सॅम is back
*Sam is back*
कधी काळी एका पेपर मध्ये लेख वाचला होता *भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ जबरदस्त पराक्रमी, दूरदृष्टी असणारे आणि स्पश्ट वक्ते होते.* पाकिस्तान ने (पूर्वी पाकिस्तान) बांगलादेश मध्ये सैनिकी कारवाई करून तेथील आंदोलन चीरडत होते, 30 लाखहुन अधिक बांगलादेशी भारतात पळून आले होते. तेव्हा सरकारने तेव्हाचे सेनाप्रमुख सॅम माणेकशॉ यांना बांगलादेश मध्ये कारवाई करा यासाठी मीटिंगला बोलवले. पण युद्ध फक्त लढायचे नसते तर जिंकायचे असते हे माहीत असलेल्या सॅम यांनी यासाठी 6 महिने थांबावे लागेल हे ठणकावून सांगितले आणि ते किती योग्य होते हे नंतर सिद्ध ही केले.
असा आपला सुपर हिरो वर आलेला सिनेमा बघायचाच हे मनाशी ठरवून दिवसभर काम आटपून रात्रीचा साडेअकराचा शो चे तिकीट काढून तो बघितला आणि एक अद्भुत कलाकृती चा आनंद घेतला.
अनेक प्रसंगांत असे अंगावर काटे येतात. त्यातल्या त्यात जेव्हा माणेकशॉ यांना मिझोरम तिथली परस्थिती सुधारवाने साठी पाठवतात तेव्हा तेथील कॅम्प मध्ये पोहचल्या पोहचल्या गाडीवर उभे राहून तेथील जवानांना प्रेरित करतात आणि शेवटी म्हणतात Sam is back हे शब्द मनात घर करतात.
आपल्या स्वभावामुळे अनेकवेळा अडचणीत येतात पण मोठे धेय्य साध्य करणारे अशा छोट्या अडचणी सहज पार पाडतात हे त्यांनी उत्तम दाखवले आहे.
आपला जाज्वल्य इतिहास आपले खरे हिरो आपल्या मुलांना नक्की दाखवा. यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना शतश: नमन.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment