Posts

Showing posts from December, 2025

welcome to.2026 (Q2 of 21st century)

     Welcome to 2026: Q2 of the 21st Century.      Today marks the end of Q1 (2001-2025) and the dawn of Q2(2026-2050) in the 21st century. This first quarter will be remembered for invasions and the rapid adoption of technology. Our generation has endured it all: wars, financial collapses, recessions, climate change, natural disasters, health crises, and a spiritual uprising.          We witnessed the IT revolution, digital innovation, and the meteoric rise of smartphones—growing like Everest. The century began in 2001 with the 9/11 attacks, laying the foundation for endless wars and testing grounds for next-gen weapons. In 2007, the global recession shattered millions of jobs, bursting the IT bubble before a slow, steady rebirth. By 2009, smartphones conquered India, reshaping social structures. Facebook, WhatsApp, and Instagram evolved from platforms into earning tools and lifestyle essentials.  Natural disasters struck hard...

सुट्टीतील दिवस

              बघ तुला.बरे वाटेल..  इंजिनियरिंगच्या चौथ्या सेमिस्टर ची परीक्षा देऊन भाचा, गेले 1 महिना त्याच्या मित्रासोबत काही डिजिटल प्रोजेक्टवर काम करत होता. अगोदरच कॉलेज मध्ये कॉम्प्युटर, पुस्तक वाचून,  डिजिटल प्रोजेक्ट करणारी ही पोर सुट्टीत पण अशी कॉम्प्युटर आणि मोबाईल वर पडून आहेत हे बघून मनाला चलबिचल झालं..     परवा अशाच त्याच्या पार्ट टाइम प्रोजेक्ट विषयी माहिती विचारत होतो आणि तो भरभरून सांगत होता. पण मला मनात कुठेतरी ते आवडत नव्हते. मला आमचे दिवस डोळ्यासमोर आठवत होते. खूप वेळ त्याच ऐकत ऐकत मी माझ्या कॉलेजच्या सुट्टींच्या दिवसात गेलो.. आणि भाच्याला आठवणी सांगत सांगत खालील कविता तयार झाली. संध्याकाळी 4 वाजता असच भटकत बाहेर पड..  सोबत मोबाईल नको घेऊस.. खेळाच्या मैदानात जा.. 3-4  संघ क्रिकेट खेळत असतील. सर्वांचे निरीक्षण कर.. एखादा 2व3 मुलांचा ग्रुप असेल. त्यांना क्षेत्ररक्षण करायला प्लेअर कमी असतील. त्यातील सिनिअर खेळाडू ओळख.. त्याला भेट, "मी खेळू का तुमच्यात" म्हणून विचार...  तो विचारेल "काय येत तुला" तू ब...

खाप पंचायत

      खाप पंचायत/ ग्राम सभा/ सामुहिक ग्राम सभा इसवी सन पूर्व 600 वर्षापासून अस्तित्वात असलेली ही परंपरा आहे. आजही ती हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब या उत्तरेकडील राज्यात खूप प्रबळ व्यवस्था आहे.  खाप म्हणजे गाव गावाने  मिळून तयार केलेली न्यायव्यवस्था प्रणाली. 7 गावे मिळून एक थांबा बनते. अशा 12 थांबाची  म्हणजेच 84 गावांची मिळून एक सर्व-खाप तयार होते. खाप मधे 3 प्रकार असतात.  1. एक जातीतील एकच गोत्र असलेले किंवा  2. एक जात अनेक गोत्र असलेले किंवा  3. अनेक जाती आणि अनेक गोत्र असलेले असे मिळून बनलेली खाप.  यात प्रतिष्ठित किंवा स्वतःला सामाजिक क्षेत्रात सिद्ध केलेली व्यक्तींची पंच म्हणून नियुक्ती होत असते. समाजातील अनेक प्रश्न जे न्यायालय प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष अडकून पडू शकतात ते इथे काही दंड ठोठावून सोडवले जातात.  जरी ही व्यवस्था संविधानिक नसली तरी पूर्वीपासून चालत आली आहे आणि लोकांच्या विश्वासावर टिकून आहे. यात काही चुकीचे निर्णय ही दिले जातात. ही पंचायत पुरुषसत्ताक आहे त्यामुळे जुन्या परंपरा आणि रूढी मोडणाऱ्या स्त्रियांसाठी इथले निर्णय...

धुरंधर

                     धुरंधर अगदी नावाला साजेसा असा सिनेमा... धुरंधर म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम, सर्व कौशल्य आत्मसात केलेला..  आताच्या GEN Z साठी 1990 ते 2010 मधील दहशतवाद इतिहास समजण्यासाठी महत्वाचा असा सिनेमा. आज सकाळी 7 च्याच शो साठी वडील, भाऊ, 2 मित्र आणि जेन Z मधील भाचा सोबत होते.  भाच्याला अगोदर काही समजत नव्हते. त्यात त्याची चूक नव्हती, विमान अपहरण, संसद हल्ला त्यांना माहीत नाही, 26/११ ऐकून आहेत पण त्याचा impact किती खोलवझाला माहीत नव्हते आणि नेमका इथेच धुरंधर यशस्वी होतो. नवीन पिढीला दहशतवाद विरुद्ध लढ्याला आपले किती जवान, हेर, गुप्तचर यंत्रणा किती मेहनत घेत आहे हे इथे दिसते. त्यांचे कष्ट दिसतात. रणबीर जेव्हा 1 वर्षात दुकानात काम करून करून कंटाळतो तेव्हा,  ज्यूस विकणारा गुप्तहेर त्याला त्याच्या पहिल्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातो,  चहाच्या दुकानात आणि तिथे सांगतो, मैंने यहा 6 साल ग्लास धोये है, 6 साल बेंच पे सोया हुं. तेव्हा मला खरा अंगावर काटा येतो.. किती तो त्याग आणि संयम.  सब्र और नजर बस ...