माझे सामजिक कार्य

माझे लिखाण हे सामाजिक,  आणि स्थळांवर असते.  विषयांवर लिखाण करत असतो, गावचा छबिना, यात्रा, दसरा, गणेश उत्सव यासारखे सण. सोबत काही गावातील आठवणीतील ठिकाणे, जस, पाटी, पवळी, वड, धरण यावर लिखाण झाले आहे. 
काही मान्यवर व्यक्ती जसे  विठ्ठल सरपंच, स्वामी, रवी रांजणे, शंकर दादा, भरत गोळे, ढोलची परंपरा, लेझिम खेळ आणि रवी शिंदे, तसेच काहींनी आवर्जून लिहायला सांगितले होते ते आनंदराव गोळे (वाडी) संतोष गोळे(कोंबडीवाले), ह भ प गुलाब दादा गोळे. असे अनेकांवर लिखाण झाले आहे. 
विठ्ठल अण्णा वर लिहाल तेव्हा अवी ने फोन करून सांगितले होते की ते काहीजणांना आवडत नाही ये, तो माणूस भ्रष्ट आहे, ते लिहलेले डिलिट कर. मग ते डिलिट केलं होत. 
सामजिक कार्य: मुंबईला गणपती मंदिरात बांधकामात आणि आता ते सांभाळण्यात योगदान, श्रीराम मंदिर आयोध्य साठी वर्गणी गोळा करणाऱ्या टीम मध्ये. तेव्हा येणाऱ्या अनुभवावर कधी कधी टिप्पणी केली आहे. (स्टेटस). मी रेगुलर रक्तदाता आहे. 
गावातील मंदिरासाठी थोड श्रमिक आणि थोड आर्थिक जमले देणगी दिली आहे. 

लेख का डिलिट केला? 
श्री गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी संतोष जगताप यांनी सांगितले, लेख छान आहे पण  मंडळावर हा सामाजिक लेख नको. म्हणून केला. 
स्टेटस: स्टेटस ठेवणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणी बघावे ते त्याचे त्याने ठरवावे. तिथे कोणी काय ठेवते हे कोणी ठरवू शकत नाही. जगात फक्त एकच ठिकाणी अशी काम सुरू नसतात. 
भवकीचा ग्रुप:
भवकीच्या ग्रुप वर कोणी काय लिहावे ते भावकी बघेल. इथे त्याचा संबंध नाही. 


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)