Posts

Showing posts from June, 2022

ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर

           *ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर* गाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते गावचे केंद्रस्थान. आणि आपल्या गावचे केंद्रस्थान आहे आपले ग्रामदैवत काळ भैरवनाथ मंदिर.  मंदिराच्या समोर लावलेल्या पायरीवर ह्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला ते वर्षे कोरल आहे ते होत साल1940.     अतिशय मजबूत अस पाया आणि बसायची व्यवस्था असलेलं आपलं मंदिर वरील लाकडी फ्रेम मध्ये बांधलं होत.  हळू हळू ऊन वारा पाऊस यांच्याशी लढत उभे आहे.  आता त्याला पुन्हा एकदा नवा साज देऊन अजून मजबूत करायचा आशीर्वाद आणि जबाबदारी काळभैरवनाथाने आपल्यावर दिली आहे.  आपला गाव मोठा आहे. अनेक वेगवेगळे विचारांनी आपण सर्व गावचा विकास कसा साधायचा हे ठरवत असतो.  आता मंदिर कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य करायचे आहे. यश देणारा आपला काळभैरवनाथ आहे आपण फक्त कर्म करायचे आहे.   काही शासकीय देणगी आली आहे. त्यासोबत आपण सर्वांनी आपला वाटा देऊन हे मंदिर सर्वांगसुंदर आणि मजबूत अस करूया.     यासाठी येत्या रविवारी 19 जून 2022 ला वाशी कांदा बटाटा मार्केट म...

माझा बाप

Image
                                        -----–------/-/---- *माझा बाप* ---/---/////----//    1955 चा ऑक्टोबर महिना होता, साताऱ्याच्या जावळी मध्ये थंडी ने पांगरून घातले होते. 12 वाजले तरी धुके हटत नव्हते. जगताप वाड्यात बायकांची धावपळ चालू होती, चुलीवर गरम पाणी तापत होते, धुके त्यात धूर अस सफेद वातावरण तयार झालं होत . जाया अक्का, हौसाबाई , गोजाबाई (अप्पांची आई), आणि अजून घरातील स्त्रिया मधल्या घरात ये जा करत होत्या. सरसाबाई गरोदर होती, शेवटचा महिना आणि शेवटचे दिवस चालू होते, कळा चालू झाल्या. तसे हे सहावे अपत्य होणार होत, पहिले पाच मध्ये 2 मूल आणि 3 मुली होत्या, भिकू, पवित्राबाई, विनायक, जिजाबाई, पार्वतीबाई हे पाच बहिणी भावंड. आता सहाव्या चा जन्म होणार होता. थोडा वेळ गेला आणी कोणातरी सांगत आलं मुलगा झाला. वजन कमी होत, आणि बाळ निपचित पडून होत. बायकांनी पाणी टाकून, हलवून प्रयत्न केले पण काही प्रतिसाद नव्हता. सर्वांचे तोंड पडलीत. पुढचं सोपस्कर करायची तयारीत होतेच इतक्यात रस्त्यावरन जा...

जयंत जगताप कविता

1.योद्धा है हम लढेंगे लढेंगे.. योद्धा है हम लढेंगे लढेंगे... हर संकट का मुह मोडेंगे मोडेंगे...  चल रहे जो लेकर महान विरासत,  (बेस्ट सर्विस की)... यूसे  ऐसेही शाश्वत बनाकर  रखंगे... रखेंगे... कई संकट आएंगे...जायंगे.... हम ऐसे ही नई उंचीइया छूयेंगे ...छूयेंगे... हा कभी कभी.. हम भी होते  है घायल,... डूबते है कसी घहराई में....  मगर हर बार भरे गहरी सास, फिर सतह पर. उभरेंगे... उभ्रेंगे...  हार जीत तो होती रहेगी हार.... जीत तो होती रहेगी... ऐसे ही नये मकाम बनायेंगे...बनायेंगे... योद्धे है हम लढेंगे लढेंगे.  योद्धे है हम लढेंगे लढेंगे.... Cheers to all service Team...  हिंदू कशाप्रकारे उठून उभा राहतो यावर सुचलेली छोटीशी चारोळी 🙏 योद्धे है हम लढेंगे लढेंगे, हर संकट का मुह मोडेंगे मोडेंगे. चल रहे जो लेकर महान विरासत, उसे रखंगे ऐसेही बनाकर शास्वत, कई आये कई गये, मिट गये खुद मिटाते मिटाते, हा कभी हम भी हुवे है घायल, डूबे है कसी घहराई में, पर मगर हर बार लिये गहरी सास, फिर उभरे है सतह पर. हार जीत तो होती रहेगी, योद्धे है हम लढेंगे लढेंगे. 2.  -----//...

*माझा हिमनग*

                 *माझा हिमनग* समुद्रात बर्फाचे मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग म्हणतात. ते जेवढे पाण्याच्या वर दिसतात त्यापेक्षा तिप्पट पाण्याखाली असतात. त्यांना आपण जेवढ बघतो त्या पेक्षा खूप मोठं त्यांचं आकारमान असत. त्यासाठी त्या हिमनागवर जाण गरजेचं असत. अशीच काही माणसं असतात जी हिमनगासारखं मन घेऊन आपल्या आयुष्यात येतात. त्यांना दुरून ओळखणं केवळ अशक्य असत. ती सुप्त पणे आपलं सत्कार्य करत असतात. त्यांच्या मनाची खोली ओळखण्यासाठी त्यांचे हिमनगावर उभे राहून शांत पणे ते थंडगार दिसणारे पण आतून प्रज्वलीत असलेलं मन ओळखावं लागत. ही माणसं सर्वांसाठी काही ना काही करत असतात पण शांत पणे न दाखवता पुढे निघून जातात.  अशीच तू आहेस डिअर. माझ्या साठी पडलेलं सुंदर स्वप्न आहेस तू. जेवढ आपण जवळ येतोय तेवढा अजून तुझ्या प्रेमात पडतोय. तूला आनंदी ठेवण हाच माझा ध्यास झाला आहे. 😊. आपली गाडी अशीच हळू हळू पुढे चालत राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझाच जय😊 वो दोस्त ही क्या जो हम मूड जाये तो आवाज ना दे,  वो दोस्त ही क्या जो अपणे हिसब से बात करे,  वो दोस...

हर हर गंगे हर हर महादेव

हर हर गंगे हर हर महादेव 2009 ला पहिल्यांदा मला वाराणसी ला येण्याचा योग्य मिळाला. त्यानंतर आता पर्यंत 5 वेळा आलो आणि प्रत्येक वेळी विश्वनाथ दर्शन घेऊनच माघारी परतलो. पहिल्या भेटी वेळेस माझ्याही मनात, काशी म्हणजे हिंदू चे प्रथम दैवत विश्वनाथ आहे म्हणजे असणार ही भव्य दिव्य अशी कल्पना होती. पण दर्शन घेताना गल्लीगल्लीतुन कधी मंदिरात पोहचलो आणि बाहेर आलो हे समजलच नाही, मंदिराचा गाभारा, कळस, नक्षीदार खांब, विविध मूर्ती दर्शन अस काही झालंच नाही. माझं मन निराश झालं. आपलं सर्वोच दैवत अस गर्दी मध्ये कोंडून पडलंय हे मनाला लागलं. अस अनेकांच्या मनाला टोचल असणार पण हे सिद्ध कार्य करायला शासकीय मनोबल आणि शक्ती लागणार होती. दोन्ही सरकार त्या वेळी हिंदू विरोधी होती. शेवटी आपलं मन मारून गंगेत फेरफटका मारून पुढे निघालो. त्यानंतर 2017 ला परत जाण्याचा योग आला आणि या वेळी इथे बदल दिसू लागले, गो शाळा तयार झाल्या होत्या. दर्शन रांगेत बदल केला होता.भक्तच्या आस्था ची काळजी घेतली जात होती. परत 2019 ला आलो तर मंदिर परिसरात काम चालू होते. मंदिर कूस बदलत होते. हिंदू जागा होत आहे हे जाणवलं. सरकार योग्य दिशेने काम ...

भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली

     *भारतरत्न दीदी ला भावपूर्ण श्रद्धांजली* इतिहासात तानसेन बद्दल आपण वाचलेलं आहे की तो किती महान सुरांचा नायक होता. आताच्या पिढीचे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण सुरांची महाराणी, अद्वितीय अशी महानायिका आपण याची डोळा पाहिली आणि याची कानी ऐकली. भविष्यात जिच्या नावाने अनेक दंतकथा तयार होतील. आम्ही  ही लहानपणी अशीच एक दंत कथा ऐकली होती. अमेरिकेचे भारतावर कर्ज वाढत चालले होते. हे कर्ज माफ करायचे असेल तर अमेरिकेनं भारताला एक प्रस्ताव दिला होता की तुमची गणकोकिळा म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर याना अमेरिकेची नागरिक करा.तिच्या आवाज हा अमेरिकेचा मालकीचा आवाज असेल. भारताने तो प्रस्ताव लगेच फेटाळला. कथेचा भाग सोडला तर हे कळते की हा आवाज की अमुल्य आहे. आज माई आपल्यात शरीराने नाहीत पण आवाजाने आजारामर झाल्या आहेत. "ये मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पाणी" हे देशभक्ती गीत त्यांच्या आवाजात ऐकून शहराला नाही असा भारतीय सापडणार नाही. आणि आज परत एकदा दीदी ने जगाला निरोप देऊन आपणा सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. *भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) याना भावपूर्ण श्रद्धांजली.*

वृक्षारोपण

 --------------------*वृक्षारोपण*------------- गेल्या काही वर्षात पर्यावरण दिनचा वातावरण बघून मला प्रश्न पडला,  आपण खरच वृक्षारोपण गंभीर पणे करतोय की फक्त एक उत्सव म्हणून साजरा करुन मोकळे होतोय.  त्यावर मला सुचलेली खालील कविता.. आपण पुन्हा एकदा झाडांना फसवतोय आपण पुन्हा एकदा वसुंधरेला फसवतोय... झाडांची संख्या वाढवतो सांगून स्वतःचे फोटो वाढवले.  अर्धा फूट खड्यात प्लास्टिक मध्ये त्या झाडाच्या बाळाला ठेवून,  फेकबुक वर छाती फुगवून मोकळे झाले.  वसुंधरे ला मी वाचवले या अविर्भावात झोपून गेले दुसऱ्या दिवशी ते ताज पालविच पिल्लू कोणाचं तरी चारा झाले. गेले कित्येक वर्षे हेच चालू आहे. फक्त खड्डे तयार होत आहेत, झाड तर तुटतच आहेत.  त्याच्या पासून बनवलेल्या पेपर वरच त्यांची संख्या वाढलीय फक्त. त्याच्या पासून बनलेल्या सोफ्या-खुर्चीवर बसूनच त्याला कस वाचवायच याची चर्चा झडतेय फक्त.. वसुंधरा तर अजून तापतच आहे. स्वतःची होणारी हानी बघून पुरातून रडतच आहे.. ८खरतर 1 झाड लावा आणि त्याला दहा वर्षे जपा तर ते वृक्षारोपण आहे.* नुसतं जमिनीत लावून जगल तर जगल नाहीतर मेल. माझा सोशल ac...