कोरोनाची शिकवण
*कोरोनाची शिकवण*
गाव म्हणजे गाव असत, गाव म्हणजे गाव असत, तिथे राहायचं म्हणजे स्वर्ग सुख असत. गावात असलं की कस आनंद गीत गावस वाटत. गेले 5 महिने म्हणजे, मार्च ते ऑगस्ट 2020 मध्ये जे आयुष्य जगायला भेटले आहे ते परत कधी भेटलं की नाही हे माहीत नाही, पण जे जगलो ते आजीवन कधीच विसरणार नाही.
कोरोना आला आणि पसरला, त्याने सर्वाना गोठवले, दळण वळण थांबवले. एखादा पोलीस चोराला बंदूक धाकावून जसे हँडस इप करायला लावतो तसच काहीस कोरोना ने जगभर केलं. अस वाटायला लागलं की हा कोरोना माणसाला परत जगायला शिकवायला आला आहे, वेळ नाही, खूप काम आहे, अभ्यास आहे, मुलांना खेळायला वेळ नव्हता, जेवलाय वेळ नव्हता, जस फक्त पळायचे आहे आणि कुठेतरी पोहचायचे आहे असे माणूस जगत होता, ते सर्व थांबले, कुटूंब एकत्र आलीत, जे कधी आई वडिलांकडे जात नव्हते ते जाऊ लागले, मैदानी खेळ काय असतात ते मुलांना समजू लागले. गावाकडे शेती वजवली जाऊ लागली. जे आहे त्यात माणसे समाधान मानू लागलीत. हो जे शहरात अडकले किंवा राहिले त्यांचे हाल झाले, भीषण उन्हळा, रोजच्या गरजेच्या गोष्टींचा तुटवडा, घरातच बंदीस्तपणा, यातून अनाकलनीय भीती, हा आजार कुठून कसा येईल याचा काही नेम नाही, मग माणसे स्वतःची तब्येतीची काळजी घेऊ लागले, योग, प्राणायाम, व्यायाम करू लागलीत, पौष्टीक आणी घरचेच खाऊ लागलीत, अनावश्यक खर्च टाळू लागले, कपडे फक्त वापरायला असतात, धकवायला नाही हे विचार रुजू लागले, पुन्हा एकदा तो जुना काळ अनुभवास मिळत होता, सोबत तंत्रध्यान चा उपयोग होत आहे, शाळा ऑनलाइन होत आहेत,मुलांना दप्तराचे ओझे आता उचलावे लागत नाही, मोबाईल फक्त गेम खेळायला नसतो त्यावर अभ्यास पण होतो हे कळायला लागले आहे.
पण.... आजार शहरात हात पाय पसरत आहे, काही आजारी, काही सशक्त माणसे बळी पडत आहेत, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही जण स्वतःहून जीवन संपवत आहेत, काही भीतीने जात आहेत, माणसाला माणूस दूर करत आहे, घोळक्यात राहणार माणूस एकटा दुकटा फिरत आहे. येणाऱ्या काळत जग अजून बदलेल यात शंका नाही पण माणसाला पुन्हा एकदा माणूस व्हावे लागले यात पण शंका नाही.
आभार
जयंत जगताप
Comments
Post a Comment