पूर्व भारत - 7 बहिणी North East 7 sisters

पूर्व भारत - 7 बहिणी North East 7 sisters.
भारताच्या पूर्वेला असलेली सात राज्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझरोम, मेघालय आणि त्रिपुरा. 
गेले 17 वर्षाच्या service Engineer च्या नोकरी मध्ये पूर्ण भारत फिरून झाला, अगदी गाव गावात, जंगलात, समुद्र किनारे आणि जहाजात ते छतीसगड च्या दंतेवाडा सारख्या नक्षली बहुल परिसरात जाऊन आलो. पण 2024 पूर्व भारत फिरणे झाले नव्हते. तिकडची संस्कृती, राहणीमान, जंगले, इतर भरता पेक्षा वेगळी भाषा, भोजन संस्कृती ते वेगळे दिसणे हे सर्व खुणावत होते. 
2024 मध्ये भारतच्या सर्व सीमा अद्यावत उपकरणांनी सुरक्षित करण्याचं काम कंपनी ल भेटले आणि ती मशिनरी लावायच्या कामाचा मॅनेजर म्हणून मला जबाबदारी देण्यात आली.
पहिली भेट झाली ती पाकिस्तान च्या अट्टरी बॉर्डरची. 
त्यानंतर पश्चिम बंगाल मधून बांगलादेश बॉर्डर चे काम सुरू केले. आणि मग पूर्व भारतात पाय ठेवायची मला संधी मिळाली. त्रिपुरा मधील आगरतला एअरपोर्ट वर पहिल्यांदा उतरलो. त्यानंतर आसामचे सिलचर, मेघालयचे शिलाँग, मणिपूरचे इंफाळ असे मागोमाग 4 राज्ये अनुभायची आणि बघायची संधी मिळाली.
यात मला शिकायला भेटले इकडे कशी भौगोलिक परिस्थिती आहे, असंख्य डोंगर दऱ्या, जंगल, साधी माणसं, गरजेपुरता संचय करणारी वृत्ती आणि निस्वार्थ वृत्ती. एकेमकाना जोडायला फक्त रस्ते उपलब्ध. चारी बाजूला डोंगर आणि मधोमध सपाट जमिनीवर वसलेली शहर. त्यामुळे मुसळधार पाऊस आला की पाणी वाहून जायला योग्य असा उतार नाही. मग पाणी साचते आणि पुर परिस्थिती निर्माण होते. या सर्वावर मात करत जगणारी माणसं. मैलोनमैल चालायची सवय असलेली माणस. नैसर्गिक जे भेटेल ते खाऊन जगणारी माणसं.
आर्थिक पेक्षा मानसिक आनंद आणि शारीरिक विकास जपणारी माणसं बघायला भेटली.
आम्ही फक्त मणिपूर मधील म्यानमार बॉर्डरचा काही भाग बघून भारावून गेलो आणि विचार केला, अरुणाचल पासून मिझोराम पर्यंत असलेला सीमेवरील रोड किती थरारक आणि निसर्गरम्य असेल. 
या सात बहिणी नक्कीच वेगळ्या आहेत आणि त्यांचे पारंपरिक वेगळेपण जपण हेच खरं यश असेल. 

धन्यवाद
जयंत जगताप
लिखाण इंफाळ ते कोलकाता ते मुंबई विमान प्रवास दरम्यान दिनांक 30 ऑगस्ट 2024

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)