही. आणि आज ते आपल्यात नाहीयेत तर आपल्याला त्याचं महत्व समजतंय. त्यांनी परत यावे म्हणून आपण देवाला विनवण्या करतोय.   यातून शिकण्यासारखं आहे की आपल्या आजूबाजूला पण अशी कामाची माणसं असतात जी सर्व झोकून देऊन आपल्या समाजासाठी झटत आहेत, सामाजिक कार्यात स्वतःहून वेळ काढून ते कार्य तडीस नेत आहेत. त...

दहीहंडी आणि शिवसेना शाखा

दहीहंडी आणि शिवसेना शाखेच्या आठवणी साल 2000 ची गोष्ट असेल. नवी मुंबई आता कुठे गजबजायला लागली होती. लोकसंख्या वाढ होऊ लागली होती अनेक नवीन लोक बाहेरून या शहरात येऊन वसत होते. आम्ही 1993 ला आलो तेव्हा बऱ्यापैकी गावाचे जीवन इथे होते ते आता शहरी करण होत होते. त्याप्रमाणे शहरांचे नगरसेवक प्रभाग देखील बदलत होते. सन2000 आधी संपूर्ण कोपरखैरणे म्हणजे सेक्टर 1 ते सेक्टर 23 यांचा एकच मतदार संघ होता. तो आता 4-4 सेक्टर मध्ये विभागला होता. आम्हाला नुकतीच मिसरूढ फुटली होती. सामना पेपर वाचून आणि मोठांकडून ऐकून आम्हीं सुद्धा बाळासाहेबांचे कट्टर सैनिक बनण्याच्या प्रक्रियेत होतो.  कॉलेज झालं की संध्याकाळी जवळील शिवसेना शाखेत जायचं आणि हजेरी रजिस्टर मधे नाव लिहायचं आणि पद लिहायचं शिवसैनिक   आमच रोजच काम शाखाप्रमुख होते सुरेश सालदार दादा हे.  . हे रोज करत करत आम्ही तेथील मोठ्या लोकांच्या ओळखीचे झालो. हळू हळू दहीहंडी पथकात समाविष्ट झालो. सन 2000 ते 2003 पर्यंत दहीहंडी पथकाचे महत्वाचे घटक बनलो. शिवशाही दहीहंडी पथक. मी आणि अवि 1 नंबर शिडी सांभाळायचे आणि महेंद्र बाबू आमच्या समोरच्या 3 नंबर श...

जिजाऊ डायरी

दिनांक 14.1.2026 वेळ पहाटे 3:15am स्थळ cloud nine hospital vashi room no 05.  birth date 12.1.2026 वेळ 5.45PM          जिजाऊसाठी पहिला लेख एक असते आई.. जी आपल्यासाठी सर्वकाही समर्पित करते.. मग आपल्या आयुष्यात येते पत्नी.. जी आपल्यासाठी सर्व काही त्यागून आलेली असते... आई आपले लाड करते.. पत्नी आपल्याला जबाबदार बनवते.. पण त्यानंतर आपल्या आयुष्यात येते आपली मुलगी.. जी शिकवते आपल आयुष्य किती महत्वाचं आहे.. कारण आता आपलं सर्वकाही तिच्यासाठी असते.. तिच्यासाठी त्याग असतो, समर्पण असते.. लाड असतात.. बाप बनणे एक सुंदर फिलिंग आहे. पण मुलीचा बाप बनणे म्हणजे सर्वोत्तम फिलिंग आहे..  आज दुसरी रात्र जागत आहे.. गेले 2 दिवस भूक, झोप सर्वकाही विसरलो आहे.. आराध्यसाठी त्याचा वेळ द्यायचा ही जबाबदारी आहे.. आणि जिजाऊ साठी रात्र जागून काढायची हा आनंद आहे..  जयंत जगताप

लोकशाहीचे सण - निवडणुका

          लोकशाहीचे सण - निवडणुका लोकशाही ही संस्कृती मानली तर निवडणुका ह्या या संस्कृतीचे सण आहेत.  लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, सरपंच, महानगरपालिका, पोटनिवडणुका अशा अनेक निवडणुका त्या त्या प्रकारे साजऱ्या केल्या जातात.  लोकसभा, विधानसभा ह्या मोठ्या लोकसंखेच्या असतात त्यामुळे तिथे सामान्य जनतेचे कमी सहभाग असतात. नेते, पदाधिकारी अशा निवडणुका सांभाळून थोडेफार कार्यकर्ते यात सहभागी असतात.   पंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या निवडणुका खऱ्या अर्थाने जनतेच्या असतात. इथे उमेदवार हा स्थानिक, आपल्या आजूबाजूचा, ओळखीचा, नात्यात, मित्र, शेजारी असा असतो. विरोधक पण कसे ना कसे ओळखीचे असतात. इथे खरा निवडणुकीचा सण जमिनीवर साजरा होतो.  मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महाराष्ट्रातील महानगरांच्या महानगरपालिका निवडणुका 2015 सालात झाल्या होत्या. 2020 मध्ये कोरोना आला आणि निवडणुका रद्द झाल्या त्या झाल्याच. त्यामुळे अनेक नवीन कार्यकर्त्यांची नगरसेवक व्हायची स्वप्ने पुढे ढकलली गेलीत. 2023 पासून निवडणुका लागतील ...

नगरसेवकांसाठी काही नवीन उपक्रम

   नगरसेवकासाठी काही वेगळे आणि नवीन उपक्रम आता महानगरपालिका निवडणुका लागल्या आहेत.  सर्वच उमेदवार बेसिक घेऊन प्रचार करत आहेत पण रस्ते, खड्डे, वीज, पाणी, टॉयलेट लाईन खराब होत राहतात आणि त्या बदलत राहणे हे बेसिक काम आहे. यासाठी निधी आणणे आणि ती करून घेणे हे पालिकेचे काम असते आणि त्यासाठी सामान्य जनता कर भरत असते.  आपला नगरसेवक या व्यतिरिक्त खालील उपक्रम राबवून आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने विकास साधून आपला वेगळा ठसा उमटवू शकतात.  1. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करणे. 2. प्रतिवर्षी MPSC, UPSC मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे.  3. दरवर्षी विविध खेळ स्पर्धा आयोजित करणे. (बॅडमिंटन, कब्बडी,) 4. विभागातील हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान आणि महात्मा जोतिबा फुले योजना सुरू करून घेणे.  5. दरवर्षी महाराष्ट्रातील एक देवस्थान दर्शन सहल काढणे. (जेष्ठ नागरिक) फक्त घरमालक.  जयंत जगताप