जिद्द स्वमग्न मुलाच्या मातेची

मनीषा ने रात्रीचे जेवन आटोपले व आता झोपण्याची तयारी करत होती. दिवसभर न थकता घरातील सर्व कामे आटोपून सोबत आराध्य ला जमेल तेवढा शांत ठेवत, काही न काही खेळत व खेळरूपी कामात व्यस्त ठेऊन तो चिडणार नाही व सैरभर पाळणार नाही याची खबरदारी घेत आजचा दिवस पूर्ण झाला होता. आराध्य ने दिवसा दीड ते दोन तास झोप घेतली की रात्री तो 2च्या अगोदर झोपत नाही आणि त्याच्या आईला म्हणजे मानिषा ला झोपून देत नाही. दिवसभर च्या अतिशय कष्टप्रद आणि थकवणाऱ्या कामातून उसंत मिळते तोच आता जगण्याची कसरत करावी लागणार आहे.
       मनीषा चे खरे नाव मनोरमा. तिचा जन्म झाला तो साताऱ्यातील पंचगणी च्या बाजूच्या ताईघाट या उभ्या घाटावर वसलेल्या गावात. जन्म झाला तेव्हा तिचे वडील कर्नाटकात एक महाराजांच्या मठात होते व तिथेच त्या महाराजांनी तुम्हाला मुलगी झाली असे सांगितले होते. त्या महाराजांच्या सांगण्यावरून तिचे नाव मनोरमा ठेवले गेले. पण मनोरमा चे मनीषा झाले आणि तेच सर्वांच्या तोंडी रुळले. तिच्या मित्रा परिवारात तशी ती मनू म्हणून ओळखली जाते आणि क्वचित काही जण रमा ही म्हणतात. आपण तिला इथे मनीषा म्हणूया.

मानिषाचे बालपण काहीकाळ तिच्या गावी मग मुंबईत घटकोपरमध्ये नंतर किशोरवयात तिच्या आजोळी आसगाव मध्ये तिच्या मावशी व आजीकडे गेले व सहावी -सातवीत परत मुंबईत येऊन स्थिरावले. मुंबईत घाटकोपर मध्ये चाळीत राहून फक्त शिक्षणच घेतले नाही तर सोबत खूप विविध गुण आत्मसात केले. तिच्यात एक चांगला कलाकार, नृत्य, सामाजिक कार्य करण्याची आवड, असे अनेक गुण आहेत.
चित्रकला आणि रांगोळीत तर तिचा हातखंडा आहे. दिवाळीत तिने काढलेल्या रांगोळ्या बघायला खूप येत असतात.
शिक्षणात तिने दहावी नंतर सायन्स मध्ये BSC जिओलॉजि पूर्ण केलं, शिक्षण घेणाची अजून इच्छा असतानाही घराची परस्थिती ची जाणीव असल्यामुळे आपल्या छोट्या भावना शिकता यावे म्हणून तिने पुढचे शिक्षण न घेता, तिने जेटकिंग चा कॉम्पुटर कोर्स केला, त्यात काही काळ नोकरी केली व 2007 मध्ये mearks मध्ये रुजू झाली आणि तिचे खरे करिअर सुरू झाले.
नोकरी मधेही तिचे पेरफेकशन आणि dedication मुळे ती कमी वेळेत, trainer, मग टीम लीडर, आणि bussiness analyst सारख्या मोठे पदावर पोहचली. ऑफिस मध्ये ही फन कंमिटी, annual मीटिंगस मध्ये तिचे क्रीटीव्ह माईंड खूप कामी येत असे.  कंपनी च्या football team मधेही ती होतो.
जॉब ला लागली आणि स्कूटी शिकून तिने स्वतः ची घेतली होती.
आशा या सर्वगुण संपन्न मुलगी मला भेटली ती 2013 मध्ये मे 23 ला आमचे लग्न झाले आणि अमचा संसार चालू झाला.
माझा फिरतीची जॉब आणि तिचे busy schedule मध्ये आम्हाला कमी वेळ भेटत असे पण तरीही आम्ही  मिळेल तस एन्जॉय करत असायचो.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)