विश्वास
*विश्वास* विश्वास एक छोटासा शब्द. पण सर्व काही याचावर आहे. बघा विचार करून.. मैत्रीत लागतो, प्रेमात लागतो अगदी शत्रू वर ही असावा लागतो. हा कोणावरही ठेवता येतो म्हणजे सजीव आणी निर्जीव गोष्टी वर. तस मैत्री आणी प्रेमाचे नाही. विश्वास अणेकांचा एकावर असतो किंवा एकाचा अणेकांवरही असतो. हा कमवता येतो पण न गमवण आपल्या हातात असत. हा टिकवण खूप अवघड असतो एकवेळ पैसा टिकवण सोप पण याच्यासाठी वेळ पडल्यास सर्व पणाला लावावे लागते. पण एकदा टिकला कि परत जात नाही. हा नकळत पण कोणावर ठेवला जाऊ शकतो. जसा मुलांचा आई वडीलांवर. मित्राचा मित्रावर. हा स्वतावरही ठेवता येतो. त्याला आत्मविश्वास म्हणतात असा हा विश्वास कमवा आणी टिकवा. जीवन सुंदर होईल. ...