मृत्यू
मृत्यू
मस्त,
मृत्यू अटळ आहे पण आपल्याला फक्त तो जेवढा पुढे रेटता येतो तेवढा रेटायचा. त्याला जीवन म्हणतात आणि लढणे म्हणतात.
हॉलिवूड चा एक चित्रपट आहे gladiator. त्यात मॅक्सिमस या सेनापतीच्या कुटुंबाला मारून टाकले जाते आणि त्याला ही मारत असतात पण तो वाचतो आणि एका गुलामांच्या कबिल्यात सापडतो.
तिथे त्याला मृत्यू हवा असतो, तेव्हा त्याचा साथीदार म्हणतो, प्रत्येकाला मरायचे आहे. तुझे बायका पोर स्वर्गात तुझी वाट बघत असतील पण तुझी वेळ आज नाही आहे. तुला इथे अजून खूप काही करायचं आहे.
"You will dia but not today, not now, your time has not come".
यातून मी शिकलो, प्रत्येकाची वेळ असते, ती चुकत नाही, तोंपर्यंत आपण जगायचं ते पण आनंदात, आपल्या धुंदीत.
मृत्यू प्रत्येकाला दिसेल तसा आहे. कधी तो दिसतो, कधी लपंडाव खेळतो, कधी हुलकावणी देतो, कधी हवासा वाटतो पण येत नाही, कधी आपण दूर पळतो पण तो शाश्वत आहे हे विसरतो.
Comments
Post a Comment