Posts

Showing posts from January, 2025

गुलाब दादा ना मदत आभार

खरंतर तुम्ही सर्वांनी दादासाठी केलेली प्रार्थना आणि प्रेम रुपी मदतीचा जो वर्षाव केला आहे तो शब्दापलिकडचा आहे. आपल्या गावचा वारकरी इतका भाग्यवान आहे की तुमच्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद, प्रार्थना त्यांना लाभत आहे. जणू काही विठ्ठलच आपल्या सर्वांमध्ये अवतरला आहे,  हे प्रेम बघून मला खर तर गहिवरून आल आहे. तुमचे आभार मानून मी तुमचं ऋण फेडू शकत नाही तरीही मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत.  समस्थ महुकर ग्रामस्थ, भैरवनाथ भजन मंडळ, महिला भजन मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, श्री बालगणेश क्रीडा मंडळ, दोस्ती ग्रुप मुंबई, गावचे, मुंबईचे तरुण, जेष्ठ, महिला मंडळ महू, मुंबई सर्वांचे मनापासून आभार. 

पारायनाचे दादा

                     *पारायनाचे दादा* गावचे पारायण सुरू असते तेव्हा थंडीचे दिवस असतात. अतिशय भक्तिमय असे वातावरण बनलेले असते. खास पारायण साठी गावी आलो होतो. दुपारची वेळ होती, सकाळचे वाचन पूर्ण झाले होते, काहीतरी काम करून मंदिरापासून पवळीकडे जात होतो, जाता जाता मंदिराकडे नजर वळली आणि मंदिराच्या कट्ट्यावर एक वयस्कर माऊली मस्त पैकी ऊन खात पहुडली होती. छताकडे तोंड करून, दोन्ही हात असे पंखासारखे उघडले होते. जणू सूर्य कवेत घेत आहेत. निरखून पाहिले तर ते होते आपले *ह. भ. प. गुलाबदादा कोंडीबा गोळे*.      बघत बघत मी पुढे निघून गेलो पण माझ्या डोक्यात त्यांच्याबद्दल चे सर्व विचार, आठवणी जाग्या होऊ लागल्या. स्वतःला पर्मार्थासाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व. कसला लोभ, मोह, माया नाही. जसं आहे तसं आनंदात जगायचं. जणू काही श्रीकृष्णने सांगीतलेली गीता अंमलात आणणारे व्यक्तिमत्व. न थकता आपले कर्म करत राहणार. दिवसभर पारायण मध्ये व्यासपीठ चालवणार, मग प्रवचन, मध्ये बसणार मग कीर्तनात टाळ घेऊन उभे राहणार आणि परत सकाळी काकडा आरती साठी उपस्थित राह...

माझे सामाजिक कार्य

             माझे सामाजिक कार्य लहानपणापासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक कार्य करायची आवड लागली आणि यातून आमचा एक ग्रुप तयार झाला. त्यातून अनेक रक्तदान शिबीर आयोजित केलीत आणि मी नियमित रकतदाता झालो. हळू हळू ग्रुप चे मंडळ तयार झाले आणि कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये शिवसाई मित्र मंडळ नावारूपास आले. मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक, सांस्कृतिक,  क्षेशनिक उपक्रम राबवत आहोत.  या सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाशी योग्यरीत्या पाठपुरावा करत  एका अधिकृत जागेवर गणपतीचे प्रशस्त असे मंदिर बांधले जे आज वरद विनायक मंदिर म्हणून नावारूपास आले आहे.  या मंदिरात तबला शिकवणे, स्वामींची बैठक, धार्मिक शिक्षण शिबिरे होतात, मंदिरासमोर प्रशस्त अशी जगा आहे तिथे कराटे क्लासेस होतात, तसेच छत्रपती संभाजी राजे बलिदान मास  या ठिकाणी पार पाडले जाते.  एका नवीन परिसरामध्ये प्रशासनासोबत लढा देऊन आम्ही सर्वांनी हे मंदिर उभे केले आणि त्यात मी वैचारिक आणि भौतिक असा दोन्ही प्रकारे वाटा उचलला याचा आज मला अभिमान वाटत आहे. आज मंदिर कामकाज दुसरी पिढी यशस्वीरीत्...

letter to Gail India

To  Gail (India) Ltd.Alibagh, Raigarh.  Subject: Regarding allotment of mathadi and house keeping work to mathadi toli no.792 and samanjas India Pvt. Ltd. Dear Sir, Greetings from Samanjas Ind. Pvt. Ltd and Toli no 792.  We got to know that in your company required all kind of workers for loading unloading, house keeping and many other such kind of work. We would like to inform you that the workers in our company are local and landless. We would like to request you to provide the all such works to our toli no 792 and samanjas India. Pvt.ltd company.  Thank you. 

I am a Legend

I am Legend 1. विल स्मिथचा हा चित्रपट आहे.  2. शिवाजी the boss 3. ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हटलेलं I am legendनंa george Bailey74 अनेक वर्ष किंग्स इलेवन पंजाब चे नेतृत्व केलेला खेळाडू जॉर्ज बेली. मनाला भिडलेला एक उत्तम खेळाडू. सतत हसत. टीम मध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवणारा. एकदा मन of the मॅच म्हणून निवड झाल्यावर बक्षीस स्वीकारून बोलताना त्याला एक प्रश्न विचारण्यात आला की आपण इतके सकारात्मक कसे राहता. त्यावर त्या

कर्तव्य जबाबदारी आणि अधिकार

     *कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार* आपण सर्वजण सीमेवरील ताणतणाव आणि देशसेवा बजावणाऱ्या सैनिकाबद्दल नेहमीच ऐकत असतो, तेथील फोटो , व्हिडिओ प्रसारमाध्यमामध्ये नेहमी येत असतात. ते बघून अनेकांना वाटते अस लढल पाहिजे, तस केलं पाहिजे. मग कधीतरी एखादा पर्यटक सीमेवर जातो आणि तेथील जवानांना अक्कल शिकवायचा प्रयत्न करतो, बंदूक सांभाळायचा खर्च किती ते विचारतो, जवान त्याला सर्व सांगतो, त्याचा maintenance असतो. ते सांगतो, हे ऐकून तो पर्यटक लालबुंद होतो आणि वायफळ बडबड सुरू करतो " अरे तुम्हाला समजत का आम्ही टॅक्स भरतो आणि तुम्ही इतका खर्च करता, तुम्हाला काही अक्कल नाही, मी बंदुकीच्या कारखान्यात काम करतो, तिला इतका खर्च येत नाही, आम्ही तर अर्ध्या किमतीत बनवतो, मला माहित आहे बंदूक कशी चालवायची ते, ती द्या इकडे. मी चालवतो". अस बोलून तो त्या सैनिकाची बंदूक खेचू लागतो. जवान त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण तो अतिशहाणा पर्यटक बेफान झालेला असतो,  इतक्या वेळ शांततेत त्या पर्यटकाची वायफळ बडबड ऐकून घेणारा जवान आता भडकतो, कारण कोणत्याही जवानाला त्याची बंदूक जिवापेक्षा प्रिय असते. जवान त्या पर्यटक...

राधिका निकम

*एक अफलातून जीवनप्रवास -राधिकाताई निकम*   गेले पाच दिवस आपण सर्वजण प्रवचन म्हणून सुंदर अस रामायण ऐकत आहोत.  दिवसभरात महाभारतात श्रीकृष्ण यांनी सांगीतलेली गीता आणि सायंकाळी रामायणातील बालकांड, सुंदरकांड, अरण्यकांड, हनुमान भगवंताची कथा असे रामायण ऐकत आहोत.  हे रामायण ज्यांच्या मुखातून ऐकत आहोत त्या *डॉक्टर राधिका निकम* यांचा एवढा गाढा अभ्यास बघून, त्या सांगत असलेल रामायण ऐकत सर्व भाविक मंत्रमुग्ध होते आहेत. उत्सुकता म्हणून या रामायण सांगणाऱ्या ताई कोण ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जी माहिती समजली ती ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. आपले गावचे जेष्ठ समाजसेवक दिलीप दादा (स्वामी) यांच्या त्या मावस बहीण. आणि त्यांचे माहेर पिंपळी, मेंगडे घर म्हणजे पिंपळी आणि महूच्या सीमेवर असलेल शेतकरी कुटुंबच घर.  वडील मुक-बधीर शेतकरी, आई साधी भोळी शेतात काम करणारी.  लहानपणापासून आई वडिलांसोबत शेतात राबणारी लेक. वेळ प्रसंगी शेतात औत चलवणरी राजमताजिजाऊची लेक म्हणजे *राधिका*.  आई वडिलांनी शेतात काबड कष्ट करत करत मुलांना वाढवले.  कसेतरी शिक्षण ...