पहीली शाळा
जीवनातील पहीली शाळा
28 ऑगस्ट 2019 ला सकाळी सकाळी सुशील चा फोन आला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने विषय सांगितला की पुढच्या वर्षी म्हणजे सण 2020 ला आपल्या मराठी शाळेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमत्ताने अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आता पासून नियोजन करायचे आहे आणी त्यासाठी 29 ऑगस्ट ला वाशी मार्केट मध्ये एक छोटीशी बैठक बोलावली आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन देऊन आमचे संभाषण थांबले, पण त्यानंतर माझ्या डोक्यात शाळेच्या आठवणींचे सत्र चालू झाले.
जिल्हा परिषद शाळा महू
तालुका जावळी, जिल्हा सातारा
सण1990 ते 1992 या कालावधीत माझ्या शाळेचा श्रीगणेशा चालू झाला तो जिल्हा प्राथमिक शाळा महू येथे. शाळेचा पहिला दिवस आजही आठवत आहे, वडील बरोबर आले होते सोबत एक पिशवीत एक श्रीफळ आणि टोपी होती, शाळेत मुख्यधपकाना श्रीफळ देऊन शाळेचा प्रवेश होत असे व शाळेच्या रसिस्टर मध्ये नाव लागत असे. त्यावेळेस मुख्यधापक कोण होते ते आठवत नाही पण श्री काशिनाथ गोळे गुरुजी, महाडिक गुरुजी, गुरव गुरुजी व राक्षे बाई होत्या हे आठवत आहे . आशा प्रकारे शाळा चालू झाली आणि जीवनातील पहिल्या शाळेत प्रवास चालू झाला.
पहिली दुसरी चे वर्षे कशी गेली ते समजले नाही आणि आता आठवत ही नाही, पण अजूनही डोळ्यासमोर दिसतात ते इयत्ता तिसरी मधील काही आठवणी.
सकाळी सकाळी सफेद शर्ट, खाकी चड्डी आणि करकरीत सफेद गांधी टोपी घालून शाळेत निघायचे. ते पण एकटे नाही, सगळ्या आळीतील जवळ जवळ 8-10 जण एकत्र जमायचे आणि कोटरीतून किंवा पाटी कडून किंवा वरच्या आळीने शाळेत पोहचायचे.
आमचे वर्गशिक्षक होते गोळे गुरुजी. शाळेतील दिवसाची सुरुवात होत असे ती सकाळी 9:30 ते 10 वाजता सर्वजन इयत्ता सातवीच्या वर्गात एकत्र जमून शिस्तबद्ध पने उभे राहून सामूहिकपणे राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणून व एक प्राथना केशवा-माधवा तुझ्या नामात रे गोडवा अश्या प्रकारचे प्राथना म्हणून मग शाळा भरत असे. वर्गात गेल्यावर अगोदर दप्तर उघडून त्यातून बस्कर काढायचे आणि ते आपल्या जागेवर अंथरून त्यावर बसायचे.
(खुप जणांना प्रश्न पडेल बस्कर म्हणजे काय? त्यावेळेस शाळेत बसायचे बाकडे नव्हते, प्रत्येक जण खाली बसत असे खाली बसायला एक सफेद खताची किंवा धान्याची कोणाची घेऊन त्याला चारी बाजूने कपड्याची झालर लावलेली असायची, ते नेहमी आपल्या दप्तरात ठेवायचे आणि शाळेत असे अंथरायचे की अर्ध्या बस्तर वर दप्तर आणि अर्ध्यावर आपण बसायचे.)
शाळेचा पहिला तास गृहपाठ तपासणे आणि पाठांतर तपासण्यात जात असे यात प्रामुख्याने पाढे पाठ करून घेतले जात असत. या पाढे पाठांतराचा मला पुढील शिक्षणात खूप फायदा झाला. मग मराठी, गणित, सामान्य माहिती असे तास होत. 11 वाजता पहिली सुटी होत असे लागविची, त्यानंतर साडेबारा ते 2 पर्यंत जेवणाची सुट्टी असे. मला आठवते आम्ही सर्वजण जेवायला घरीच येत असायचो. जेवण करून मग सोनाराच्या चिंचेचे चिंचा घेऊनच परत शाळेत जायचे. मग 3 ते 4 एक तास अभ्यास करून दुसरी सुट्टी व्हायची ते थेट शाळा सुठेपर्यंत खेळ चालायचे, शाळेला चांगले पटांगण लाभले आहे,त्या पटांगणात लंगडी, पकडा-पकडी, मामाचे पत्र हरवले ते मला सापडले, असे विविध मैदानी खेळ खेळून पण आम्ही थकत नासायचो. पाच वाजता सर्वांनी आपल्या आपल्या वर्गात जमायचे जन-गण-मन म्हणायचे मग सर्वाना भुकटी वाटली जायची, सकाळच्या करकरीत टोपीची घडी उघडून, त्या टोपीतच सुकटी घ्यायची आणि शाळा सुटायची घंटा टंटणतानातं टॅन टॅन वाजली की दप्तर उचलून घराकडे पळत सुटायचे, असे ते शाळेचे अतिशय आनंदी, निरागस होते, कसलीही चिंता काळजी, स्पर्धा नव्हती होता तो फक्त आनंद.
श्री. जयंत पांडुरंग जगताप
Comments
Post a Comment