पारायनाचे दादा
*पारायनाचे दादा*
गावचे पारायण सुरू असते तेव्हा थंडीचे दिवस असतात. अतिशय भक्तिमय असे वातावरण बनलेले असते. खास पारायण साठी गावी आलो होतो. दुपारची वेळ होती, सकाळचे वाचन पूर्ण झाले होते, काहीतरी काम करून मंदिरापासून पवळीकडे जात होतो, जाता जाता मंदिराकडे नजर वळली आणि मंदिराच्या कट्ट्यावर एक वयस्कर माऊली मस्त पैकी ऊन खात पहुडली होती. छताकडे तोंड करून, दोन्ही हात असे पंखासारखे उघडले होते. जणू सूर्य कवेत घेत आहेत. निरखून पाहिले तर ते होते आपले *ह. भ. प. गुलाबदादा कोंडीबा गोळे*. बघत बघत मी पुढे निघून गेलो पण माझ्या डोक्यात त्यांच्याबद्दल चे सर्व विचार, आठवणी जाग्या होऊ लागल्या. स्वतःला पर्मार्थासाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व. कसला लोभ, मोह, माया नाही. जसं आहे तसं आनंदात जगायचं. जणू काही श्रीकृष्णने सांगीतलेली गीता अंमलात आणणारे व्यक्तिमत्व. न थकता आपले कर्म करत राहणार. दिवसभर पारायण मध्ये व्यासपीठ चालवणार, मग प्रवचन, मध्ये बसणार मग कीर्तनात टाळ घेऊन उभे राहणार आणि परत सकाळी काकडा आरती साठी उपस्थित राहणार. नंतर यांच्यबद्दल प्रशांत बरोबर चर्चा केली आणि त्यांचे हे पारायण आणि गावासाठीचे कार्य त्यासाठी त्यांचेसमोर कृतज्ञतेने आभार मानले पाहिजेत. कारण केलेल्या सत्कर्याचे कौतुक हीच त्या थोर व्यक्तीस पोचपावती असते. कीर्तन संपले की मी त्यांच्याबद्दल लीहलेले चार शब्द बोललो आणि त्यांचेजवळ जाऊन दर्शन घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली. डोळ्यात थोड स्मिथ हास्य करत दादानी सकारात्मक मान हलवली आणि पुढील भजनात रमले.
अश्या ह्या माऊलीसाठी त्यांच्या आजारपणात साथ द्यायला आज संपूर्ण गाव एकवटला आहे. प्रत्येकजण त्यांच्यासाठी मदत देत आहेत ती मदत नाही तर त्यांचं प्रेम आहे. हे त्यांचे यश आहे. *ही ज्ञनेश्वरीची ताकत आहे*. त्यांनी असंख्य वेळा म्हटलेल्या पसायदानचे फलित आहे. असो. लिहायला खूप आहे पण एक शेर जो गुलाबदादांना अचूक मॅच होत आहे तो सांगतो आणि थांबतो.
*"मैं अकेला ही चला था जनिब ए-मंजिल मगर.. लोग साथ आते गये और कारवा बनता गया".*
लेखक जयंत जगताप
Comments
Post a Comment