शाळा स्नेह सम्मेलन 2021

कार्यक्रम रूपरेषा
1. स्वागत समारंभ. वेलकम स्पीच आणि सर्वनमध्ये उत्साह भरून वातावरण आनंदमय करायचे.
2. प्रार्थना, वर्गात फेरफटका, वर्गात बसून गप्पा व फोटो सेशन.
3.स्टेज पाशी येऊन, प्रथम कोविद आणि वारलेलं सहकारी याना श्रद्धांजली,
4. शिक्षकांचे सत्कार मग विध्यार्थी ओळख. विद्यार्थी ओळखीत प्रत्येकाला त्याची एक आठवण विचारायची, एक शिक्षकांबद्दल आणि एक त्याच्या मित्र मैत्रिणी बद्दल.
5.मग शिक्षक मार्गदर्शन आणि आठवणी ना उजाळा.
6. गेम व ऍक्टिव्हिटी
7. केक cutting आणि डान्स 
8. जेवण आणि समारोप







उजाळा आठवणींना
10 वि ची batch साल 2000
स्वागत सर्व शिक्षक आणि विधर्थ्यांचे

शाळेची सुरवात 1992 ते 2000 लहानपण एकत्र कसे गेले याचे वर्णन.
2000 ला दहावी झाली आणि स्पर्धा शिक्षण चालू झाले. आम्हाला इंग्रजी 5वी पासून शिक्षणात आले आणि दहावी पर्यंत change the voice ची भीती घळवण्यातनी  degree affermative ते superlative कशी करायची हे समजण्यात गेली, पण ते इंग्रजी शिकलो त्याच्यावर पुढचे शिक्षण करण्यात कोणतंही अडचण आली नाही,  थळे टीचर ने इंग्रजीचा श्रीगणेशा केला पारवे सरानी ग्रामर शिकवले  आणि पाटील टीचर ने  इंग्रजी निबंध कसे लिहायचे हे शिकवलं. शिकवलेलं इंगजी, मेहतर सर, साठे मॅडम यांनी मराठी चे व्यंजने, क्रियापदे, कर्म शिकवले, कर्म करत राहा फळ नक्की मिळेल हे नकळत शिकलो हे मोठे झाल्यावर समजले.
म्हात्रे सरचे इतिहास, कुरणे आणि नलावडे टीचर चे विज्ञान, राऊत सरांचे हिंदी शिकलो. ठाकूर टीचर चा भूगोल तास तर जगाची सफर घडवायचा, ते इग्लु घरे, ते मान्सून वारे, तो चेरापुंजी ला कसा सर्वाधिक पाऊस पडतो ते वाचून तर तिथे फक्त पाण्याचे तलाव असतील असे चित्र डोळयांसमोर उभे राहायचे.  ज्या विषयात इंटरेस्ट नव्हता पण त्या तासाची आतुरतेने वाट पाहायचो तो म्हणजे चित्रकला. चित्रकलेची पण कॉपी करून चित्र काढायचे आणि एकमेकांचे रंग घेऊन चित्र रंगवायचे कसब आंबोरे सरांनी शिकवले.  चित्रकलेला टेबल वर ठेवलेलं फुलदाणी, आणि वेगवेगळे शो पिस कधी समजले नाहीच.
आठवीला असताना एक कविता बनवण्याची स्पर्धा होती त्यात मी माझी पहिली कविता बनवली होती तीचे नाव होते
              *ज्ञानाचे पर्वत*  
शाळेत येऊन अज्ञानाच्या च्या अंधारातून आम्ही निघालो बाहेर, पाहता ज्ञानाच्या प्रकाशात होते ज्ञानाचे पर्वत, त्या पर्वतातून वाट काढत आम्ही पोहचलो शिखरावरी. पाहता खाली वाढली मनाची धकधक, पाहता वरती अजून होते  ज्ञानाचे पर्वत, जाता चढत, वाढत जाती हे  ज्ञानाचे पर्वत. कधी संपतील ना हे ज्ञानाचे पर्वत, कधी संपतील ना  हे ज्ञानाचे पर्वत.

ह्या कवितेला म्हात्रे सरांनी बक्षीस दिले होते व तिथूनच मला कविता बनवण्याची व लिहायची आवड लागली.

आमची batch वेगळीच होती कारण ती पहिलच होती विसाव्या शतकातली,
2k म्हणजे कॉम्पुटर बंद होणार हे आम्ही ऐकायचो, आमचा रुपेश भोईर कॉम्पुटर बद्दल काहीतरी वर्गात बडबड करायचा पण आम्हाला त्याबद्दल ग चा मा माहीत नव्हता, ना कधी compettive एक्साम दिली ना कधी मार्क्स चे टेन्शन. एकमेकांचे वडिलांचे नावे, कोण गृहपाठ करायचे, कोण मार खायचे, कोण उगाच भाव खायचे, तर कोण कोण तर फक्त नजरेने प्रेम खायचे, अनेकांना तर मुलींबरोबर बोलायला भीती वाटायची, मग रक्षाबंधन आले की कोणी राखू बंधू नये म्हणून सुट्टी घ्याची नाहीतर तशी वेळ आलीच तर आपला हात मागे ठेऊन राखी संपायची वाट पहायची.   असे आम्ही आनंदांत शाळेत घडलो आणि शिकलो.
  21व्या शतकातील पहिली 10वीची batch म्हणून आम्ही बाहेर पडलो.
शाळा संपली आणि सर्व आपापले रस्ते शोधायला बाहेर पडले, काही जण एकाच रस्त्यावर होते तर काही जण वेगळ्या वाटा धुंडाळत होते.  कॉलेज ला सुरवात झाली नवीन मित्र, नवीन आकर्षण नवीन ठिकाण हे बघून मन दिपून तर गेले, त्या नावलाईत शाळेची आठवण, शाळेतील मित्र, ती धमाल, ती कमाल, ते सकाळचं वंदे मातरम आणि शाळा सुटताना जन-गण-मन म्हणून बाहेर पडायची घाई, PT चा तासाची आतुरतेने पहायची वाट, स्पोर्ट्स days आले की अभ्यासला सुट्टी, स्काऊट गाईड ची तयारी, सर्व कुठे तरी मनाच्या कप्प्यात लपून गेले.
असे 10 वर्ष गेले सर्व जन आपापले शिक्षण संपवून काही आपले business settle करत होते, आता जस जस जीवनात set होऊ लागलो तशी आता जुन्या आठवणी शाळा ते मित्र, ते शिक्षक आठवू लागले. शाळा सोडली तेव्हा ना मोबाइल होता ना कोणाचा फेसबुक ना व्हॉट अँप.
2013 ले वॉटस अँप आले आणि शाळेचे मित्र शोधाशोध सुरू झाला. पुन्हा एकदा ते बालपण आठवू लागले, ती मस्ती पुन्हा अनुभवायला नाही तर आठवायला तरी ते मित्र भेटतील का म्हणून मन कासावीस होत होते, आणि अचानक एक दिवस R F Naik स्कूल 2000 च्या group मध्ये रुपेश ने ऍड केले. कोठून कसा नम्बर काढला देवाला माहीत पण पुन्हा जुने मित्र दिसले आणि मन आनंदाने उड्या मारू लागले.  पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मनाचा तो कप्पा परत ते जुन्या आठवणी बाहेर काढू लागला आणि चेहऱयावर नकळत हास्य उमटू लागले, फक्त निस्वार्थ मैत्रीची पाखर पुन्हा एकदा एक झाडवर जमू लागलीत. पण इथे फक्त मुले जमलीत, मुली आपापल्या संसारात रमल्या होत्या. काही जणी बाहेरगावी गेल्या त्यामुळे त्यांचा काही संपर्क नव्हता.
2020 मध्ये कोरोना आला आणि जग थांबवून गेला, या काळात अनेक वाईट बातम्या कानावर आल्या, कळत नकळत आपल्या शिक्षक आपले मित्र यांची काळजी वाटू लागली, थळे सरांचा तर मंदिरात पाया पडतानाचा विडिओ social मीडिया वर viral झाला आणि सर्व विध्यार्थी त्यांच्या साठी प्रार्थना करू लागले. ज्यांनी आम्हाला कणखर बनवले त्या सरांसाठी मन काळजी करु लागले, सरांच्या इच्छाशक्तीवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेला यश आले आणि आमचे आदर्श सर पुम्हा एकदा नवीन पिढ्या घडवायला सज्ज झाले.  2020 असेच घरात आणि काळजीत गेले. कोरोना ने सांगितलं जीवन रेस्टार्ट करा, जे जूण होत ते जागा, स्पर्धा थांबवा आनंदात राहा,  आणि अशी सुरवात करायला शाळेत गेल्याशिवाय श्रीगणेशा नाही होऊ शकत. जानेवारी 2021 उजाडले, लोकडोवन सैल झाले,  आणि अचानक जानेवारी मध्ये रुपेश म्हात्रे ने गेट together करायची संकल्पना मांडली,  कोणी नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता प्रत्येक जण एकच विनंती करत होता, तारीख ठरवा, तारीख ठरवा.  सुरक्षा (पाटील) मढवी आणि रुपेश ने सुरवात केली आणि देवा, सचिन, अतुल, रुपेश, अजय यांनी शिलेदार बनून हे यशस्वी करायचा विडाच उचलला. त्यामुळेच आज आपण सर्व इथे जमलो.
तर आज आपण परत एकदा आपली जिंदगी रेस्टार्ट करत आहोत, आनंद आणि आपली मैत्री हाच आपला खरा ठेवा आहे. आज करूया सुरवात नव्या पर्वाची.

             *उजाळा आठवणींना*
आलो इथे वडिलांचे बोट धरून होतो, पण जाताना मन इथेच सोडून गेलो.
आज द्यायचा आहे उजळा त्या आठवणींना.
शाळेत चढलेल्या पायरीला आणि बसलेल्या बेंचला.
आज बघायच आहे, आहे का माझं नाव अजून त्या करकटने  कोरल्याला बेंचवर.
आठवायची आहे ती घाई 7 च्या आत गेट वर पोहचायची, घंटा व्हायच्या आत वर्गात बसायची.
व्हरांड्यात उभे राहून प्रार्थना बोलण्याची वेगळीच मजा होती, उंची लहान होती पन आपल्या पुढे कोणीतरी आहे यातच खुशी होती. 
आज द्यायचा य उजाळा त्या आठवणींना.
पहिल्या तासाला गृहपाठ बघायला मॉनिटर यायचा आणि नजर चुकवून एकच वही दोघेजण धाकवायचो.
मराठी नंतर इंग्रजीचा तास यायचा आणि आमची बत्ती गुल व्हायची,
आज द्यायचंय उजळा त्या आठवणींना.
गणितात खरी मजा यायची कारण आकडेमोड करायला लय सोपं वाटायचं. भूगोल शिकताना मन त्या प्रदेशात जायचे आणि नागरिकशास्त्र आलं की परत वर्गात यायचं.
PT तास जायचा फक्त झाडांमध्ये खेळण्यात  वर्गात अगोदरच होते खोखो आणि कब्बडी चॅम्पियन. आम्ही फक्त असोयचो पाण्याच्या बाटल्या संबळायला.
आज द्यायचंय उजळा त्या आठवणींना.
परीक्षा असताना बाजूला असायचा मागच्या वर्गातील विध्यार्थी, मग कधी कधी आपला पेपर सोडून त्याचाच सोडवायचो.
कॉपी कधी केली नाही पण मागे पुढे धाकवून आणि बघून लिहल नाही असं कधी झालं नाही.
आज द्यायचंय उजळा त्या आठवणींना.



Comments

Popular posts from this blog

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)