पहीली शाळा
जीवनातील पहीली शाळा 28 ऑगस्ट 2019 ला सकाळी सकाळी सुशील चा फोन आला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने विषय सांगितला की पुढच्या वर्षी म्हणजे सण 2020 ला आपल्या मराठी शाळेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमत्ताने अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आता पासून नियोजन करायचे आहे आणी त्यासाठी 29 ऑगस्ट ला वाशी मार्केट मध्ये एक छोटीशी बैठक बोलावली आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन देऊन आमचे संभाषण थांबले, पण त्यानंतर माझ्या डोक्यात शाळेच्या आठवणींचे सत्र चालू झाले. जिल्हा परिषद शाळा महू तालुका जावळी, जिल्हा सातारा सण1990 ते 1992 या कालावधीत माझ्या शाळेचा श्रीगणेशा चालू झाला तो जिल्हा प्राथमिक शाळा महू येथे. शाळेचा पहिला दिवस आजही आठवत आहे, वडील बरोबर आले होते सोबत एक पिशवीत एक श्रीफळ आणि टोपी होती, शाळेत मुख्यधपकाना श्रीफळ देऊन शाळेचा प्रवेश होत अ...