Posts

Showing posts from March, 2025

विलास जगताप जन्मदिवस शुभेच्छा

      विलास जगताप जन्मदिवस शुभेच्छा  श्रीगणेश मित्र मंडळाची आण बाण आणि शान मोकाशी भावकीची जान  जगताप घराण्याचे निशाण जे आहेत गुणांची खाण,  ज्यांना आहे आपल्या सामाजिक कर्तव्याचे भान.. सर्वांसाठी नेहमी झटावे याची आहे त्यांना जाण..  असे सर्वांचे लाडके विलास साहेबांना विनंती, आपण स्वीकारावा आमच्याकडून.... जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छाचा मान.  जयंत जगताप. 

*सर्विस सेल्स अँड क्रिकेट*

             *सर्विस सेल्स अँड क्रिकेट* यहा पे क्रिकेट और बिझनेस को एक दुसरे के साथ रिलेट किया है वो मैं आपको सुनाता हू.   टेस्ट मॅच 90 ओव्हर का होता है और हमारे क्वार्टर 90 दिन के होते है,   फील्ड सर्विस टीम हमेशा 2nd बॅटिंग करती है,  क्योंकी वो हमेशा टार्गेट चेस करते है..  हमारे कस्टमर हमारे बॉलर्स होते है.  उनकी गेंदे हमारे लिये enquiry होती है. उसे बॅट से हिट कराना मतलब PO में कन्व्हर्ट करना होता है. बॉल को सीमा रेषा की बाहर भेजना मतलब रेव्हेन्यू होता हैं.  हमारे फायनान्स, लीगल अँड ऑपरेशन टीम फील्ड के दो अंपायर होते है. जो हर बॉल को चेक कर के गुड बॉल है, या वाईड है ये डीसाइड करते है.  बीच मैदान मे, PO checking, बुकिंग, मटेरियल अवेलबिल्टी, डॉक्युमेंट्शन, पेमेंट टर्म, ये सब फिल्डर होते है,   सबसे बेस्ट फिल्डर पेमेंट कलेक्शन होता है जो बॉन्ड्री पे खडा होता है, और कभी कभी रेव्हेन्यू के सिक्स को वापस अक्युरल और डिफरल के रूप में सीमारेषा के अंदर भेजता है.  यहापे थर्ड एम्पायर के रूप में AR होता ह...

माझे सामजिक कार्य

माझे लिखाण हे सामाजिक,  आणि स्थळांवर असते.  विषयांवर लिखाण करत असतो, गावचा छबिना, यात्रा, दसरा, गणेश उत्सव यासारखे सण. सोबत काही गावातील आठवणीतील ठिकाणे, जस, पाटी, पवळी, वड, धरण यावर लिखाण झाले आहे.  काही मान्यवर व्यक्ती जसे  विठ्ठल सरपंच, स्वामी, रवी रांजणे, शंकर दादा, भरत गोळे, ढोलची परंपरा, लेझिम खेळ आणि रवी शिंदे, तसेच काहींनी आवर्जून लिहायला सांगितले होते ते आनंदराव गोळे (वाडी) संतोष गोळे(कोंबडीवाले), ह भ प गुलाब दादा गोळे. असे अनेकांवर लिखाण झाले आहे.  विठ्ठल अण्णा वर लिहाल तेव्हा अवी ने फोन करून सांगितले होते की ते काहीजणांना आवडत नाही ये, तो माणूस भ्रष्ट आहे, ते लिहलेले डिलिट कर. मग ते डिलिट केलं होत.  सामजिक कार्य: मुंबईला गणपती मंदिरात बांधकामात आणि आता ते सांभाळण्यात योगदान, श्रीराम मंदिर आयोध्य साठी वर्गणी गोळा करणाऱ्या टीम मध्ये. तेव्हा येणाऱ्या अनुभवावर कधी कधी टिप्पणी केली आहे. (स्टेटस). मी रेगुलर रक्तदाता आहे.  गावातील मंदिरासाठी थोड श्रमिक आणि थोड आर्थिक जमले देणगी दिली आहे.  लेख का डिलिट केला?  श्री गणेश मित्र मंडळाचे पदाधिक...

रक्त पिसासू

                   *रक्तपिसासू*  एका जंगलात एक जबरदस्त, डौलदार सर्वात मोठा, धाडसी, जंगलाचे रक्षण करणारा, सर्वांना सांभाळून घेणारा असा भला मोठा हत्ती होता. इतर ही हत्ती होते पण याची शान वेगळीच होती. अनेक तरस, कोल्हे, लांडगे, गिधाड, गोचीड यावर डोळे लाऊन होते, की कधी याला आम्ही खाऊ. तस लांडगे आणि तरस कधी कधी यावर हल्ला करायचे आणि लचके तोडायचे. पण हा सक्षम होता त्यामुळे पुन्हा धडधाकट होऊन उभा राहायचा आणि इतर सर्व प्राणी आणि पक्षी यांचं रक्षण करायचे. कोल्हा मात्र याच्यापासून दूर असायचा. हळू हळू कोल्हा या हत्तीचा मित्र झाला. तरस आणि लांडगे यांची चाहूल लागली की तो हत्तीला सावध करायचा. या मुळे हत्तीला आणि इतर प्राण्यांना कोल्हावर प्रचंड विश्वास बसला आणि त्यांनी कोल्हांच्या हातात हत्तीच्या रक्षणाची जबाबदारी दिली. जंगलाचा हा भाग कोल्हा सांभाळू लागला आणि पूर्ण जंगलाचा राजा सिंह ही निश्चिंत झाला. आता कोल्हा हत्तीच्या गंडस्थळावर बसू लागला. इकडे लांडगे आणि तरस यांची ससेहोलपट होऊ लागली. त्यांनी संधी बघून कोल्ह्याला जाळ्यात ओढलं  आणि त्याच्याश...

संतोष देशमुख अमर रहे

 कै. संतोष देशमुख अमर रहे... "माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलीसाठी आणि मुलासाठी मला जिवंत ठेवा."  खरतर राजकीय विषयावर लिहायचे नाही असा प्रण करून आता 3 वर्ष झालीत आणि बऱ्यापैकी तो पाळला देखील.. पण गेले 1 महिनाभर संतोष देशमुख यांचा हत्याकांडचा विषय चालू आहे. आणि त्यात जी आता माहिती समोर आली आहे की किती क्रूर पणे त्यांची हत्या केली आहे ते ऐकून आणि वाचून मन सुन्न झाले आहे. आतून  अस गदगदून येत आहे. रोज रात्री झोपताना संतोषदादा किती व्याकुळतेने आपल्या जीवाची भीक मागत असतील हे डोळ्यासमोर येत आहे आणि अस्वस्थ होत आहे.  आणि का तर स्वतःसाठी नाही तर आपल्या जीवापालीकडे जपलेल्या मुलीसाठी आणि मुलासाठी.  सरपंच म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते, गावकरी म्हणून त्या आपल्या वाचमनला वाचवत होते, गावच्या हद्दीत कंपनी सुरू होत होती त्याने गावचा विकास होत होता, गावात रोजगार येत होता. पण या गिधाडांना लचके तोडायला भेटले नाही म्हणून सरळ सरळ एका वाघावर झडप घातली. या हरामखोरांना खायला भेटावे म्हणून एक कर्तृत्ववान सरपंच, एक बाप, एक कुटुंबाचा प्रमुख यांनी हिरावून टाकला. मारताना इतके निर्दयी झाल...