धुरंधर
धुरंधर
अगदी नावाला साजेसा असा सिनेमा... धुरंधर म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम, सर्व कौशल्य आत्मसात केलेला..
आताच्या GEN Z साठी 1990 ते 2010 मधील दहशतवाद इतिहास समजण्यासाठी महत्वाचा असा सिनेमा. आज सकाळी 7 च्याच शो साठी वडील, भाऊ, 2 मित्र आणि जेन Z मधील भाचा सोबत होते.
भाच्याला अगोदर काही समजत नव्हते. त्यात त्याची चूक नव्हती, विमान अपहरण, संसद हल्ला त्यांना माहीत नाही, 26/११ ऐकून आहेत पण त्याचा impact किती खोलवझाला माहीत नव्हते आणि नेमका इथेच धुरंधर यशस्वी होतो. नवीन पिढीला दहशतवाद विरुद्ध लढ्याला आपले किती जवान, हेर, गुप्तचर यंत्रणा किती मेहनत घेत आहे हे इथे दिसते. त्यांचे कष्ट दिसतात. रणबीर जेव्हा 1 वर्षात दुकानात काम करून करून कंटाळतो तेव्हा, ज्यूस विकणारा गुप्तहेर त्याला त्याच्या पहिल्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातो, चहाच्या दुकानात आणि तिथे सांगतो, मैंने यहा 6 साल ग्लास धोये है, 6 साल बेंच पे सोया हुं. तेव्हा मला खरा अंगावर काटा येतो.. किती तो त्याग आणि संयम.
सब्र और नजर बस यही हमारे हत्यार है.. घर नाही, कुटुंब नाही, आपली माणसं नाहीत. फक्त आणि फक्त देश प्रेम आणि त्यासाठी समर्पित आयुष्य.. हेच खरे धुरंधर.. यांचे करेल इतके कौतुक कमीच आणि ते ऐकायला सुद्धा ते उपस्थित नसतात. कारण ते अंधारात शत्रूंचा नायनाट करतात म्हणून आपण रोज नवीन सूर्य बघत असतो.. देश जगत असतो..
सर्व धुरंधरं सेनानीना मनापासून सॅल्युट
जय हिंद..
आणि भारत माता की जय..
#जयंत जगताप
Comments
Post a Comment