Posts

Showing posts from December, 2023

मंदिर उद्घाटन सोहळा दिवस पहिला भव्य मिरवणूक

 *मंदिर उद्घाटन सोहळा दिवस पहिला - भव्य मिरवणूक* गेले १ वर्ष ज्या दिवसाची संपूर्ण गाव वाट पाहत होता तो दिवस ठरला होता.. महू गावच्या काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडणार होता २५ ते २७ डिसेंबर २०२३ ला.   जशी २५ तारीख जवळ येऊ लागली मुंबईकर, पुणेकर आणि अगदी आफ्रिकेवरून गाववाले गावाकडे पोहचले होते. ख्रिसमस च्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या त्यामुळे मुंबई-पुणे रस्ते तुडुंब गर्दीने भरले होते. 5 तास ऐवजी 8-9 तास प्रवास करून भाविक गावी पोहचत होते.    गावच्या लोकांनी नियोजन खूप जबरदस्त केले होते. अनुभवी आणि उत्कृष्ट ब्राम्हण बोलवले होते. त्यांची रूपरेषा नियोजित आणि कडक होती. गावच्या प्रतेक ग्रामस्थांचा या कार्यात सहभाग लाभेल याची काळजी त्यांच्या विधिंमध्ये घेतली गेली होती.  24 तारखेला मंदिरामध्ये सर्वांना थोडे थोडे तांदूळ जमा करायला सांगितले होते. त्या तांदळात मूर्ती ठेवणार होते. मग 26 तारखेला जलादीविधी पुरुषांकडून नदीवरून पाणी आणून त्या पाण्याने सर्व ग्रामस्थ, स्त्री, पुरुष, लहान मुले सर्व मूर्तींना अभिषेक घालणार होते.  27तारखेला स्त्रिया नदीवरून पाणी...

काळभैरवनाथ मंदिर उद्घाटन 2023

Image
काळभैरवनाथ मंदिर उद्घाटन दिनांक 27.12.2023 27+12=39. 3*9=27 3+9=12  काळभैरव शिवाचे पाचवे रूप आहेत पौराणिक कथांनुसार अंधकासुर नावाचा दैत्य   पौराणिक आख्यानों के मुताबिक, अंधकासुर नाम का दैत्य अपने कृत्यों से अनीति और अत्याचार की सीमाएं पार कर रहा था. एक बार घमंड में चूर होकर उसने भगवान शिव पर हमला कर दिया. तब उसके संहार के लिए शिव के रुधिर से भैरव की उत्पत्ति हुई.   पुराणों में भगवान भैरव को असितांग, रुद्र, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाली, भीषण और संहार नाम से भी जाना जाता है.  सत्कार कार्यक्रम नियोजन मान्यवर हस्ते मंदिर कमागारांचे सत्कार सर्व पाहुणे येतील त्यांना श्रीफळ देऊन सन्मान करणे.  अर्जून भिकू, दत्ता महादेव, रमेश दिनकर, आनंदराव जगताप,  बाबा, विठल सरपंच, रवी रांजणे, शंकर गोळे, विलास जगताप, प्रताप, प्रीतीश, भरत श्रीपती, दिलीप तुकाराम, दिलीप रामचंद्र, रोहिदास, धर्मा, अमोल गोळे, नितीन मोतीराम,  अमोल गुरू, संतोष जगताप, संदीप दत्तात्रय, अमित रांजणे, जितू, विजय, अजय जगताप, किरण श्रीरंग, प्रदीप शिवराम, संतोष तुकाराम, प्रदीप किसन, द...

सॅम is back

*Sam is back* कधी काळी एका पेपर मध्ये लेख वाचला होता *भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ जबरदस्त पराक्रमी, दूरदृष्टी असणारे आणि स्पश्ट वक्ते होते.* पाकिस्तान ने  (पूर्वी पाकिस्तान) बांगलादेश मध्ये सैनिकी कारवाई करून तेथील आंदोलन चीरडत होते, 30 लाखहुन अधिक बांगलादेशी भारतात पळून आले होते. तेव्हा सरकारने तेव्हाचे सेनाप्रमुख सॅम माणेकशॉ यांना बांगलादेश मध्ये कारवाई करा यासाठी मीटिंगला बोलवले. पण युद्ध फक्त लढायचे नसते तर जिंकायचे असते हे माहीत असलेल्या सॅम यांनी यासाठी 6 महिने थांबावे लागेल हे ठणकावून सांगितले आणि ते किती योग्य होते हे नंतर सिद्ध ही केले.  असा आपला सुपर हिरो वर आलेला सिनेमा बघायचाच हे मनाशी ठरवून दिवसभर काम आटपून रात्रीचा साडेअकराचा शो चे तिकीट काढून तो बघितला आणि एक अद्भुत कलाकृती चा आनंद घेतला.  अनेक प्रसंगांत असे अंगावर काटे येतात. त्यातल्या त्यात जेव्हा माणेकशॉ यांना मिझोरम तिथली परस्थिती सुधारवाने साठी पाठवतात तेव्हा तेथील कॅम्प मध्ये पोहचल्या पोहचल्या गाडीवर उभे राहून तेथील जवानांना प्रेरित करतात आणि शेवटी म्हणतात Sam is back हे शब्द मनात घर करतात....