Posts

Showing posts from October, 2019

जिद्द स्वमग्न मुलाच्या मातेची

मनीषा ने रात्रीचे जेवन आटोपले व आता झोपण्याची तयारी करत होती. दिवसभर न थकता घरातील सर्व कामे आटोपून सोबत आराध्य ला जमेल तेवढा शांत ठेवत, काही न काही खेळत व खेळरूपी कामात व्यस्त ठेऊन तो चिडणार नाही व सैरभर पाळणार नाही याची खबरदारी घेत आजचा दिवस पूर्ण झाला होता. आराध्य ने दिवसा दीड ते दोन तास झोप घेतली की रात्री तो 2च्या अगोदर झोपत नाही आणि त्याच्या आईला म्हणजे मानिषा ला झोपून देत नाही. दिवसभर च्या अतिशय कष्टप्रद आणि थकवणाऱ्या कामातून उसंत मिळते तोच आता जगण्याची कसरत करावी लागणार आहे.        मनीषा चे खरे नाव मनोरमा. तिचा जन्म झाला तो साताऱ्यातील पंचगणी च्या बाजूच्या ताईघाट या उभ्या घाटावर वसलेल्या गावात. जन्म झाला तेव्हा तिचे वडील कर्नाटकात एक महाराजांच्या मठात होते व तिथेच त्या महाराजांनी तुम्हाला मुलगी झाली असे सांगितले होते. त्या महाराजांच्या सांगण्यावरून तिचे नाव मनोरमा ठेवले गेले. पण मनोरमा चे मनीषा झाले आणि तेच सर्वांच्या तोंडी रुळले. तिच्या मित्रा परिवारात तशी ती मनू म्हणून ओळखली जाते आणि क्वचित काही जण रमा ही म्हणतात. आपण तिला इथे मनीषा म्हणूया. मान...

आजची हिरकणी

     आजची हिरकणी- मनोरमा (आराध्यची आई) हिरकणी ने अंधाऱ्या रात्रीत कड्या कपारीतून खड्या बुरुजावरून उतरत गड उतरून आपल्या लेकराकडे पोहचली होती, फक्त आणि फक्त तिच्या मातृत्व च्या शक्तीमुळे तिला ते शक्य झाले होते, जेव्हा महाराजांना ते समजले व त्यांनी हिरकणीला विनंती केली की परत एकदा उतरून दाखव, म्हणजे आम्हाला समजेल हे तुला कसे शक्य झाले तर तिने महाराजांना मुजरा करून सांगितले महाराज मला हे परत जमणार ही नाही, कारण त्यावेळी मला फक्त माझे बाळ दिसत होते.    अशाच आजच्या काळात ही हिरकणी आहेत. मला अशीच हिरकणी चे मातृत्व दिसते ते माझ्या पत्नीमध्ये. आजच्या युगात ते कड्या कपारी वेगळ्या आहेत, आव्हान वेगळी आहेत, बाळ सोबत आहे आणि त्याला मोठं करायचे आहे, बळकट करायचे आहे, स्वावलंबी करायचे आहे. त्याचे ध्येय त्याला मिळवून द्यायचे आहे, त्याला जगायला आणि या जगातील वाईट अविचारांंशी लढायला शिकवायचे आहे. आजची हिरकणीचे काम वेगळे आहे, तिचा संघर्ष मात्र तसाच आहे. मातृत्वात अफाट शक्ती आहे आणि आजही ती तशीच ओसंडून वाहत आहेत. आजच्या युगात चूल आणि मूल ही संस्कृती बदलली आहे पण संपलीही नाही...