Posts

Showing posts from August, 2024

पूर्व भारत - 7 बहिणी North East 7 sisters

पूर्व भारत - 7 बहिणी North East 7 sisters. भारताच्या पूर्वेला असलेली सात राज्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझरोम, मेघालय आणि त्रिपुरा.  गेले 17 वर्षाच्या service Engineer च्या नोकरी मध्ये पूर्ण भारत फिरून झाला, अगदी गाव गावात, जंगलात, समुद्र किनारे आणि जहाजात ते छतीसगड च्या दंतेवाडा सारख्या नक्षली बहुल परिसरात जाऊन आलो. पण 2024 पूर्व भारत फिरणे झाले नव्हते. तिकडची संस्कृती, राहणीमान, जंगले, इतर भरता पेक्षा वेगळी भाषा, भोजन संस्कृती ते वेगळे दिसणे हे सर्व खुणावत होते.  2024 मध्ये भारतच्या सर्व सीमा अद्यावत उपकरणांनी सुरक्षित करण्याचं काम कंपनी ल भेटले आणि ती मशिनरी लावायच्या कामाचा मॅनेजर म्हणून मला जबाबदारी देण्यात आली. पहिली भेट झाली ती पाकिस्तान च्या अट्टरी बॉर्डरची.  त्यानंतर पश्चिम बंगाल मधून बांगलादेश बॉर्डर चे काम सुरू केले. आणि मग पूर्व भारतात पाय ठेवायची मला संधी मिळाली. त्रिपुरा मधील आगरतला एअरपोर्ट वर पहिल्यांदा उतरलो. त्यानंतर आसामचे सिलचर, मेघालयचे शिलाँग, मणिपूरचे इंफाळ असे मागोमाग 4 राज्ये अनुभायची आणि बघायची संधी मिळाली. यात मला शिकायला भेटले इ...

संजीव नाईक पत्र

प्रति  मा. श्री. संजिवजी गणेश नाईक साहेब    मा. खासदार ठाणे लोकसभा. विषय: कोपरखैरणे सेक्टर 4 मधील गणेश मंदिर पाणी व्यवस्था व संरक्षण कठडा काम करणेबाबत. महोदय, कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे. सन 2014 मध्ये नवी मुंबईचे विकासाचे शिल्पकार लोकनेते आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब (दादा) यांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झाला आहे.   सध्या मंदिर व्यवस्थापनास मंदिर सांभाळण्यासाठी पाण्याच्या कनेक्शनची व मंदिर पाठीमागे बांधकाम बाकी आहे ते करून हवं आहे.  आपणास विनंती वरील २ कामे करून देण्यास सहकार्य करावे त्यामुळे मंदिर व्यवस्थापन करण्यास व टिकविण्यास मदत होईल.  धन्यवाद. आपले नम्र शिवसाई मित्र मंडळ,  श्रीवरदविनायक मंदिर ट्रस्ट सेक्टर4 कोपरखैरणे.

कै. भिकू तुकाराम जगताप (अण्णा)

कै. भिकू तुकाराम जगताप (अण्णा) म्हणजे घरातील सर्वात मोठे व्यक्ती.. सहा बहीण भावांचा षट्कोन होता. यातील मोठा कोण म्हणजे अण्णा..  अण्णांचा जीवनप्रवास एक रोमहर्षक आणि प्रेरित करणारा असा आहे. मला आठवतं लहान असताना घरात काही फोटो असायचे त्यात अण्णांचे कतार मधील काही फोटो होते. एकदम पॉश मध्ये एका मोठा सोफ्यावर टेकून बसलेले अण्णा आठवतात. परदेशात जाऊन आलेले आपल्या घरातील पाहिले व्यक्ती म्हणजे अण्णा.  तिकडून येऊन पण इथे फक्त शेती मध्ये न रमता मार्केट मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी कामाला लागले अन मेहनतीचे काम केले. निवृत्त होऊन समर्थ पणे गेले 20 वर्ष शेती देखील केली. शेवटपर्यंत सतत कार्यरत राहून त्यांनी सर्वांना एक वेगळा आदर्श दिला आहे. अण्णा-भाऊ - बापू सोबत आप्पा आणि नाना यांच्यात एक वेगळीच एकी आम्हाला बघायाल भेटायची.जगताप घर एक ठेवणे, घराची प्रतिष्ठा टिकवणे आणि वाढवणे याचे काम सर्व करत आहेत आणि यात अण्णा समंजस स्वभावाने नेतृत्व करायचे. सर्व नातेवाईकांमध्ये अण्णांना एक वेगळा मान होता आणि आहे. असे अण्णा आज आमच्यात नाहीत हे जाणवून मनाला चटका लागून जातो.  अण्णा तुम्हाला भावपूर्ण श्रद्ध...

planning नियोजन

Planning (नियोजन) कोणतंही कार्य हाती घेण्या अगोदर त्या कामाचे एक मास्टर प्लॅनिंग म्हणजेच नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते.. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे.. "fail to plan means plan to fail" म्हणजेच तुम्ही "नियोजन करण्यात अयशस्वी झालात आणि काम सुरू केलेत तर ते अयशस्वी होण्याचे नियोजन असते".  आणि जे यशस्वी होतात ते फक्त एक प्लॅन नाही तर २ ते ३ प्लॅन करून चालत असतात. प्लॅन A, B and C.  जसे जसे काम पुढे जाते तसे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन योग्य तो प्लॅन अमलात आणला जातो. यातून एक होते आपली मेहनत वायफळ वाया जात नाही. कोणत ना कोणतं एक लक्ष्य प्राप्त होतं आणि आपण flexible राहतो. 

MPL देणगीदार

*गणेश उत्सव२०२४  देणगीदार* 1. संदीप महादेव गोळे 2000 2. प्रतिक रवींद्र रांजणे यांजकडून मूर्ती साठी दिली जाईल तेवढी देणगी  3.भरत श्रीपती गोळे 5000 4. अनिल हरिभाऊ गोळे 5000 *जमा* 5. राजेंद्र गेनू चोरट 2500 *जमा* 6. प्रताप आनंदराव गोळे 2500 7. रमेश तुकाराम गोळे 2500 8. रवींद्र नारायण गोळे 2500 9. राजेंद्र आत्माराम गोळे 2500 10. राम श्रीपती गोळे 2500 11. रामचंद्र सर्जेराव गोळे 2500 12. शंकर रघुनाथ गोळे 2500 13. मोहन एकनाथ गोळे 2500 *जमा* 14. अनिल सदाशिव गोळे 2500 15. विलास वसंत जगताप 10000 *जमा* 16.किरण रवींद्र गोळे 2500 17.सुजित मानसिंग गोळे 5000 18. गणेश आनंदराव गोळे 2001 *जमा* 19.अभिजित दत्तात्रय पवार 1111 *जमा* *सर्व देणगीदारांचे आभार.  कृपया देणगी खालील QR कोड वर जमा करावी   *कृपया सर्व दात्यानी आपली स्वइच्छेने देणगी द्यावी व ज्या सभासदांची मंडळाची वार्षिक वर्गणी शिल्लक आहे त्यांनी ती लवकरात लवकर जमा करावी ही मंडळाकडून विनंती.* वस्तीचे खेडे होते , खेड्याचे गाव होते, गावचे शहर होते शहराचा तालुका होतो. हे होत असताना लोकसंख्या वाढत जाते, मुख्य रस्त्याला लागून अनेक उपरस...