फोऊजी दाजी
*मिलिटरी मॅन*
सातारच्या प्रत्येक गावात ,लहानपणापासून मुलांना कोणत्या गोष्टीचे कौतुक असेल तर ते मिलिटरी सैनिक भरती, पोलीस भरती आणि इतर देश सेवा करण्याच्या भरती. जशी जशी मोठी होतात तस अनेक जण स्वप्न घेऊन अथक परिश्रम करून ते स्वप्न पूर्ण करतात. हे स्वप्न बघताना त्यांनी आपलं कुटुंब मागे सोडलेले असते, *परत आलो तर कुटुंबाचा नाहीतर भारतमातेचा* हे ब्रीदवाक्य घेऊनच हे तरुण तडफदार,देशसेवेने पेटून उठून हजारो किलोमीटर दूर कुठेतरी एक बंकर मध्ये आपले स्वप्न पुर्ण करत असतात. जे भारतमातेचे होतात त्यांना अमरत्व मिळते. असेच या 2 महिन्यात जावळीच्या 2 जवान अमर झाले. त्यांच्या कुटुंबाचा त्याग मोठा असतो. तसाच त्याग जे देशसेवा करून परत कुटुंब सेवा करायला येतात त्यांच्या कुटुंबाचा असतो. देशभर जिथे जिथे बदली होईल तिथे जायचं आणि परत नवीन सुरवात करायची. मुलांचे शिक्षण अनेक ठिकाणी करत करत शेवटी कुठेतरी गावाजवळील शहरात स्थायिक व्हायचे हे करणारा मिलिटरी मॅन देखील तेवढाच ग्रेट असतो जेवढा अमरत्व बहाल झालेला असतो. आमचे कुटुंबात, 2 दाजी, 2 मावसभाऊ, सीमेवर तर 1 चुलतभाऊ राज्य सेवेत रुजू आहेत. 25 मे ला असेच मिलिटरी सर्विस पूर्ण करून पुण्यात स्थायिक झालेले आमचे दाजी श्री.भरत सर्जेराव गोळे यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला. विवाह सोहळ्यात त्यांच्या मिलिटरी शिस्तीची चुणूक दिसली. खास आकर्षण म्हणजे त्यांनी मागावलेल्या मिलिटरी पियानो बँड ने वातावरण संगीतमय करून टाकले होते. हा सोहळा म्हणजे त्यांचे मुलीचे लग्न हे त्यांच्या जीवनाचे पूर्ण झालेले स्वप्न होत.
या मिलिटरी मॅन ने गावात आणि त्यांच्या कामात दोन्हीकडे कमावलेला मानमरातब या ठिकाणी दिसला.
अशाच सर्व मिलिटरी मॅन चे स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
जय हिंद.
जयंत जगताप.
Comments
Post a Comment