यात्रा व उपक्रम 2019

                  इतिहासातून प्रगतीकडे

                 व्याख्याते श्री. स्वप्नील जिर्गे
    आयोजनाचे प्रोसहन मिळाले ते छत्रपती समहू मुळे

  3 तारखेला रात्री गावी पोहचलो, रात्री 12 वाजता गावात जागर चालू झाला होता व इकडे गणेश, वैभव, जयेश आणि मी असे चौघे धरणावर जाऊन आमच्या  विचारांचा जागर करायला सुरवात केली होती। गावच्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मार्गदर्शन व करिअर साठी इंडिया मिळतील असा उपक्रम करायचा असे ठरवत होतो।  करायचा कधी आणि कुठे हा विचार करताना आठवले की यात्रा झाल्यावर  दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला  जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक कार्यकम गावातील मंदिरासमोरील व्यासपीठावर होणार आहे।आमच्याकडे वेळ तर फक्त 2 दिवसांचा होता आणि आर्थिक पण काहिच तयारी नव्हती। पण ही संधी सोडायची नाही व छोटे तर छोटे पण काहीतरी सामाजिक  करायचे असे मनाशी ठरवले होते। भरपूर विचार केल्यावर आमच्या सर्वांच्या ओळखीचे आणि इतिहासाचे गाडे अभ्यासक तसेच यशस्वी उद्योजक "श्री स्वप्नील अशोक जिर्गे" यांचे व्याख्यान ठेवायचे असे ठरवले। विषय निवडला "इतिहासातून प्रगतीकडे" 

आता पुढची कामाची सूत्रे खूप वेगात फिरवणे गरजेचे होते। गावचे मंडळाची परवानगी, शाळेची परवानगी, ग्रामस्थांना विश्वासात घेणे। आणि सर्वात महत्वाचे स्वप्नील जिरगेची परवानगी।  आम्ही तर त्यांना न विचारताच त्यांना ठरवले होते व ते नाही म्हनणार नाहीतच इतका विश्वास ठेवला होता तो फकत छत्रपती समूहातील नात्यावर।
हे सर्व ठरे पर्यंत रात्रीचे 1:30 वाजले होते। गावात देवाचा जागर व गोंधळ आता रंगात आला होता, विषय  final करून आम्ही देवळात गोंधळ बघायला गेलो। मंडळातील प्रमुख व्यक्ती तिथे भेटले त्यांना ही कल्पना दिली व मंडळाची परवानगी घेतली।

4 तारखेला सकाळी शाळेत जाऊन मुख्याध्यापक ना कल्पना दिली व 30 मिनिट वेळ आम्हाला हवा व्यख्यनासाठी ही परवानगी घेतली।  जिर्गे सराना गणेश ने फोन केला व त्यांना व्यख्यान करणार का विचारले व त्यांनी आमचा विश्वास सार्थ ठरवला। लगेच होकार दिला।
गणेश आणि मी बसून व्याख्यानाचा विषय व जिर्गे सरांची  ओळख प्रेक्षकांना कशी करून द्यायची यावर चर्चा केली व एक पोस्ट तयार केली ती खाली पाठवत आहे।

हे सर्व काम पूर्ण करून आता आम्ही या व्यखानाचा जास्तीत जास्त प्रचार करण्यावर भर दिला व्हाट्स up सोबत गावातील तमाशात तसेच कुस्त्यांचे फडात अनौन्स करून जनतेला उपस्थित राहण्यास आव्हान केले।

शेवटी व्यख्यनाचा दिवस उजाडला। जयेश व वैभव कामानिमित्त   व्यस्त होते गणेश व मी जिर्गे सर शाळा व मंडळ यांच्याशी संपर्क करत कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पडेल याचा प्रयत्नात होतो।

रात्री 8:30 चा कार्यकम 10 वाजता चालू झाला, जास्तीत जास्त  डान्स हे लहान मुलांचे होते व उशीर झाल्यामुळे कमिटी ने आम्हला फक्त 15 मि. वेळ दिला।

पण या 15 ते 20 मी. मध्ये स्वप्ननिल जिर्गे या दुर्गवेड्या आणि सुशिक्षित उदयोजक ने सर्वांची मने जिंकलीत आणि युवा मुलांना प्रोत्साहन देत इतिहासाची आजच्या परिस्तितीशी काशी सांगड घालून प्रगती करता येते हे उदाहरनसह पटवून दिले।

या छोटेखानी पण प्रभावी व्याख्यान यशस्वी करण्यात हातभार लागला ते   दीपक हनुमंत गोळे, अविनाश गोळे, सुशील गोळे, तानाजी तुकाराम गोळे, सुजित मानसिंग गोळे, 
श्री गणेश मित्र मंडळ महू व जिल्हा प्राथमिक शाळा महू।

आपले विनीत
जयंत जगताप,  गणेश गोळे, वैभव गोळे (बापू) व जयेश गोळे

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)