Posts

Showing posts from October, 2024

गोष्ट फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्टा बरोबर ओळखीची

       *गोष्ट  फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टा बरोबर ओळखीची* दिवाळी निमित्त माझे खास लेख   गोष्ट पहिली-: फेसबुकशी ओळख   काळ 2007 चा होता. इंजिनीअरिंग चे शेवटचे वर्ष, शेवटची सेमीस्टर (सेम) चालू होती. आता कॉलेज मधून बाहेर पडून बाहेरचे जग बघायचं. अजूनही कीपॅडचा मोबाईल वरच सर्व चालू होते. (2009 मध्ये touchscreen चे खरे मार्केट आले.) इंटरनेट वापरायचे म्हणजे सायबर कॅफे शोधून तिथे नंबर लावायचा आणि 20 रुपयात 1 तास किंवा 10 रुपयात 15 मिनिट अस बसून गूगल सर्च करायचे.  तेव्हा एकदा वर्गात आमच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या HOD  नी पाटील सरांनी आम्हाला इंटरनेट वर फेसबुक अस काहीतरी नवीन पोर्टल आल आहे ते बघा, कॉलेज संपल्यानंतर पण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ते तुम्हाला कमी येईल असे सांगितलं. आम्ही त्या वेबसाईट च address लिहून घेतला आणि संध्याकाळी जाऊन खूप मेहनत करत, हळूहळू चालणाऱ्या इंटरनेट वर फेसबुक वर अकाउंट तयार केले. मग 6 महिने काय त्याकडे बघितले नाही. त्याकाळात स्मार्ट फोन नव्हते त्यामुळे स्वतःचा फोटो प्रोफाइल वर ठेवणे खूप कठीण काम असायचे. कॉल...

निवडणुका आणि विद्यार्थी

          *निवडणुका आणि विद्यार्थी* निवडणुका होतात..त्यात मतदान होते..मतदार असतात 18 वर्षाच्या वरील.. मग यात विद्यार्थी काय करतात. त्यांचा काय संबंध.  तर.. सर्व निवडणुका पार पाडायला सरकार मनुष्यबळ वापरते ते शाळेतील शिक्षकांचे. कोणतही निवडणूक आली रे आली की शिक्षकांना निवडणूक दुटी लागते. मतदार याद्या बनवा, नावे तपासा, व्होटिंग मशीन तपासा ते अगदी मतदारांना पावत्या द्या. इथपासून मतदान मोजणी पर्यंत शिक्षक यात जुंपले जातात. मग सुरू होतो विद्यार्थांचा तोटा. शाळेत शिक्षक नसल्यामुळे अभ्यासक्रम मागे राहतो, योग्य मार्गदर्शन भेटत नाही, मोकळा वेळ भेटतो आणि अभ्यास मागे राहतो. हे झाले सामान्य विद्यार्थ्यांचे. पण दिव्यांग शाळा, पालिकेचे थेरेपी सेंटर येथील थेरपिस्ट देखील या कामात जुंपले जातात. या दिव्यांग मुलांना दररोज थेरपी मिळणे खूप आवश्यक असते परंतू निवडणुकांमुळे थेरपी बंद राहतात आणि अपरिमित परिश्रम करणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पालकांना आणखी दिव्य पार पाडावे लागते. सरकार ने एकतर निवडूनिकिसाठी वेगळं मनुष्यबळ ठेवावे ज्याचा खर्च उभे राहणारे उमेदवार असतील त्यांच्याकडून वसूल क...

हे जग कुणाच्या बापाचं..

रस्त्यावर एक गाडीवाला मध्येच गाडी थांबवून उतरला दुसऱ्या गाडीवाल्याला ज्याने याला कट मारला होता त्याला शिव्या देत होता. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का वैगरे..