गोट्या
*गोट्या*
मोबाईल नव्हता तेव्हा लहानपणी हमखास खेळला जायचा खेळ म्हणजे गोट्या. गोट्या म्हटले की आपल्याला आठवत काचेच्या गोट्या, हाडकी गोट्या. अजून कोणाला काय आठवेल याचा नेम नाही. 😀आपण खेळायच्या गोट्या आठवू. काचेच्या गोट्या नी रिंगण, गल-गल, राजा राणी, आटी हे खेळ खेळले जायचे. गलीच्या खेळात अगोदर एक ठराविक अंतरावरून गलीजवळ गोटी टाकायची असते त्याला कचून ये किंवा कच अस म्हटल जायचं. कचताना लक्ष्य असते ते गलीत गोटी घालवायचीज्याची सर्वात javaln ज्याराज्य असायचे तो बोटांनी खुरटत गली कडे पोहचण्याचा प्रयत्न करायचा आणि बाकीचे त्याला गोट्यानी नेम धरून जमेल इतकं लांब उडवायचे.
दुसरा प्रकार आटी यात गोल करून प्रतेक खेळाडू आपल्या गोट्या ठेवणार हा खेळ डेरींग असतो यात कचून आले की जो सर्वात दूर असेल त्याला त्या रिंगणातील 1 गोटी अचूक उडवायला सांगितली जाते. जर त्याने ती उडवली आणि इतर गोट्या न लागता रींगणाबाहेर गेली तर अक्का डाव त्याचा असतो. जर नेम उखला तर दुसऱ्याला संधी. तिसरा प्रकार रिंगण. यात एक एक करून नेम धरून रींगणात्याला गोट्या उडवायच्या. यात एक ट्विस्ट असतो. रिंगणातील गोट्या न उडवता जर खेळातील सर्व खेळाडू नेम धरून उडवले तरी डाव आपला होतो. यात जोडी जोडी ने देखील खेळले जायचे.
गावाकडे लहानपणी या हाडक्या गोट्याना अंड समजून कावळा चोचीत घेऊन जायचा. हाडकी क्या गोट्या सहसा एक एक असायच्या त्यांनी राज्य खेळले जायचे. गोटी ने गोटी उडवत उडवत लांब घेऊन जायची आणि मग जिथे राज्य संपेल तिथून ज्यावर राज्य असेल त्याने लंगडी घालायची.
अशी ही गोट्यांची धमाल होती. कोण मटकी भरून ठेवायचा. कोण बाटल्या भरून ठेवायचा. कोणाला गोट्या खेळतो म्हणून घरी मार बसायचा म्हणून शेतात मातीत पुरून ठेवायचे.
आजकाल मुलांची बोट मोबाईल वर खेळून दुखतात पण गोट्या खेळून बोट आणि तळहात मातीत कडक व्हायचे. सोबत 2 पायावर बसून नेम धरणे. Planning करणे अशा अनेक गोष्टी नकळत शिकल्या जायच्या.
आज गार्डन मध्ये फिरताना मूल गोट्या खेळताना दिसली आणि खेळायची हौस भागवली आणि ह्या आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद
जयंत जगताप.
Comments
Post a Comment