महू शाळा अभिनंदन मेसेज
सुवर्ण असो रौप्य असो की कांस्य.. ऑलिंपिक मध्ये या तिन्ही पदके महत्वाची असतात कारण त्यासाठी पोहचण्यासाठी शेकडो प्रतिस्पर्धी मागे टाकलेले असतात. असच यश यावेळी आपल्या महू गावच्या शाळेने मिळवले आहे. जबरदस्त स्पर्धा, तोडीस तोड प्रतिस्पर्धी, प्रत्येकाला आपल्या गावचे शाळेचे नाव पुरस्कारावर छापायचे होते. त्यात आपल्या महू गावच्या शाळेने तिसऱ्या क्रमांकावर भरारी घेण्यात यश मिळवले आहे. त्याबद्दल महू शाळेचे, शिक्षकांचे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे खूप खूप अभिनंदन..