आराध्य डायरी
23 सप्टेंबर 2018 ला आम्ही कोपरखैरणे च्या घरातून घाटकोपर ला भटवाडी मध्ये राहायला आलो. ऐरोलीतील स्नेहल मॅडम ने दिव्यम मध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितले, कोपरखैरणे वरून कुरल्याला जाऊन येणे खूप त्रासदायक व थकवणारे होत होते. हे सर्व आरुला थकवणारे होते. प्रवास करून थकल्यामुळे थेरेपीचा इफेक्ट जास्त होत नव्हता आणि तो वरच्यावर आजारी पडत होता. हे सर्व टाळण्यासाठी आम्ही कुर्ल्या च्या जवळ घर शोधत होतो चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, चुनाभट्टी तसेच हार्बर लाईन वर sanpada ह्या ठिकाणी देखील घर शोधात होतो. 1 दीड महिना शोध घेतल्यावर सर्व बाजूनी विचार करुन मग घाटकोपर ला भटवाडीत रुपये15हजार भाडे व रुपये 50हजार डिपॉजीट वर एक 1bhk रूम भाड्याने घेतला. इथे येऊन आता दिव्यम चा रोजचा प्रवास चालू झाला होता. कधी ट्रेन कधी रिक्षा कधी बाईक वर असा प्रवास चालू होता. हळूहळू आरू मध्ये बदल जाणवत होता, मनीषा ची मेहनत चालू होती आणि अजूनही आहे, असे करत करत 3 महिने झाले व एक दिवस असे समजले की स्नेहल मॅडम, दिव्यमचा राजीनामा देत आहेत. हा आमच्या साठी खूप मोठा ध...