Posts

Showing posts from September, 2022

गद्दार की खुद्दार

                     *गद्दार की खुद्दार* गेले 3 महीने सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द म्हणजे हा गद्दार.. जस टेनिस खेळताना टेनिस बॉल आणि बॅटमिंटन खेळताना कॉक नेट च्या अलिकडून पलीकडे आणि परत अलीकडे येत जात राहतो तसा हा गद्दार शब्द सध्या झाला आहे. दोन्ही कडचे खेळाडू संपूर्ण ताकद लावून दुसऱ्या बाजूला टाकत आहेत. पण कोणीच हार मानत नाहीये.   पण या शब्दाकडे प्रत्येक जण वेगळ्या अर्थाने बघत आहे.  एक आहे विचारांची बाजू आणि दुसरी आहे वारश्याची बाजू. वारसा जन्माने येतो आणि तो आला. विचार हे डोक्यात घुसळावे लागतात. महात्मा गांधी भारताचे आणि जगाचे बापू झाले ते त्यांच्या अहिंसाच्या विचारांमुळे, तत्वामुळे.  त्यांचे विचार आत्मसात करून मार्टिन ल्युथर किंग हा अमेरिकेचा गांधी झाला. त्याचा आणि गांधी रक्ताचा नाही तर विचारांचा संबध होता. गांधी चे मुले गांधी झालीत पण महात्मा नाही बनू शकलीत.  छत्रपती संभाजी महाराज शिवपुत्र तर होतेच त्यांचेकडे वारसा पण होता आणि त्यांनी विचार ही स्वराज्याचे मोठे केले. त्यांची कारकीर्द ही ओळखली जाते ती त...

शौच भांडे प्रवास

                 *इंडियन की वेस्टर्न*  आपल्या प्रत्येकाला रोज ज्या गोष्टींची नितांत गरज असते त्यात शौचालय हे येते. जुन्या काळात कमी लोकसंख्या आणि मोठी मोकळी जागा यामुळे हा प्रश्न दुर्लक्षित होता. पण स्त्रियांना यासाठी रात्र होण्याची वाट पहावी लागत होती. हळू हळू लोकसंख्या वाढत गेली आणि उघडयावर सौच विधीमुळे अनेक आजाराच्या साथी येऊ लागल्या. हळू हळू शौचालय तयार होत होते. पण यात राजकीय क्रांती झाली ती 2014 नंतर. मोदी सरकार ने हर घर शौचालय ही योजना राबवून हा प्रश्न निकाली काढला. या अशा महिमेमुळे अनेक साथीचे रोग तर थांबलेच पण विचार करा कोरोनाकाळात जर उघडयवात शौच विधी करावा लागला असता तर गावेच्या गावे उध्वस्त झाली असती. त्यासाठी सरकारचे आभार.  असो आपला विषय आहे शौचालय चे प्रकार. इंडियन आणि वेस्टर्न असे 2 प्रकार चे सौच भांडे असते. भारतात इंडियन पद्धत योग्य मानली जाते. आपल्या आहार शैली मुळे ती योग्य पण आहे. पण सध्या शहरीकरणामुळे बिल्डिंग तयार होत आहेत.त्यात बिल्डर वेस्टर्न पद्धतीचे शौचालय देतात. मग ते वापरून आपल्या लोकांना...

BDO visit to mahu gaav

         *अभिनंदन ग्रामस्थ मंडळ महू*  काल 24 सप्टेंबर ला महू गावामध्ये देशभरातील विविध राज्यातील BDO च्या टीम घनकचरा व्यवस्थापन कसे होते हे पाहण्यासाठी भेट दिली. त्याचे विडिओ आणि फोटो पाहून मन भरून आले. खरोखरच जबरदस्त अशी नैसर्गिक अशी संपत्ती लाभलेलं हे गाव आहे. मी देशभर विविध राज्यात फिरत असतो. असंख्य अशी गावे मी पहिली आहेत.काही प्रगत आहेत, काही मोठी आहेत  काही माळरानावर आहेत काही सपाट प्रदेशात आहेत. काही डोंगरावर असतात.  काहीना खूप जमीन आहे पण पाणी नाही, काही ना पाणीच पाणी आहे पण पिकाऊ जमीन नाही.  आपलं गाव पाणी, जमीन, डोंगर, नदी, धरण या सर्व बाजूनी उजव आहे. लहानपणी जे नदीकडच गाव अस आपण चित्र काढतो ते आपलं गाव आहे. एक बाजूला डोंगर, दुसरीकडे नदी.गावाला वाडी,  गावातून जाणार बाविचा वडा, खूप अशा विहिरी. मधोमध असलेलं मंदिर आणि चारही दिशाना पसरलेलं गाव. गावच्या शिवेवर काळभैरवनाथच मंदिर. काळभैरवनाथ गावच रक्षण करत उभा आहे.  मेहनती अशी गावातील जनता. सामाजिक सलोखा ठेवणारे ग्रामस्थ. यावर्षी तर गणपतीत अद्भुत असे खेळ घेतले गेले. महिला, लहान मूल...

फोऊजी दाजी

               *मिलिटरी मॅन*    सातारच्या प्रत्येक गावात ,लहानपणापासून मुलांना कोणत्या गोष्टीचे कौतुक असेल तर ते मिलिटरी सैनिक भरती, पोलीस भरती आणि इतर देश सेवा करण्याच्या भरती. जशी जशी मोठी होतात तस अनेक जण स्वप्न घेऊन अथक परिश्रम करून ते स्वप्न पूर्ण करतात. हे स्वप्न बघताना त्यांनी आपलं कुटुंब मागे सोडलेले असते, *परत आलो तर कुटुंबाचा नाहीतर भारतमातेचा* हे ब्रीदवाक्य घेऊनच हे तरुण तडफदार,देशसेवेने पेटून उठून हजारो किलोमीटर दूर कुठेतरी एक बंकर मध्ये आपले स्वप्न पुर्ण करत असतात. जे भारतमातेचे होतात त्यांना अमरत्व मिळते. असेच या 2  महिन्यात जावळीच्या 2 जवान अमर झाले. त्यांच्या  कुटुंबाचा त्याग मोठा असतो. तसाच त्याग जे देशसेवा करून परत कुटुंब सेवा करायला येतात त्यांच्या कुटुंबाचा असतो. देशभर जिथे जिथे बदली होईल तिथे जायचं आणि परत नवीन सुरवात करायची. मुलांचे शिक्षण अनेक ठिकाणी करत करत शेवटी कुठेतरी गावाजवळील शहरात स्थायिक व्हायचे हे करणारा मिलिटरी मॅन देखील तेवढाच ग्रेट असतो जेवढा अमरत्व बहाल झालेला असतो. आमचे कुटुंबात, 2 दाजी, 2 म...

Gou shala Cow

सध्या काळ झपाट्याने बदलत आहे. गाई म्हशी पालन आता कालभहय झालं आहे. लहान मुलांना गौशाला म्हणजे काय हे कळावे म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे.  Chitoorgarh, rajasthan मध्ये ही गौशाला आहे. 200 गाई या ठिकाणी आहेत. 

*श्री गणेश मित्र मंडळ*

--------------*श्री गणेश मित्र मंडळ*------------ गणपती उत्सव का व्हावा याची अनेक कारणे आहेत. अनेक नवीन मंडळ तयार होतात आणि काळा बरोबर लुप्त होतात. मंडळ रुजली आणि फुलली की ती असा काही करिष्मा करतात की त्यांना तोड नसते. साताऱ्यातील जावळीतीळ कुडाळ खोऱ्यातील महू गाव अफलातून आहेच पण या गावातील श्री गणेश मित्रमंडळ असे रुजलय की जस जून अवाढव्य वडाच झाड जस आपल्या पारंब्या जमिनीत रोवून डॊलत उभे असते. मंडळाचे कार्यकर्ते आशा पारंब्या आहेत की झाड दिवसेंदिवस मजबूत आणि बलाढ्य होत आहे. कार्यकर्ते नम्र आणि सर्वांना सामावून घेणारे आहेतच, त्यासोबत स्वाभिमान जपणारे आहेत.   40व्या वर्षाकडे वाटचाल करणारे मंडळ गावची शान आहे. मंडळ खूप जुने आहे पण रजिस्ट्रेशन झाले ते 1982 मध्ये.  *संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत रामचंद्र गोळे* यांनी आणि सहकाऱ्यांनी मिळून स्थापन केलेले मंडळ हळू हळू गावची ओळख बनले. *मानसिंग जयसिंग गोळे, विठ्ठल दगडू गोळे, अशोक किसन गोळे, दिलीप सीताराम गोळे व आताचे विद्यमान अध्यक्ष भरत श्रीपती गोळे असे मात्तबर अध्यक्ष मंडळाला लाभले आहेत.* मंडळाची अनेक गोष्टीत हातखंडा आहेत पण सर्वात वर मान...

करहर चा आठवडा बाजार

करहर चा आठवडा बाजार    पश्चिम महाराष्ट्र म्हणजे एकामागोमाग डोंगर रांगा आणि त्या रांगा मध्ये वसलेले छोटे छोटे खेडी, गावं, वस्त्या, वाड्या. दुर्गम आशा या भागात वसलेल्या या गावांना एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे बाजारच गाव. आठवड्यातील 1वार ठरलेला असतो. त्या वारी आठवडा बाजार भरतो. भागातील सर्व प्रकारचे व्यापारी, शेतकरी, चांभार, कुंभार, लोहार, बेलदार, असे बारा बलुतेदार या बाजारात येतात.  जनावरे, कपडे, शेतीचे अवजारे, भाजीपाला, फळे, मिठाई, अस विविध प्रकारची दुकान या बाजारात असतात.  दहावी ला असताना मराठीचा शेवटचा धडा होता तो म्हणजे लाल चिखल. एक शेतकरी त्याचा टोमॅटो चा खप होत नाही म्हणून शेवटी तो माल रस्त्यावर टाकून पायाने तुडवतो, त्यात त्याचा घाम, मेहनत, अश्रू, हतबलता डोळ्यासमोर उभी राहते. तो धडा वाचला की माझ्या डोळ्यासमोर उभा राहायचा तो करहर चा आठवडा बाजार.  या गणपतीत पुन्हा तो बाजार अनुभवायाची संधी मिळाली. याचा 1 तरी विडिओ बनवायचा होता.  ती इच्छा या वेळी पूर्ण केली.  नक्क्की बघा आणि कंमेंट मध्ये तुमचा आठवडा बाजार चे गाव कोणते ते सांगा.  https://youtu.be/...