आशावाद
पुन्हा नवीन रस्ता आपण गाडी चालवत असताना मोबाईल मधील गुगल मॅप वापरतो. गुगल मॅप ने चालताना जर ड्राइवर गाडी मॅप प्रमाणे वळण न घेता पुढे गेला तर गुगल मॅप चा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही तर मॅप "#रिरूट" करते. पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो. जीवनातील असंच वळण चुकलं तर त्याची #चूक काढत बसण्यापेक्षा आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना "#रिरूट" करायला भाग पाडलं पाहिजे. झालेल्या चुकांवर भर देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा "#रिरूट" करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही योग्य राहील.