माझा बाप
-----–------/-/---- *माझा बाप* ---/---/////----//
1955 चा ऑक्टोबर महिना होता, साताऱ्याच्या जावळी मध्ये थंडी ने पांगरून घातले होते. 12 वाजले तरी धुके हटत नव्हते. जगताप वाड्यात बायकांची धावपळ चालू होती, चुलीवर गरम पाणी तापत होते, धुके त्यात धूर अस सफेद वातावरण तयार झालं होत . जाया अक्का, हौसाबाई , गोजाबाई (अप्पांची आई), आणि अजून घरातील स्त्रिया मधल्या घरात ये जा करत होत्या. सरसाबाई गरोदर होती, शेवटचा महिना आणि शेवटचे दिवस चालू होते, कळा चालू झाल्या. तसे हे सहावे अपत्य होणार होत, पहिले पाच मध्ये 2 मूल आणि 3 मुली होत्या, भिकू, पवित्राबाई, विनायक, जिजाबाई, पार्वतीबाई हे पाच बहिणी भावंड. आता सहाव्या चा जन्म होणार होता. थोडा वेळ गेला आणी कोणातरी सांगत आलं मुलगा झाला. वजन कमी होत, आणि बाळ निपचित पडून होत. बायकांनी पाणी टाकून, हलवून प्रयत्न केले पण काही प्रतिसाद नव्हता. सर्वांचे तोंड पडलीत. पुढचं सोपस्कर करायची तयारीत होतेच इतक्यात रस्त्यावरन जाणाऱ्या पेंडरीन की कातकरी अशा बायका नी ते बघितलं. एक वयस्कर कातकरीन पुढं आली आणि त्या बाळाला बघून म्हणाली एक गरम कोळसा आणा चुलीतून. तो हातात घेऊन त्या बाळाच्या बेंबीवर चिकटवला आणि काय आश्चर्य ते निपचित मृत घोषित झालेले बाळ क्या क्या करून ओरडू लागले. जन्मल्या जन्मल्या पूर्णजन्म झालेले ते सहाव्या अपत्य. नंतर 1996 आणि 2012 ला त्यांना परत गंभीर आजारातून आणि अकॅसिडेंट मधून जीवदान मिळाले आहे. विठलाच्या कृपेने जगलेल्या त्या 6व्या अपत्याच नाव ठेवल पांडुरंग. *पांडुरंग तुकाराम जगताप*. तुकाराम आणि सरसा बाई यांचे सहावे मूल, तिसरा मुलगा आता झाले 3 भाऊ आणि 3 बहिणी.
लहानपणसूनच शरीरयष्टी लहान होती पण जस जस वय वाढले, तस कुस्ती मध्ये पारंगत होऊन मजबूत शरीरयष्टी कमवली. शिक्षण घायला महू ते पंचगणी असा 9 किलोमीटर चा प्रवास करून मेट्रिक पूर्ण केले, पुढे अकरावी पूर्ण केली आणि शिक्षक व्हायचे स्वप्न होते पण वडिलांना पक्षाघात म्हणजेच लकवा मारला गेला त्यामुळे पांडुरंग ने त्यांचे ठिकाणी काम चालू केले. मोठा भाऊ तेव्हा परदेशात होता, दुसरा भाऊ दिल्लीला कामाला होता. नंतर मधला भाऊ ने येऊन शेती सांभाळली. मोठा भाऊ कतार वरून परत आला तेव्हा छोट्या भावाने लढून त्याला कामात धरले. दोघांनी मिळून टोळी चे काम पुढे नेले.
1982 ला पांडुरंग चे लग्न वाहागाव मधील रांजणे पाटील यांची तिसरी मुलगी समा हिच्या सोबत झाले. तसा तो त्यांचा प्रेमविवाह होता. दोन्ही कुटुंब एकमेकांना नात्यात लागत होती. पांडुरंग ला समा अगोदर पासून आवडायची. जेव्हा लग्नाची बोलणी झाली आणि बघायचा कार्यक्रम करायचा ठरलं तेव्हा ते मुंबई वरून पत्राने कळवले मुलगी पसंत आहे. लग्नाची तयारी करा. खरतर त्यांना भीती होती या सुंदर मुलीने आपल्याला नकार नको द्यायला. 1982 ला विवाह झाला . 83 ला सुनीता, 85 ला मी जयंत आणि 87 ला विजय अशी 3 भावंड आम्ही जन्माला आलो. आम्ही त्यांना बापू म्हणू लागलो. आमचं लहान पण 1993 पर्यंत एकत्र कुटुंबात गेलं मग वडील आम्हाला मुंबई ला घेऊन आले. कोपरखैरणे मधील मोठी शाळा रा.फ. नाईक शाळेत प्रवेश घेतला. आम्हाला चांगलं शिक्षण दिल, 1996 ला चाळीतील रूम लगेच लोड बेअरिंग ची बांधली. तेव्हा रूम बांधणारे आम्ही मोजक्या लोकांमध्ये होतो. अभ्यासासोबत रोज पेपर वाचन करायला शिकवलं, आत्मचरित्र, कादंबऱ्या वाचायला लावल्या. असोसिएन च्या मीटिंग ना सोबत घेऊन जायचे. मीटिंग मध्ये कस बोलतात ते निरीक्षण करायला शिकवलं. 7 वी 8वित गेलो की सकाळी 5 ला उठवाउन आम्हाला धावायला नायचे. स्वतः दिवसभर हमाली चे काम करून थकायचे पण सकाळी आमच्या चांगल्या सवयीसाठी उठायचे. मला आठवतंय आई चपात्या करायची तो पर्यंत बापू भाजी खुडून ठेवायचे, कधी वाल सोलून ठेवायचे.
बापू खूप महत्वाकांक्षी होते आणि तितकेच चिकाटी पण होती. पोरांना बाप अगदी कसा बारकाईने ओळखतो ते मला अनेकदा अनुभवातून समजले आहे. मी आलराउंडर बनावे अस त्यांचं स्वप्न होत. काहीअंशी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलाय. आम्हाला पोहायला शिकवले अगदी 1998 ला सुनीता ला सुद्धा त्यांनी विहरीत पोहायला शिकवत होते. नंतर आजी ने अडवले म्हणून ते राहिले.
बारीक बारीक गोष्टी चे निरीक्षण मी त्यांच्या कडून शिकलोय.
जवढे कुटुंबासाठी केले तितकेच भाऊ बहिणीसाठी केलंय.
अगदी आता ते 65 मध्ये आहेत तरी गेल्या वर्षी गावातील बहिणीसाठी भांडणात मध्ये पडले होते. अनेकांना वैचारिक मार्गदर्शन केले. काही नी गुरू गुरू म्हणून यांच्याकडून ज्ञान घेतले आणि वेळला पाठ फिरवली.
शेवटी एक किस्सा सांगतो आणि थांबतो, 1996 ला बापूनी त्यांच्या मित्रा ला अवघड काळात 30हजारांची मदत केली होती. पण तो मित्र काही सावरला नाही आणि काम धंदा सोडून गावी निघून गेला. वडिलांनी पण ते सोडून दिलं. 2018 ला अचानक तो माणूस गावावरून आला त्याचा मुलासोबत आला आणि वडिलांना भेटला. त्याची परिस्थिती आता सुधारली होती. अनेकांचे पैसे त्याचे कडे होते आणि त्यांनीं ते मिळवायलाया त्याला खूप त्रास दिला होता. पण बापूंनी त्याची वेळ समजली आणि परत कधी पैसे मागितले नाही हे त्या निगडे काका ना जाणवले होते. तो आला होता तो खास पैसे द्यायला. बापू सारखा सरळ माणूस कोणी नाही अशी तारीफ करून गेला. तशी बापू ची कोपरखैरणे मध्ये तशी ओळख आहे.
Comments
Post a Comment