*गोट्या* मोबाईल नव्हता तेव्हा लहानपणी हमखास खेळला जायचा खेळ म्हणजे गोट्या. गोट्या म्हटले की आपल्याला आठवत काचेच्या गोट्या, हाडकी गोट्या. अजून कोणाला काय आठवेल याचा नेम नाही. 😀आपण खेळायच्या गोट्या आठवू. काचेच्या गोट्या नी रिंगण, गल-गल, राजा राणी, आटी हे खेळ खेळले जायचे. गलीच्या खेळात अगोदर एक ठराविक अंतरावरून गलीजवळ गोटी टाकायची असते त्याला कचून ये किंवा कच अस म्हटल जायचं. कचताना लक्ष्य असते ते गलीत गोटी घालवायचीज्याची सर्वात javaln ज्याराज्य असायचे तो बोटांनी खुरटत गली कडे पोहचण्याचा प्रयत्न करायचा आणि बाकीचे त्याला गोट्यानी नेम धरून जमेल इतकं लांब उडवायचे. दुसरा प्रकार आटी यात गोल करून प्रतेक खेळाडू आपल्या गोट्या ठेवणार हा खेळ डेरींग असतो यात कचून आले की जो सर्वात दूर असेल त्याला त्या रिंगणातील 1 गोटी अचूक उडवायला सांगितली जाते. जर त्याने ती उडवली आणि इतर गोट्या न लागता रींगणाबाहेर गेली तर अक्का डाव त्याचा असतो. जर नेम उखला तर दुसऱ्याला संधी. तिस...