Posts

Showing posts from March, 2022

शाळेच्या आठवणी

                  *शाळेतील आठवणी* 1993 साली गावावरून तिसरी पर्यंत शाळा पूर्ण करून, वडिलांनी मुंबईला चौथी मध्ये ऍडमिशन घेतले. गावची 5 वर्गांची छोटी बैठी शाळा आणि समोर छोटे पटांगण होते.  नवी मुंबईत कोपरखैरणे मध्ये 1993 च्या पावसाळ्यात भर पावसात वडील छत्रीत आम्हाला घेऊन कोपरखैरणे मधील नवीन इमारत बांधलेल्या शाळेत घेऊन गेले. भर पावसात डोळे दिपले. भव्य दिव्य अशी 3 मजली मोठी इमारत दिसली. हीच ती रामचंद्र फकिरजी नाईक शाळा म्हणजेच RF naik school.  चौकोनी आकारात बांधलेली 50 by 50 meter जागेचा चौकोन, त्या मध्ये पटांगण आणि शाळेच्या बाहेर खूप मोठे खेळाचे मैदान. अगदी मनात भरून राहिलेली ही शाळा आहे.  4थी ला इथे प्रवेश घेतला ते 10 पर्यंत अविस्मरणीय अस शिक्षण इथे झालं. गावी बस्कर वरून आता बेंच वर बसायला आलो होतो. 8 पर्यंत सगळे एकमेकांचे ओळखीचे झालो होतो. पहिली चाचणी, सहामाही, 2री चाचणी मग वार्षिक आशा परीक्षा देत, एकमेकांना धाकवत आम्ही उत्तीर्ण होत होतो. माझे जोडीदार म्हणजे, यशवंत जाधव आणि विशाल घोटकर. मी मध्ये आणि मागे पुढे हे दोघे असायचे. विशाल...

*स्त्री दिन शुभेच्छा*

                स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस तू रांगडा उंच कातळ आहेस तर ती तुला पाझर फोडणारी नाजूक कळी आहे.. तुझ्या आत दडलेले प्रेम बाहेर काढणारी ती सुंदर प्रेयसी आहे.. तुझ्या रांगड्या स्वभावाला आवरणारी ती प्रेमाची लगाम आहे..  तू कितीही उंच भरारी घेतलीस तरी तिच्या मनात खोल जागा करणं तुझं ध्येय आहे.. जिथे तू थकतोस तिथे तुझ्या पाठीवर हळुवार हात फिरवरून पुन्हा उभी करणारी जननी आहे.  असंख्य घाव होऊनही न फुटणारी तुझी छाती आहे तर ममतेने पाझरणारी ती जगाची माऊली आहे.  दोघांच वेगळपण आहे म्हणूनच एकमेकांच्या गरजेचे आहे.  एकसमान झालात तर चुंबकाच्या एकच ध्रुव बनून कायमचे एकमेकांपासून दूर जाल.  म्हणून पुरुष तू पुरुष म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस, स्त्री तू स्त्री म्हणून श्रेष्ठ आहेस.  सर्व स्त्रियांना स्त्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. -- जयंत जगताप चेन्नई एअरपोर्ट 8.3.22 3.05AM

r f naik school 1st get together details

कार्यक्रम रूपरेषा 4 ते 8 27 फेब 2021 1. वर्गात जमायचे, वर्गात बसून गप्पा व फोटो सेशन. घंटा वाजऊन खाली यायचे 2. सरस्वती पूजन, स्वागत समारंभ. प्रार्थना वंदे मातरम शिक्षकांचे स्वागत आणि पुष्पगुछ देऊन स्टेज वर बसवणे 3.स्टेज पाशी येऊन, प्रथम कोविड आणि वारलेलं सहकारी याना श्रद्धांजली, 4. वेलकम स्पीच 4. शिक्षकांचे सत्कार आणि सन्मान चिन्ह वाटप व शाळेचे गिफ्ट द्याचे. मग शिक्षक मार्गदर्शन थळे सर, सरिता पाटील मॅडम, कुरणे मॅडम, तिगडे मॅडम. आणि आठवणी ना उजाळा. विध्यार्थी ओळख. विद्यार्थी ओळखीत प्रत्येकाला त्याची एक आठवण विचारायची, ऐच्छिक एक शिक्षकांबद्दल आणि एक त्याच्या मित्र मैत्रिणी बद्दल. 6. गेम व ऍक्टिव्हिटी   straw and ball  and fuge  आणि होऊजी - by विशाल म्हात्रे. राष्ट्रगीत जण गण मन 8. जेवण आणि समारोप उजाळा आठवणींना 10 वि ची batch साल 2000 स्वागत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी. येथे जमलेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी व सहकारी वर्ग व सण 2000 दहावीच्या माझ्या सर्व  मित्रानो सर्वांचे खूप खूप स्वागत. शाळेची सुरवात 1991 ते 2000 लहानपण एकत्र कसे गेले याचे वर्णन...

महू माझे गाव

नमस्कार,                *माझे गाव महू गाव* मी श्री. जयंत जगताप, गेले 28वर्ष नवी मुंबईत राहत आहे, नवी मुबईत माझं शिक्षण झालं आणि इथलाच मी स्थायिक झालो. मार्च मध्ये आलेल्या कोरोनाची साथ आणि संचारबंदी मुळे मार्च ते ऑगस्ट असे सलग 5 महिने गावी राहायला मिळाले आhणि गावाचा पूर्ण निरीक्षण करायची संधी मिळाली. ते इथे मांडत आहे.  मूळ गाव सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात कुडाळी नदीच्या किनाऱ्यावर आणि महाबळेश्वर पांचगणी डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसले आहे.  समुद्र सपाटी पासून 678 मीटर उंचीवर  पश्चिम महाराष्ट्रात महू गाव आहे,  गावची आजची लोकसंख्या लक्षात घेता गाव पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वी वसले असावे वाटते. गावात मुख्य देवता काळभैरवनाथ आहे. या देवळाचा जीर्णोद्धार 1864 मध्ये झाला आहे अशी मंदिरावर नोंद आहे. या सोबत गावात, विठ्ठल रुख्मिणी, श्रीराम मंदिर आणि गावच्या वेशीवर बनातील काळभैरवनाथ मंदिर आहे. गावची लोकसंख्या 1200ते1500च्या आसपास आहे. तरीही करहर भागातील मोठ्या गावच्या यादीत गावचे नाव येते. गावात मुख्यतः गोळे आडनावाचे सर्वाधीक 80% लोकसंख...

*आरु'ज केक क्रियेशन* 1st anniversary

       *आरु'ज केक क्रियेशन*    गेल्यावर्षी चे पाहिलं लॉक डाउन संपवून  सप्टेंबर मध्ये मुंबईला सहकुटुंब परत आलो. मुंबईत अजूनही परिस्थिती भयावह होती. आराध्य ची शाळा ऑनलाइन 1 तास होत होती. माझे काम ऑनलाइन आणि महिन्यात 1 site भेट अस चालू होतं.   यात मनोरमा जी सतत कार्यरत राहणं हा तिचा स्वभाव आहे . जी, 2006 पासून 2018 पर्यंत जबरदस्त असे मेहनत आणि कष्ट mearsk सारख्या जागतिक no.1 शिपिंग कंपनीत एक छोट्या पोस्ट पासून सुरवात करून, स्वतःच्या hard work, dedication, managment skill च्या माध्यमातून, टीम लीडर आणि पुढे bussiness anyalist अशा मोठ्या पदापर्यंत झेप घेतली.😊 कामात ती ग्रेट तर आहेच.    सोबत 2014 ला ती जगातील सर्वात मोठा रोल म्हणजे आईचा रोल पार पाडत होती. 2017 ला तिला जाणवले की तिला तीच्या मूला साठी काम सोडावे लागेल. तर क्षणाचाही विचार न करता एवढी मोठी पोस्ट सोडून तीने स्वतःला सर्वस्वी झोकून दिले. तिचा परिस स्पर्श असा झाला की आज जो आराध्य आहे तो आमच्या स्वप्न पलीकडचा आहे. तिची मेहनत, प्रेम फळाला आले. आजही आराध्य ला सामान्य मुलांच्या तुलनेत...

बायकोला पत्र1

प्रिय, माझी गोड गोड मनोरमा, आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.   आजपर्यन्त तू अनेक केक बनवलेस पण आज मी तुझ्यासाठी खास केक बनवतो. 😊😊   केक चा बेस जसा बेसिक असतो तस इतर स्त्रिया असतात. पण तू माझ्यासाठी खास आहेस. नुसता बेस नसून ब्लॅक फॉरेस्ट केक आहेस.      ज्या प्रमाणे तू जो बेस बनवते, बनवत असताना मन एकाग्र करतेस, कारण त्याच्यवरच त्याचा आकार अवलंबून असतो, ती तू आहेस फुल्ल स्ट्रॉंग. केक बेक झाल्यावर ज्या कडक कडक कडा असतात त्या कट केल्या जातात, कारण केक फक्त फक्त (only) सॉफ्ट असावा तशी तू आहेस. 😊 बेस वर जस शुगर सिरप आणि क्रीम टाकतात तशी तू माझ्यासाठी yummy yummy आणि testy cream आहेस. माझ्या आयुष्यात तू येऊन माझी life creamy आणि sweet झालंय. 😊 आणि शेवटी केक च टोपिंग आणि डेकोरेशन सारख तू अशीच माझी सुंदर आणि गोड item माझ्या साठी बनून राहावंसं.  आणि केक सारख माझं आयुष्य गोड आणि सॉफ्ट राहावं. 😊😊 पुढेही असेच अनेक केक बनव आणि मला खायला मिळावेत पहिल्या वर्धपान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा  keep it up.        ...

बायकोला पत्र

प्रिय, माझी गोड गोड मनोरमा, आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.   आजपर्यन्त तू अनेक केक बनवलेस पण आज मी तुझ्यासाठी खास केक बनवतो. 😊😊   केक चा बेस जसा बेसिक असतो तस इतर स्त्रिया असतात. पण तू माझ्यासाठी खास आहेस. नुसता बेस नसून ब्लॅक फॉरेस्ट केक आहेस.      ज्या प्रमाणे तू जो बेस बनवते, बनवत असताना मन एकाग्र करतेस, कारण त्याच्यवरच त्याचा आकार अवलंबून असतो, ती तू आहेस फुल्ल स्ट्रॉंग. केक बेक झाल्यावर ज्या कडक कडक कडा असतात त्या कट केल्या जातात, कारण केक फक्त फक्त (only) सॉफ्ट असावा तशी तू आहेस. 😊 बेस वर जस शुगर सिरप आणि क्रीम टाकतात तशी तू माझ्यासाठी yummy yummy आणि testy cream आहेस. माझ्या आयुष्यात तू येऊन माझी life creamy आणि sweet झालंय. 😊 आणि शेवटी केक च टोपिंग आणि डेकोरेशन सारख तू अशीच माझी सुंदर आणि गोड item माझ्या साठी बनून राहावंसं.  आणि केक सारख माझं आयुष्य गोड आणि सॉफ्ट राहावं. 😊😊 पुढेही असेच अनेक केक बनव आणि मला खायला मिळावेत पहिल्या वर्धपान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा  keep it up.        ...

*रॉयल Royal (मोठेपण)*

     *रॉयल Royal (मोठेपण)* हा फक्त शब्द नाही. हा दर्शवतो आपला स्वभाव, आपली जगण्याची पद्धत, आपली विचार शैली. तूम्ही कसले कपडे घालता या पेक्षा ते तुम्ही कसे घालता यात आपला अंदाज दिसतो. तस तुम्ही जे करता ते काय करता या पेक्षा कस करता यात दिसतो आपला रॉयल स्वभाव. रॉयल म्हणजे श्रीमंती नाही, रॉयल म्हणजे पैसे नाही. रॉयल म्हणजे मनाचा मोठेपणा, तुमचा जगण्याची पद्धत.  तुमच्या अंगी हा गुण स्वाभिवक असला पाहिजे. याचा आव आणणे आणि खरोखर रॉयल असणे यात फरक असती.  एखाद्याने आपल्या ला त्रास दयावा आणि वरून आपल्याला नावे ठेवून सुद्धा त्याला काहीही न बोलता विसरून जाणे हे मोठेपणाचे लक्षण असते. काहीजण चिल्लर वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. रॉयल माणस आशा छोट्या गोष्टीत पडत नाहीत. माणूस जपणं, त्यासाठी झिजन त्या साठी निस्वार्थ पणे झटन याला रॉयल म्हणतात. अशी माणसं क्वचितच भेटतात. अशी माणसं टिकवता आली तरी आपण रॉयल बनतो. Be a Royal....😊😊

*ट्रक ड्राइवर*

        *ट्रक ड्राइवर* रात्रीचे 8 वाजले होते रस्त्यावर खूप ट्राफिक दिसत होते. पुढे 2 ट्रक एकेमकंसमोर अडकले होते. गर्दी मुळे त्यांना मागे पुढे हलता येत नव्हते. बाईक वाले आणि कार वाले खूप हॉर्न वाजवत होते. इतक्यात त्या ट्रक ड्रायव्हरच्या दरवाजावर एका बाईक स्वाराने जोरात थाप मारली आणि त्याला शिव्या देऊ लागला. ट्रक ड्राइवर शांत पण त्याच्याकडे बघत होता. अनेक शिव्या देऊन झाल्यावर बाईक वाला निघून गेला. चेहऱयावर कोणताही भाव न धाकवता तो ट्रक ड्राइवर निर्विकार चेहऱ्याने रस्ता काढत पुढे निघून गेला. तो सर्व प्रसंग पाहून मी मात्र हताश झालो.       एवढं मेहनतीचं काम करणारे हे ट्रक ड्राइवर, रस्त्यावर आयूष्य जगतात. अहोरात्र ट्रक चालवून, आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवतात, अगदी सर्व सर्व गाड्या, कपडे, अन्न धान्य,  दूध, भाजी फळे, औषध गोळ्या पोचवतात. अशी कोणतीच गोष्ट नाही जी ट्रक ड्राइवर घेऊन जात नाहीत. अगदी जेव्हा लोकांना बसेस एसटी भेटत नाही तेव्हा हे ट्रक आपल्याला प्रवासात सहकार्य करतात.  कंपन्याचा सर्व अर्थकारण यांच्या वेळेवर अवलंबून असते. एकप्रकार...

*भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली*

     *भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली* इतिहासात तानसेन बद्दल आपण वाचलेलं आहे की तो किती महान सुरांचा नायक होता. आताच्या पिढीचे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण सुरांची महाराणी, अद्वितीय अशी महानायिका आपण याची डोळा पाहिली आणि याची कानी ऐकली. भविष्यात जिच्या नावाने अनेक दंतकथा तयार होतील. आम्ही  ही लहानपणी अशीच एक दंत कथा ऐकली होती. अमेरिकेचे भारतावर कर्ज वाढत चालले होते. हे कर्ज माफ करायचे असेल तर अमेरिकेनं भारताला एक प्रस्ताव दिला होता की तुमची गणकोकिळा म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर याना अमेरिकेची नागरिक करा.तिच्या आवाज हा अमेरिकेचा मालकीचा आवाज असेल. भारताने तो प्रस्ताव लगेच फेटाळला. कथेचा भाग सोडला तर हे कळते की हा आवाज की अमुल्य आहे. आज माई आपल्यात शरीराने नाहीत पण आवाजाने आजारामर झाल्या आहेत. "ये मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पाणी" हे देशभक्ती गीत त्यांच्या आवाजात ऐकून शहराला नाही असा भारतीय सापडणार नाही. आणि आज परत एकदा दीदी ने जगाला निरोप देऊन आपणा सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. *भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) याना भावपूर्ण श्रद्धांजली.*

*परी चा आजोबा*

*परी चा आजोबा*    मुलगी ला मुलगी म्हणजे नात झाली म्हणून आजोबा आजी भेटायला गेले. पाच दिवसांच नाजूक बाळ अजून ही नीट डोळे उघडत नव्हतं. अचानक बाळाच्या तोंडातून पाणी येऊ लागले आणि डोळे मिटून निपचित पडून होत. मुलीची सासर ची परिस्थिती हालाकीची, त्यात मुलगी झाली म्हणून नाराज. कोणी लक्ष देत नाही हे बघून आजोबाने बाळाला कुशीत घेतलं आणि दवाखान्याकडे धाव घेतली.  गाव मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात. घरात गाडी नाही. रस्त्यावर येऊन गाडीची आशेनं वाट  बघत इकडे तिकडे बघत होता. इतक्यात एसटी आली. एसटी सोलापूर ची होती पण थांबे घेत जाणार होती. ड्राइवर ला परिस्थिती संगीतली. ड्राइवर ने जमेल तेवढी वेगात गाडी सोलापूर ला पोहचवली.      2 दिवस दवाखान्यात ठेऊन डिस्चार्ज घेतला.  मुलीला डाउन सिंड्रोम आहे असं डॉक्टरानी सांगितलं. किती जगेल सांगता येणार नाही. सासर ची माणसांनी मुलगी अपंग आहे म्हणून नको म्हणून सांगितले. आपल्या मुलीचा तिच्या मुलीसाठी तुटणारा जीव पाहून बाप हळहळला. 5 दिवसांचा तो मांसाचा तुकडा कुशीत घेऊन मुंबई घाटली. जे होईल ते प्रयत्न करून मुलीला जगवायच असा न...