दहीहंडी आणि शिवसेना शाखा
दहीहंडी आणि शिवसेना शाखेच्या आठवणी
साल 2000 ची गोष्ट असेल. नवी मुंबई आता कुठे गजबजायला लागली होती. लोकसंख्या वाढ होऊ लागली होती अनेक नवीन लोक बाहेरून या शहरात येऊन वसत होते. आम्ही 1993 ला आलो तेव्हा बऱ्यापैकी गावाचे जीवन इथे होते ते आता शहरी करण होत होते. त्याप्रमाणे शहरांचे नगरसेवक प्रभाग देखील बदलत होते. सन2000 आधी संपूर्ण कोपरखैरणे म्हणजे सेक्टर 1 ते सेक्टर 23 यांचा एकच मतदार संघ होता. तो आता 4-4 सेक्टर मध्ये विभागला होता. आम्हाला नुकतीच मिसरूढ फुटली होती. सामना पेपर वाचून आणि मोठांकडून ऐकून आम्हीं सुद्धा बाळासाहेबांचे कट्टर सैनिक बनण्याच्या प्रक्रियेत होतो. कॉलेज झालं की संध्याकाळी जवळील शिवसेना शाखेत जायचं आणि हजेरी रजिस्टर मधे नाव लिहायचं आणि पद लिहायचं शिवसैनिक आमच रोजच काम शाखाप्रमुख होते सुरेश सालदार दादा हे. . हे रोज करत करत आम्ही तेथील मोठ्या लोकांच्या ओळखीचे झालो. हळू हळू दहीहंडी पथकात समाविष्ट झालो. सन 2000 ते 2003 पर्यंत दहीहंडी पथकाचे महत्वाचे घटक बनलो. शिवशाही दहीहंडी पथक. मी आणि अवि 1 नंबर शिडी सांभाळायचे आणि महेंद्र बाबू आमच्या समोरच्या 3 नंबर शिडीवरून ट्रिपल एक्का घेणाऱ्याला हात द्यायचा. माझा आणि अविचा 1-1 खांदयावर मोठे मोठे पाय देत बिल्डर आजू उभा रहायचा आणि आमचा कस काढायचा पण आम्ही समोर महेंद्र ने हात दिला की त्याचे चेहऱ्यावर वजनामुळे जे हावभाव यायचे ते बघून जाम हसायचो. त्या 2 मिनिटांच्या थर लावण्याच्या क्षणात सुद्धा आम्ही स्वतःच्या अंगावरील वजन विसरून महेंद्राची टर उडवायचो. तो बिचारा दात ओठ आवळून एक्का उचलणारा स्थिर उभा रहावा यासाठी प्रयत्नांची शर्थ करायचा. थर पडला की आम्ही वरच्याना पकडायचो पण महेंद्र सरळ थरात पडायचा आणि अंगावर 3-४ पडायचे. असे अवघड आणि जीवावर बेतनारे ही दही हंडी असायची पण देवाच्या कृपेने कधी कुणाला जास्त इजा झाली नाही.
अशा प्रकारे 2000 ते 2003 या काळात आम्ही 4 वर्ष. दहीहंडी पथक गाजवले.
तेव्हा शाखा म्हणजे सर्वांच्या जमण्याची जागा होती. शाखा शब्दाला जे वजन आजही आहे ते जनसंपर्क कार्यालय या शब्दात नाही जाणवत. शाखा म्हणजे जशी झाडाचे खोड असते आणि त्यापासून एक फांदी (शाखा) निघते आणि त्यावर मग पानांचा बहर असतो.ती शाखा.
यावर्षी माघी गणेश जयंती निमित्त आमचे 2000 मधील दहीहंडी चे मित्र परिवार साई गोल्डन स्टार मित्रमंडळाचे सहकारी भेटले आणि या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
जयंत जगताप
Comments
Post a Comment