निवडणुका आणि विद्यार्थी

          *निवडणुका आणि विद्यार्थी*
निवडणुका होतात..त्यात मतदान होते..मतदार असतात 18 वर्षाच्या वरील.. मग यात विद्यार्थी काय करतात. त्यांचा काय संबंध. 
तर.. सर्व निवडणुका पार पाडायला सरकार मनुष्यबळ वापरते ते शाळेतील शिक्षकांचे. कोणतही निवडणूक आली रे आली की शिक्षकांना निवडणूक दुटी लागते. मतदार याद्या बनवा, नावे तपासा, व्होटिंग मशीन तपासा ते अगदी मतदारांना पावत्या द्या. इथपासून मतदान मोजणी पर्यंत शिक्षक यात जुंपले जातात.
मग सुरू होतो विद्यार्थांचा तोटा. शाळेत शिक्षक नसल्यामुळे अभ्यासक्रम मागे राहतो, योग्य मार्गदर्शन भेटत नाही, मोकळा वेळ भेटतो आणि अभ्यास मागे राहतो. हे झाले सामान्य विद्यार्थ्यांचे. पण दिव्यांग शाळा, पालिकेचे थेरेपी सेंटर येथील थेरपिस्ट देखील या कामात जुंपले जातात. या दिव्यांग मुलांना दररोज थेरपी मिळणे खूप आवश्यक असते परंतू निवडणुकांमुळे थेरपी बंद राहतात आणि अपरिमित परिश्रम करणाऱ्या दिव्यांग मुलांच्या पालकांना आणखी दिव्य पार पाडावे लागते.
सरकार ने एकतर निवडूनिकिसाठी वेगळं मनुष्यबळ ठेवावे ज्याचा खर्च उभे राहणारे उमेदवार असतील त्यांच्याकडून वसूल करावा किंवा एक देश एक निवडणूक घ्यावी. 
यातून शिक्षक आपले काम चांगले करतील आणि चांगली पिढी घडायला मदत होईल. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)