*ट्रक ड्राइवर*

        *ट्रक ड्राइवर*
रात्रीचे 8 वाजले होते रस्त्यावर खूप ट्राफिक दिसत होते. पुढे 2 ट्रक एकेमकंसमोर अडकले होते. गर्दी मुळे त्यांना मागे पुढे हलता येत नव्हते. बाईक वाले आणि कार वाले खूप हॉर्न वाजवत होते. इतक्यात त्या ट्रक ड्रायव्हरच्या दरवाजावर एका बाईक स्वाराने जोरात थाप मारली आणि त्याला शिव्या देऊ लागला. ट्रक ड्राइवर शांत पण त्याच्याकडे बघत होता. अनेक शिव्या देऊन झाल्यावर बाईक वाला निघून गेला. चेहऱयावर कोणताही भाव न धाकवता तो ट्रक ड्राइवर निर्विकार चेहऱ्याने रस्ता काढत पुढे निघून गेला. तो सर्व प्रसंग पाहून मी मात्र हताश झालो.
      एवढं मेहनतीचं काम करणारे हे ट्रक ड्राइवर, रस्त्यावर आयूष्य जगतात. अहोरात्र ट्रक चालवून, आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवतात, अगदी सर्व सर्व गाड्या, कपडे, अन्न धान्य,  दूध, भाजी फळे, औषध गोळ्या पोचवतात. अशी कोणतीच गोष्ट नाही जी ट्रक ड्राइवर घेऊन जात नाहीत. अगदी जेव्हा लोकांना बसेस एसटी भेटत नाही तेव्हा हे ट्रक आपल्याला प्रवासात सहकार्य करतात.  कंपन्याचा सर्व अर्थकारण यांच्या वेळेवर अवलंबून असते. एकप्रकारे देशाची रस्त्यावर चालणारी ही जीवनवाहिनी आहे. कोरोना काळात या ट्रक ड्राइवर मूळे आपल्याला खायच्या गोष्टी मिळत होत्या. 8 8 दिवस प्रवास करून हे ट्रक ड्राइवर पूर्ण देशभर जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते.
अशा महत्वाच्या वाहकास आपण इतर वेळी अगदी तुच्छ वागणूक देतो. त्यांना वेळेवर जेवण भेटत नाही, कौटुंबिक सुख भेटत नाही, पूर्ण झोप तर यांच्या नशिबात कधीच नसते. रोज अंगोळ नसते. गर्मी थंडी न बघता वेळेवर गाडी पोहचवणे त्यात असलेला लाखो चा माल यांच्या जबाबदारीवर असतो. आणि हे फक्त 500 ते 1000 चे मालक असतात.
रस्त्यावर गाडीवाले, बाईक वाले जमेल तसे याना कट मारतात आणि अपघात झाला की यांनाच जबाबदार धरतात. शिव्या देतात, उलट बोललं की जमाव मिळून यांनाच चोप देतो. अतिशय खराब रस्त्यावर ट्रक चालवून यांचे गुढगे, पाठ खिळखिळी होते, रात्र भर प्रवास करून करून डोळे लवकर अधू होतात. वेळेवर जेवण न मिळाल्याने ऍसिडिटी, मधुमेह, मूळव्याध, असे आजार याना जडतात. त्यात शारीरिक सुख न मिळाल्यास इतर मार्ग अवलंबून नको आजार पाठीशी लागतात. सोबत पोलिसांनी केलेला मानसिक आणि आर्थिक पिळवणूक वेगळीच असते.
असे खडतर जीवन जगणारे आणि आपल्यासाठी स्वतःचे जीवन रस्त्यावर घालवणारे  ट्रक ड्राइवर ला आपण रस्त्यावर योग्य सन्मान आणि वागणूक दिली पाहिजे. कधी कधी ते चुकत असतील पण आपण समजून घेतले तर मोठे अपघात टळू शकतात.
हा लेख सर्व ट्रक ड्राइवर ना समर्पित.👍👍

-- जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)