Posts

Showing posts from September, 2020

माझे गाव महू गाव

Image
नमस्कार,  मी श्री. जयंत जगताप, गेले 28वर्ष नवी मुंबईत राहत आहे, नवी मुबईत माझं शिक्षण झालं आणि इथलाच मी स्थायिक झालो. मार्च मध्ये आलेल्या कोरोनाची साथ आणि संचारबंदी मुळे मार्च ते ऑगस्ट असे सलग 5 महिने गावी राहायला मिळाले आणि गावाचा पूर्ण निरीक्षण करायची संधी मिळाली. ते इथे मांडत आहे.  मूळ गाव सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात कुडाळी नदीच्या किनाऱ्यावर आणि महाबळेश्वर पांचगणी डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसले आहे. गावची आजची लोकसंख्या लक्षात घेता गाव पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वी वसले असावे वाटते. गावात मुख्य देवता काळभैरवनाथ आहे. या देवळाचा जीर्णोद्धार 1864 मध्ये झाला आहे अशी मंदिरावर नोंद आहे. या सोबत गावात, विठ्ठल रुख्मिणी, श्रीराम मंदिर आणि गावच्या वेशीवर बनातील काळभैरवनाथ मंदिर आहे. गावची लोकसंख्या 1200ते1500च्या आसपास आहे. तरीही करहर भागातील मोठ्या गावच्या यादीत गावचे नाव येते. गावात मुख्यतः गोळे आडनावाचे सर्वाधीक 90% लोकसंख्या आहे या सोबत जगताप, शिंदे, पवार, मस्कर, भगत, खुडे, कांबळे या आडनावाची लोकसंख्या 10% आहे. गावात 5 कुळे असून ती मोकाशी, पाटील, जागृती, प्रगती व नवलाई भावकी ...

कोरोनाची शिकवण

                *कोरोनाची शिकवण* गाव म्हणजे गाव असत, गाव म्हणजे गाव असत, तिथे राहायचं म्हणजे स्वर्ग सुख असत. गावात असलं की कस आनंद गीत गावस वाटत.  गेले 5 महिने म्हणजे, मार्च ते ऑगस्ट 2020 मध्ये जे आयुष्य जगायला भेटले आहे ते परत कधी भेटलं की नाही हे माहीत नाही, पण जे जगलो ते आजीवन कधीच विसरणार नाही.  कोरोना आला आणि पसरला, त्याने सर्वाना गोठवले, दळण वळण थांबवले.  एखादा पोलीस चोराला बंदूक धाकावून जसे हँडस इप करायला लावतो तसच काहीस कोरोना ने जगभर केलं. अस वाटायला लागलं की हा कोरोना माणसाला परत जगायला शिकवायला आला आहे, वेळ नाही, खूप काम आहे, अभ्यास आहे, मुलांना खेळायला वेळ नव्हता, जेवलाय वेळ नव्हता, जस फक्त पळायचे आहे आणि कुठेतरी पोहचायचे आहे असे माणूस जगत होता, ते सर्व थांबले, कुटूंब एकत्र आलीत, जे कधी आई वडिलांकडे जात नव्हते ते जाऊ लागले, मैदानी खेळ काय असतात ते मुलांना समजू लागले.  गावाकडे शेती वजवली जाऊ लागली. जे आहे त्यात माणसे समाधान मानू लागलीत. हो जे शहरात अडकले किंवा राहिले त्यांचे हाल झाले, भीषण उन्हळा, रोजच्या गरजेच्या गो...

ना हरकत पत्र

प्रति, मा. आमदार श्री. शशीकांत शिंदे साहेब.  विषय: सहयाद्री सहकारी सेवा पर्यटन संस्थेस नाहरकत पत्र मिळणे बाबत.  महोदय,  नमस्कार, आपल्या सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली, आपल्या जावळी भागातील होतकरू तरुणांना रोजगार मिळावा तसेच आपल्या भागात महू धरण परिसरात पर्यटन विकास करण्याकरिता,  आम्ही सहयाद्री सहकारी सेवा संस्था नोंदणी करत आहोत. तरी महू धरणं वर अगोदर जी संस्था -------------  आहे. यांकडून आम्हास नाहरकत पत्र मिळावे ही नम्र विंनती.  आपले नम्र सहयाद्री सहकारी सेवा पर्यटन  संस्था, जावळी प्रवर्तक- सुजित मानसिंग गोळे.