माज
*माज*
माज कशाला म्हणतात.. हे पूजा खेडकर प्रकरणातून समजलं..
बड्या भ्रष्ट अधिकाऱ्याची मुलगी.. सर्व सिस्टम माहीत असलेली.. सिस्टम कशी खोकळी आहे हे माहीत असलेली.. योग्यता नसताना दीव्यांग प्रमाणपत्र काढून घेतलं, मग करोडो ची संपत्ती असताना आई वडील विभक्त आहेत अस दाखवून आपण कसे बिच्चारे आहोत हे दाखवून, बनावट कागदपत्रे बनवुन देशातील सर्वोच्च अस IES ची पदवी मिळवली.. बर.. पुढेही जिथे पुण्यात घर आहे, तिथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवून घेतली.
इथपर्यंत सर्व स्वप्नवत चालू होते, सिस्टमला अगदी अलगद वेड्यात काढलं होत.. सर्वोच्च पद आता फक्त काही क्षण दूर होत.. तेवढी कळ सोसली असती की तयार झाला असता एक भस्मासुर.. फक्त लूट आणि लूट.. वरून सरकारी संरक्षण.. सामान्य माणसाची फक्त मानसिक कत्तल..
आणि नेमका इथे कामी आला तो माज.. प्रोबेशन वर असतानाच पाहिजे सरकारी बंगला, गाडी, लाल दिवा आणि स्वतंत्र केबिन आणि हाताखाली राबणारे नोकर..
बरं यातील काही काही मिळत ही होत पण माज एवढा की डायरेक्ट मोठया अधिकाऱ्याची केबिन बळकावली..
इथून पुढे उघडला गेला सर्व खोटा खेळ.. असा माज होता म्हणून उघडला गेला सिस्टमचा फोलपणा..
आता गरज आहे शोधायची अशा किती तो किंवा ती पूजा खेडकर बनुन देशाला, जनतेला लुटत आहेत.
हे झालं केंद्राचं...
यातून धडा घेऊन राज्यशासनाने एमपीएससी (mpsc) मध्ये किती मोठे झोल होत असतील ते शोधावे.
खरे दिव्यांग वर किती मोठा हा अन्याय आहे हे बाहेर काढायची गरज आहे.
मी स्वतः दिव्यांग मुलाचा वडील आहे.. दीव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी केलेली धावपळ हे असे खोटे भामटे व्यर्थ घालवत आहेत.. अशांना कडक शासन होणे गरजेच आहे हीच अपेक्षा..
जयंत जगताप
Comments
Post a Comment